भारताची पहिली डायबेटिस बायोबँक चेन्नईत सुरू

diabetes biobank : भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्यावरील संशोधनासाठी चेन्नई येथे देशाची पहिली डायबेटिस बायोबँक सुरू करण्यात आली आहे.
[gspeech type=button]

भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्यावरील संशोधनासाठी चेन्नई येथे देशाची पहिली डायबेटिस बायोबँक सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम Indian Council of Medical Research (ICMR) आणि Madras Diabetes Research Foundation (MDRF)यांच्या सहकार्याने राबवला गेला आहे.

ही बायोबँक मधुमेही रुग्णांचे रक्त आणि जैविक नमुने गोळा करून त्यावर सखोल संशोधनाला चालना देणार आहे. दोन वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. बायोबँकेत टाईप 1, टाईप 2 आणि गर्भावस्थेतील मधुमेहाचे (गेस्टेशनल डायबेटिस) नमुने साठवले जात आहेत.

यामुळे मधुमेहाची कारणे, निदानाचे नवीन तंत्र आणि वैयक्तिक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी संशोधकांना मदत होईल.

ICMR-INDIAB अभ्यास (2008-2020): देशातील सर्वात मोठ्या मधुमेह सर्वेक्षणात 1.2 लाख लोकांचा समावेश होता.

युवा डायबेटिस नोंदणी (2006): 5,500 हून अधिक तरुण मधुमेही रुग्णांची माहिती नोंदवण्यात आली आहे.

भारताला ‘डायबेटिस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हटले जाते. सध्या भारतात 10 कोटी लोकांना मधुमेह असून 13.6 कोटी लोकांना प्री-डायबेटिस आहे. यातील 62% लोकांना कोणताही उपचार मिळत नाही. मधुमेहाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून आळशी जीवनशैली, अयोग्य आहार आणि आरोग्य शिक्षणाचा अभावामुळे स्थिती गंभीर होत आहे.

डायबेटिस वाढण्यामागील कारणे

फक्त 43 टक्के लोक डायबेटिस बद्दल माहिती ठेवतात. आणि  फक्त 10 टक्के लोक हे शारीरिक व्यायाम करतात. 1990 मध्ये महिलांमधील प्रमाण 11.9% होते, जे 2022 मध्ये 23.7% झाले. पुरुषांमध्ये या प्रमाणात 11.3% वरून 21.4% इतकी वाढ झाली आहे.

या बायोबँकेमुळे मधुमेहावरील संशोधनाला गती मिळेल आणि लवकर नवीन उपचार पद्धती आणि जागतिक स्तरावर योगदान देण्यासाठी याचं महत्त्वाचे पाऊल ठरेल.

हेही पहा -सायलेंट किलर्स

डायबेटिसवर नियंत्रणासाठी उपाय

तज्ज्ञांच्या मते, लवकर निदान आणि नियमित उपचारामुळे डायबेटिसचे परिणाम कमी करता येऊ शकतात. सरकारने, आरोग्य तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन देशभर आरोग्य सेवा पोहोचवणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ