वर्षातून एकदाच धावणारी तरुण उद्योजकांची जागृती एक्सप्रेस 

Jagriti Yatra : नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी, वेगवेगळ्या राज्यातल्या उद्योजकांना एकमेंकांशी जोडणं, वेगवेगळ्या व्यावसायिक कल्पनावर एकत्र काम करुन नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ‘जागृती सेवा संस्थांन’ कडून जागृती रेल्वे यात्रेचं आयोजन केलं जातं.
[gspeech type=button]

Jagriti Yatra : भारतीय रेल्वे ही बदलत्या काळानुसार खूप अत्याधुनिक होत चालली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील अत्याधुनिक सुविधा, वेगवान गाड्या या बदलांसह वैशिष्ट्यपूर्ण आणि पर्यटनाचं रुप असलेली महाराजा एक्सप्रेस  सुद्धा रेल्वेच्या ताफ्यात आहे. अशीच एक एक्सप्रेस वर्षातून एकदाच देशभरातल्या विविध शहरांतून धावते. ती म्हणजे जागृती एक्सप्रेस.. या एक्सप्रेसला  ‘जागृती यात्रा’ म्हणून संबोधलं जातं. येत्या 16 नोव्हेंबरपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. 16 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अशी ही 15 दिवसाची उद्यमी यात्रा असणार आहे. 

तुम्हाला पण या एक्सप्रेसमध्ये प्रवास करायचा आहे?  पण त्यासाठी तुम्ही उद्योजक असायला हवं! होय, ही एक्सप्रेस फक्त तरुण उद्योजक आणि उद्योग सुरु करणाऱ्यांसाठी आहे. पाहुयात ही एक्सप्रेस कधी सुरू झाली आहे. 

जागृती एक्स्प्रेसचा उद्देश

देशातील व परदेशातील तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योजकांशी जोडून देण्यासाठी या रेल्वे यात्रेचं आयोजन केलं जातं. प्रवासासोबतच विविध राज्यातल्या उद्योजकांचं जाळं या यात्रेच्या माध्यमातून विकसीत होतं. 

जागृती यात्रेची सुरुवात

मुंबईतल्या ‘जागृती सेवा संस्थांन’ या संस्थेने सन 2008 सालापासून या जागृती एक्सप्रेस यात्रेला सुरुवात केली. प्रत्येक यात्रेमध्ये जवळपास 500 तरुण-तरुणीं सहभागी होत असतात. आत्तापर्यंत 7 हजारहून अधिक युवांनी या जागृती यात्रेतून प्रवास केला आहे. या 15 दिवसाच्या प्रवासात ही एक्सप्रेस देशातल्या महत्त्वाच्या शहरामधून धावत  8 हजार किमीचा प्रवास करते. यावर्षी एकूण 525 तरुण उद्योजक या प्रवासात सहभागी होणार आहेत. 

या उद्योजक जागृती यात्रेमध्ये  दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवर असलेल्या शहरातील तरुणांना अधिकाधिक सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो.   

प्रवासातील रंजकता

जागृती एक्सप्रेसच्या या 15 दिवसांच्या यात्रेचं खूप विचारपूर्वक नियोजन केलं जातं. 

विविध सेशन, कार्यशाळा, मुलाखती, मनोरंजनाचे कार्यक्रम अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसं की, एसी चेअर कार सेशन, कम्पार्टमेंट सेशन, मेंटॉर सेशन, आर्ट अँड क्रिएटिव्ही ऑन ट्रेन आणि यात्रा सार अशा विविध मार्गदर्शनपर कार्यशाळा होतात. प्रसिद्ध उद्योगपती या प्रवासात नव उद्योजकांना मार्गदर्शन करत असतात. प्रवासी यात्री आपल्या व्यवसायावर चर्चा करतात. संबंधीत उद्योजकांशी भेटी-गाठी होतात. त्यामुळे एक व्यावसायीक इकोसिस्टीम उदयाला येऊन, नव उद्योजकांचं चांगलं नेटवर्क निर्माण होतं. 

त्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षी या यात्रेत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर जागृती यात्रेच्या https://www.jagritiyatra.com/index या वेबसाईट वर नोंदणी करावी लागेल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ