मिग 21 निवृत्त तर तेजसचा करार अजूनही प्रलंबित

Mig - 21 and Tejas : भारताचे मिकोयान-गुरेविच-21 म्हणजेच मिग-21 हे लढाऊ विमाने टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत. शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी या विमानांना निरोप दिला जाणार आहे. गेल्या सहा दशकांपासून ही विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत होती. या लढाई विमानांच्या जागेवर आता वजनाने हलके आणि अत्याधुनिक अशी तेजस विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत येणार आहेत. भारताला या लढाऊ विमानांची नितांत गरज आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागत आहे. भारत आपल्या स्क्वॉड्रनची ताकद वाढवण्यासाठी काय करत आहे? भारतीय हवाई दलाला अधिक जेट विमाने का समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे?
[gspeech type=button]

​​भारताचे मिकोयान-गुरेविच-21 म्हणजेच मिग-21 हे लढाऊ विमाने टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत. शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी या विमानांना निरोप दिला जाणार आहे. गेल्या सहा दशकांपासून ही विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत होती. 

1971 च्या युद्धादरम्यान या विमानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  मात्र, अलिकडच्या काळात या विमानाची सुरक्षा क्षमता कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीकाही सहन करावी लागली. या विमानांच्या अपघातामुळे अनेक वैमानिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी इंग्रजी भाषेत ‘फ्लाईंग कॉफीन’ किंवा ‘विडो मेकर’ अशी टोपन नावंही दिली गेली. 

या लढाई विमानांच्या जागे आता वजनाने हलके आणि अत्याधुनिक अशी तेजस विमाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत येणार आहेत. भारताला या लढाऊ विमानांची नितांत गरज आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागत आहे. भारत आपल्या स्क्वॉड्रनची ताकद वाढवण्यासाठी काय करत आहे? भारतीय हवाई दलाला अधिक जेट विमाने का समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे?

भारताची पुढची भूमिका काय आहे?  

तेजस या लढाऊ विमानांसाठी संरक्षम मंत्रालय आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (हॅल) सोबत एक मोठा संरक्षण करार करणार असल्याची शक्यता आहे.  हा करार सुमारे 67 हजार कोटी रुपयांच्या 97 तेजस मार्क-1ए या लढाऊ विमानांसाठी असेल. ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाने या अधिग्रहणाला मंजुरी दिली होती.

स्वदेशी बनावटीचं तेजस विमान हे हवाई लढाईत आणि आक्रमक हवाई समर्थन प्रदान करण्यात निपुण आहे. ते गुप्तचर आणि जहाजविरोधी ऑपरेशन्स ही उत्तमरित्या हाताळतं. संरक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही विमाने भारतीय हवाई दलात सहभागी झाल्यावर पुढची अनेक वर्ष ते कार्यरत राहून, भारतीय हवाई दलाचा कणा होतील.

दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये हॅलकडून ऑर्डर केलेल्या 83 ‘सुधारित’ लढाऊ विमानांपैकी एकही विमान अद्याप भारतीय हवाई दलाला मिळालं नाही. याची किंमत अंदाजे 48 हजार कोटी रुपये आहे. भारतीय हवाई दलाला सप्टेंबर 2025 मध्ये हॅलकडून ही लढाऊ विमानं मिळतील अशा बातम्या होत्या. मात्र, हवाई दलाला अजूनही ही विमानं मिळाली नाहीत. याविषयी भारतीय हवाई दलाचे प्रमुख ए.पी. सिंह यांनी नाराजीही व्यक्त केली होती. CII वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत ते म्हणाले होते की, “एखादा करार झाल्यावर निहीत वेळेत उत्पादन तयार करुन त्याचा पुरवठा करणं गरजेचं असतं. त्यामुळे वेळ पाळणे हे महत्त्वाचं असतं. मुळात करार करताना आपल्याला माहित असतं ही इतकी मोठी मागणी आपण वेळेत पूर्ण करु शकत नाहीत. तरी, आपण करारावर सह्या करतो. जे वचन साध्य करता येत नाही असं वचन का द्यावं? पुढच्या 10 वर्षात हवाई दलाशी संबंधित उद्योगाकडून अधिकाधिक चपळतेची गरज आहे. मेक इन इंडिया अंतर्गत सुरक्षा उपकरणे तयार करताना त्यात दर्जा आणि वेळेचं गांभीर्य ही राखलं गेलं पाहिजे.”

कंपनी कंपनीतले आरोप-प्रत्यारोप

हॅल या कंपनीनेने मात्र त्यांच्या बाजूने जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस (GE) या कंपनीला या दिरंगाईसाठी जबाबदार धरलं आहे. हॅल या कंपनीने म्हटलं आहे की, जीई ही कंपनी हलक्या लढाऊ विमानांना शक्ती देणारे F-404IN20 इंजिन बनवत आहे. त्यांनी त्यांचं काम वेळेत पूर्ण केलं नाही त्यामुळे आज या विमानांचं काम वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे हवाई दलाच्या ताफ्यात ही लढाऊ विमानं सुपूर्त करता आली नाहीत.  

जीई एरोस्पेसचे F404 हे इंजिन सर्वात प्रभावी विमान इंजिनांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ते जगभरातील हजारो लढाऊ विमानांमध्ये वापरलं जातं. F404-IN20 इंजिन हे भारताच्या सिंगल-इंजिन फायटर प्रोग्रामसाठी तयार केलेलं डिझाइन आहे. यामध्ये F404 कुटुंबातील सर्वात जास्त थ्रस्ट आणि उच्च-प्रवाह असलेला पंखा, अद्वितीय सिंगल-क्रिस्टल टर्बाइन ब्लेड आणि असंख्य विशेष घटक आहेत.

जीई कंपनीची काय बाजू आहे?

जनरल इलेक्ट्रिक एरोस्पेस ही अमेरिकन कंपनी असून मॅसॅच्युसेट्स जवळ या कंपनीच्या उत्पादनांचं उत्पादन केलं जातं. कोविड -19 च्या साधारण दोन वर्षाच्या काळात कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्यामुळे ठरलेल्या वेळेत या इंजिनचं उत्पादन पूर्ण करता आलं नाही अशी प्रतिक्रिया या कंपनीने दिली आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हॅल कंपनीने त्यांना याआधी दिलेली ऑर्डर त्यांनी 2016 पर्यंत पूर्ण करुन तेजस LCA साठी 65 F404-IN0 इंजिन हॅल कंपनीच्या हातात सुपूर्द केले होते. पुढे या इंजिनची ऑर्डर मिळाली नाही, त्यामुळे यासंबंधित उत्पादन बंद केलं. त्यानंतर हॅल कंपनीकडून 2021 मध्ये पुन्हा ऑर्डर दिली गेली. तेव्हा नव्याने या इंजिनचं उत्पान सुरू केलं. कंपनीने म्हटलं आहे की,  “उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो.  त्यावेळी नेमका कोविड काळ सुरू होता. त्यामुळे या इंजिनच्या कच्च्या मालाशी संबंधित असलेल्या पुरवठा साखळी मंदावलेली होती. अशा परिस्थिती पुन्हा सगळं काम शून्यातून सुरू करणं गरजेचं होतं. मात्र, या पुरवठादारांकडून आम्हाला आवश्यक तो माल मिळत गेला त्यामुळे हे उत्पादन नव्याने सुरू करणं शक्य झालं.”

कंपनीने सांगितलं की, “F404-IN20 साठी सुटे भाग आणि साहित्याचे उत्पादन वाढवण्यासाठी ते त्यांच्या पुरवठादारांसोबत काम करत आहेत. उत्पादन लाइन कार्यक्षम ठेवण्यासाठी, सुरक्षितता आणि गुणवत्तेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांना उत्पादने पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या पुरवठादारांसोबत एकत्र काम करत राहू,” असे त्यात म्हटले आहे.

डीआरडीओने एलसीएला वीज पुरवण्यासाठी आखलेलं स्वदेशी विकसित कावेरी इंजिनचा पुरवठा देखील वेळत झाला नाही. त्यामुळे हॅल कंपनीने  तेजसच्या इंजिन निर्मितीची जीई एरोस्पेसला दिली होती.

भारतीय हवाई दलाला अधिक विमानांची आवश्यकता का आहे?

भारतीय हवाई दलाची ताकद फक्त 29 स्क्वॉड्रनपर्यंत कमी केली आहे.  प्रत्येक स्क्वॉड्रनमध्ये 16 ते 18 विमाने आहेत. भारताकडे बहुतेक राफेल आणि एसयू-एमकेआय क्राफ्ट आहेत. ही संख्या खूप कमी आहे. भारताला पूर्ण ताकदवान राहण्यासाठी शिफारस केलेल्या 42.5 स्क्वॉड्रनपेक्षा खूपच कमी आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडे 25 फायटर स्क्वॉड्रन आहेत. ज्यात 300 ते 320 लढाऊ विमाने आहेत. तथापि, पाकिस्तान हवाई दल देखील आधुनिकीकरण करण्याचा विचार करत आहे. ते चीनकडून किमान 40 J-35A पाचव्या पिढीतील स्टेल्थ जेट्स खरेदी करण्याचा विचार करत आहे. 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर आयएएफने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात असं आढळलं आहे की, शत्रूचा सामना करण्यासाठी भारताकडे 42.5 स्क्वॉड्रन पेक्षाही जास्त विमानं असणं गरजेचं आहे.   

तेजसची शक्ती

दरम्यान, तेजस हे सर्वोत्तम 4.5 पिढीतलं लढाऊ विमान आहे. हॅलने अलीकडेच सांगितलं की ते ऑक्टोबरमध्ये भारतीय हवाई दलाला दोन तेजस मार्क-1ए लढाऊ विमाने देतील. या वर्षाच्या सुरुवातीला जीई एरोस्पेसकडून एक इंजिन मिळाल्याचं आणि दुसरं इंजिन मिळविण्याच्या मार्गावर आहे. हे इंजिन मिळाल्यावर हॅलकडून ही दोन लढाऊ विमानं हवाई दलाच्या ताफ्यात सामील होतील.

GE ने हॅलला तीन इंजिन दिले आहेत. डिसेंबरपर्यंत सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला आणखी सात इंजिन देण्याची अपेक्षा आहे.

हॅलने म्हटलं आहे की ते सुरुवातीला भारतीय हवाई दलाला सुमारे 20 तेजस विमाने देतील. टप्प्याटप्प्याने 24 ते 30 विमानांपर्यंत ही संख्या वाढवली जाईल. 

पाचव्या पिढीतले लढाऊ विमानं

दरम्यान, अमेरिका, चीन आणि रशिया आधीच अशी प्रगत विमाने बनवत आहेत. अमेरिकेकडे F-22 रॅप्टर आणि F-35 लाइटनिंग II आहे, तर रशियाकडे सुखोई Su-57 आहे. चीनने आधीच अशा दोन प्रगत स्टेल्थ विमानांचा आपल्या हवाई दलात समावेश केल्याची बातमी आहे.  

चीन सहाव्या पिढीचं लढाऊ विमान विकसित करण्याच्या प्रक्रियेत असल्याच्या बातम्या आहेत. या विमानांचे व्हिडिओ आणि प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकेने घोषणा केली आहे की ते स्वतःचे सहाव्या पिढीचे लढाऊ विमान – एफ-47 – तयार करणार आहेत, ज्याला अधिकृतपणे नेक्स्ट जनरेशन एअर डोमिनन्स (एनजीएडी) म्हणून ओळखले जातं. ट्रम्प यांनी वचन दिले आहे की या लढाऊ विमानांमध्ये ‘अभूतपूर्व’ शक्ती असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर हवाई लढतीत भारतानेही सक्षम राहणं गरजेचं आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ