परग्रहावरील जीव शोधणारे शास्त्रज्ञ भारतीय वंशांचे निक्कू मधुसूदन

Dr. Nikku Madhusudhan : भारतीय वंशाचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील संशोधक टीमने परग्रहावर सजीव वस्ती असल्याचे संकेत मिळाल्याचा दावा केला आहे. ही सजीव वस्ती आपल्या सौरमाला कक्षेतल्या ग्रहावर नसून पृथ्वीपासून सुमारे 120 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या  K2-18b नावाच्या ग्रहावर आहे. 
[gspeech type=button]

भारतीय वंशाचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील संशोधक टीमने परग्रहावर सजीव वस्ती असल्याचे संकेत मिळाल्याचा दावा केला आहे. ही सजीव वस्ती आपल्या सौरमाला कक्षेतल्या ग्रहावर नसून पृथ्वीपासून सुमारे 120 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या  K2-18b नावाच्या ग्रहावर आहे. 

डॉ. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील केंब्रिज विद्यापीठातील टीमने, K2-18b ग्रहावरच्या वातावरणाचं विश्लेषण केलं आहे. या ग्रहाच्या अभ्यासावेळी संशोधकांच्या लक्षात आलं की, पृथ्वीवर केवळ साध्या जीवांद्वारे तयार होणारे रेणू या K2-18b ग्रहावरही आहेत.  त्यामुळे पृथ्वीप्रमाणे याही ग्रहावर सजीव वस्ती असू शकते, असा दावा केला जात आहे. 

या अभ्यासासाठी त्यांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कॉप (JWST) चा वापर केला. यातून त्यांना या K2-18b ग्रहावर कार्बन असलेले रेणू आढळून आले. या ग्रहावरच्या वातावरणामध्ये कार्बनशिवाय मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा आढळलं आहे. 

कोण आहे डॉ. निक्कू मधुसुदन

परग्रहावर सजीववस्ती असू शकते हे शोधणाऱ्या संशोधन टीमचे डॉ. निक्कू मधुसुदन हे प्रमुख आहेत. वाराणसीतील आयआयटी (भू) संस्थेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे.  पुढे अमेरिकेतल्या मॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून त्यांनी पदव्यूत्तर आणि पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. 

सध्या ते केंब्रिज विद्यापीठामध्ये प्राध्यापक असून त्यांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कॉपच्या साहाय्याने K2-18b ग्रहावरच्या सजीव वस्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रह आपल्या सौरमालेपासून अन्य सौरमालेतल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण अभ्यासादरम्यान, या ग्रहावरच्या वातावरणात अस्तित्वात असलेले रेणू, हवामान, याचा अभ्यास करणार आहेत. वातावरणातील या घटकांमुळे या ग्रहावर सजीववस्ती आहे का? असेल तर ती कोणत्या स्वरुपाची आहे? अशा सगळ्या बाबींचा अभ्यास केला जात आहे.

2021 मध्ये मधुसूदन यांनी त्यांच्याटीमसह उप-नेप्यूचन  ग्रहावर हायड्रोजन वायूने समृद्ध असा महासागर असण्याची शक्यता असून या ग्रहावरच्या वातावरणात मिथेन आणि कार्बन घटक असल्याचं म्हटलं होतं. अशा पद्धतीच्या ग्रहांची ओळख करुन देताना ते यासाठी ‘हायसिन’  हायड्रोजन आणि ओशन असा शब्द वापरतात. 

डॉ. मधुसूदन हे सध्या केंब्रिज विद्यापीठात खगोल भौतिकशास्त्र आणि बाह्यग्रह विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एमआयटी, येल आणि प्रिन्सटन सारख्या आघाडीच्या विद्यापीठांमध्येही पदे भूषवली आहेत. मधुसूदन यांना युरोपियन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड फिजिक्सकडून मिळालेले अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांनी आपल्या संशोधनासाठी हबल स्पेस टेलिस्कोप आणि नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करुन अंतराळातील ग्रहावरची माहिती संग्रहित केली आहे. 

परग्रहावर वस्ती आढळली का?

डॉ. मधुसुदन यांच्या संशोधनाची माहिती ‘द ॲस्ट्रोफिजीकल जर्नल लेटर’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यावर संशोधकांनी आश्चर्य आणि कुतूहल मिश्रीत भावना व्यक्त केल्या. मात्र, असं असू शकतं का यावर कोणतंही भाष्य करण्याचं टाळलं आहे. 

सामान्यत: ज्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे अशाच ग्रहावरच्या वातावरणात कार्बन, मिथेन असे घटक आढळून येतात. हेच घटक K2-18b वर आढळून आले आहेत.  त्यामुळे या ग्रहावर नक्कीच सजीव वस्ती असू शकते. वातावरणातील हे वायू घटक याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे.  त्यामुळे येत्या 2 – 3 वर्षात आपल्याला त्यासंबंधित पूर्ण माहिती मिळू शकेल असा दावा त्यांनी केला आहे. 

 K2-18b हा ग्रह पृथ्वीच्या अडीच पट मोठा आणि 124 प्रकाशवर्ष ( 700 ट्रिलियन मैल) दूर आहे.

या टीमला असं आढळून आलं की या ग्रहाच्या वातावरणात डायमिथाइल सल्फाइड (DMS) आणि डायमिथाइल डायसल्फाइड (DMDS) यापैकी दोन्ही किंवा एक तरी रेणूंचे रासायनिक वायू असू शकतो.  पृथ्वीवर हे वायू समुद्री फायटोप्लँक्टन आणि ठराविक जीवाणूंकडून निर्माण केले जातात. 

डॉ. मधुसुदन सांगतात की, जर K2-18b ग्रहावर सजीववस्ती असल्याचं स्पष्ट झालं तर अंतराळात इतर सौरमालेतली सजीववस्ती असणं सामान्य आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. 

दरम्यान, या K2-18b या ग्रहावर सजीव सृष्टी आढळली नाही आहे. तरिही, या ग्रहावर आढळलेल्या वायूमुळे सजीवसृष्टी असल्याची शक्यता आहे. अन्य सौरमालेतही सजीवसृष्टी आहे की नाही या शोधातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. 

1990 पासून सुमारे 5,800 बाह्यग्रहांचा शोध लागला आहे. यापैकी काही ग्रह हे  हायड्रोजन-समृद्ध वातावरणाने महासागरांमध्ये व्यापलेले ‘हायसीन ग्रह’ असू शकतात. ज्याच्यामुळे या ग्रहांवर सजीवसृष्टी विकसीत होऊ शकते.

पुढील वर्षभरात जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहय्याने या ग्रहावर DMS आहेत की नाही आणि या ग्रहाचं आणखीन निरीक्षण केलं जाणार आहे. 

 2029 मध्ये होणाऱ्या ‘द युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियल मिशन मध्ये K2-18b ग्रहावरच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार असल्याचं अपेक्षित आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Padmashri Awardee : कठपुतळी या कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल 96 वर्षीय भीमव्वा शिल्लेक्यतारा यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Sikkim world's first organic state : सिक्किममधील जवळपास 66,000 शेतजमिनी पूर्णपणे सेंद्रिय आहेत. इथे कोणतीही रासायनिक खते किंवा कृत्रिम कीटकनाशके
AI Technology : सुरुवातीला एआय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचं वक्तव्य केलं जायचं. याला छेद देत एआय तंत्रज्ञानामुळे आपलं काम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ