ओटीटीवरही आता सरकारी चॅनल; प्रसार भारतीने लॉन्च केलं ‘वेव्हज’ ॲप

Parsar Bharti : सरकारी प्रसार भारतीने 'वेव्हज' हे ॲप लॉन्च केलं आहे. Waves ॲपच्या माध्यमातून प्रसार भारतीने डिजिटल युगात पाऊल टाकलं आहे.
[gspeech type=button]

सध्या टिव्ही चॅनलपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यावरच्या चॅनलची क्रेझ जास्त आहे. प्रेषक हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा कंटेट पाहायला जास्त उत्सुक असतात. हाच बदल लक्षात घेऊन सरकारी प्रसार भारतीने सुद्धा ‘वेव्हज’ हे ॲप लॉन्च केलं आहे. Waves ॲपच्या माध्यमातून प्रसार भारतीने डिजिटल युगात पाऊल टाकलं आहे.

गोवा येथे आजपासुन सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या चॅनलचं अनावरण केलं.

प्रसार भारतीचं हे चॅनल पूर्ण मनोरंजन स्वरूपाच असणार असून यासाठी प्रेषकांना कोणतही सबसक्रिप्शन फी भरावी लागणार नाही. या चॅनलचं ॲप अन्ड्रोइड आणि ISO वर उपलब्ध आहे.

वेव्हजवर कोणते चॅनेल उपलब्ध आहेत?

– B4U, ABZY, SAB Group, आणि 9X Media सारख्या लोकप्रिय नेटवर्कसह Waves वर सुमारे 40 लाईव्ह चॅनेल उपलब्ध आहेत.

– न्यूज चॅनेल : इंडिया टुडे, न्यूज नेशन, रिपब्लिक, एबीपी न्यूज, न्यूज24, एनडी टीवी इंडिया

– सर्व दूरदर्शन आणि आकाशवाणी चॅनेल देखील या ॲप मध्ये पाहता येतील.

प्रेषकांसाठी मनोरंजनाचं भांडार 

केवळ लाइव्ह टीव्हीच नाही तर वेव्हजवर आरक्षण, वन डे, द इम्पॉसिबल , एलिस डार्लिंग सारखे चित्रपट टीव्ही शो, गेम्स आणि लाइव्ह इव्हेंट्सही पाहता येतील. थोडक्यात संपूर्ण कुटुंबाला एकत्रितरित्या पाहता येईल असा सर्व प्रकारचा कंटेट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

रेवेन्यू शेयरिंग मॉडल

प्रसार भारतीने रेवेन्यू शेयरिंग मॉडल सादर केलं आहे. या ॲप मध्ये जे लोक आपले कार्यक्रम दाखवतील त्यांना या प्लॅटफॉर्मवरून मिळणाऱ्या जाहिरातींच्या कमाईपैकी 65% रक्कम दिली जाईल, तर 35% रक्कम प्रसार भारती घेणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

National Sports Policy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, 1 जुलै 2025 रोजी, राष्ट्रीय क्रीडा धोरण
Social Media Trends : गेल्या वर्षभरात अनेक असे ‘धोकादायक ट्रेंड’ सोशल मीडियावर आलेले. अनेकांनी हे ‘ट्रेंड’ फॉलो सुद्धा केले. आणि
Success Story : जानेवारी 2022 मध्ये, प्रांजलीने मियामीमध्ये Delv.AI नावाची स्वतःची AI स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यावेळी ती फक्त 16

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ