डॉलरच्या तुलनेत रुपया 84.13 च्या नीचांकी पातळीवर

Indian rupee : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 84.13 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
[gspeech type=button]

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 84.13 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मंगळवारी (5 नोव्हेंबर) रुपया घसरला, कारण अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालापूर्वी बाजारात गोंधळ आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर अनिश्चितता होती. यामुळे परकीय भांडवलातुन बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि भारतीय बाजारपेठेवर दबाव आला.

कच्च्या तेलाच्या ‘किंमतीत वाढ’ हे रुपया घसरणीचे एक मुख्य कारण आहे. ब्रेंट क्रूड तेलाचा दर $75.22 प्रति बॅरलवर पोहोचला आहे. त्यामुळे भारताचे आयात बिल वाढत आहे आणि डॉलरची मागणी वाढली आहे. तसेच, पश्चिम आशियामधील तणावामुळे तेल उत्पादनावरही परिणाम झाला आहे.

भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर पैसे काढत आहेत. सोमवारी एफआयआय (FII) ने 4,329.79 कोटी रुपये काढले. तर, चीनने आकर्षक ऑफर दिल्यानं एफआयआय भारताऐवजी चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा परिणाम रुपयावर होत आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असला तरी, त्याआधीच रुपयामध्ये चढ-उतार होऊ शकतो.

अमेरिकेतील निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता झाली आहे. बीएसई सेंसेक्स आणि निफ्टी 50 मध्ये 8% घट झाली आहे. यामुळे भारतीय बाजाराचे एकूण मूल्य 442 लाख कोटी रुपये कमी झाले आणि गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपये नुकसान झाले.

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) डॉलर विकून रुपयाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेडर्सनुसार, आरबीआयने 84.11 ते 84.1150 दरावर डॉलर विकल्याने रुपयाला काहीसा आधार मिळालाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ