एसबीआयच्या लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड सिलेक्ट आणि लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्डच्या प्राइम क्रेडिट कार्ड धारकांसाठी ही माहिती उपयुक्त आहे. एसबीआय बँकेची वर उल्लेख केलेले क्रेडिट कार्डवर डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी आणि सरकारशी संबंधित व्यवहार केल्यावर जे रिवॉर्ड पॉइंट्स जमा केले जायचे ते रिवॉर्ड पॉइंट्स बंद केले जाणार आहेत. 1 सप्टेंबरपासून या नवीन नियमाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.
16 सप्टेंबर 2025 पासून, एसबीआयच्या सर्व कार्ड प्रोटेक्शन प्लॅन (CPP) धारकांचं कार्ड रिन्यू करताना त्याचं ऑटोमेटिक अपडेटेड प्लॅनमध्ये रुपांतर केलं जाणार आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अंतिम तारखेच्या किमान 24 तास आधी प्रत्येक कार्ड धारकाला एसबीआय बँकेकडून अधिकृत एसएमएस किंवा ई-मेलच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.
कार्ड प्रोटेक्शन प्लॅनचे प्रकार
कार्ड प्रोटेक्शन प्लॅनचे तीन प्रकार आहेत. क्लासिक, प्रीमियम आणि प्लॅटिनम असे हे तीन प्रकार आहे. क्लासिकसाठी सुधारित नूतनीकरण योजना (Renewal Plan) 999 रुपये आहे. प्रीमियमसाठी 1,499 रुपये असेल तर प्लॅटिनम कार्डधारकांसाठी 1,999 रुपये असणार आहे.
या तिन्ही प्रकारांमध्ये एक लाख रुपयापर्यंतच्या क्रेडिट कार्ड व्यवहारांच्या फसवणुकीपासून संरक्षण दिलं आहे. या नवीन सुधारित योजनेमध्ये, आपत्कालीन प्रवास साहाय्य अंतर्गत, क्लासिक सीपीपी 80 हजार रुपये, प्रीमीयम प्लॅनमध्ये 1 लाख 20 हजार आणि प्लॅटिनम कार्डधारकांना 1 लाख 60 हजार रुपयांचे प्लॅन दिले जाणार आहेत.
सुधारित योजनेअंतर्गत, क्लासिक योजनेत फक्त प्राथमिक सदस्यालाच विमा संरक्षण मिळेल. प्रीमियम योजनेत प्राथमिक सदस्यासह त्यांच्या जोडीदाराला आणि प्लॅटिनम योजनेत प्राथमिक योजनेसह जोडीदाराला आणि पालकांनाही विमा संरक्षण मिळणार आहे.
एसबीआय बँकेतील अलीकडचे बदल
एसबीआय बँकेने 11 ऑगस्टपासून, एसबीआय कार्डने निवडक कार्ड्सवर देण्यात येणारी 1 कोटी रुपयांची मोफत हवाई अपघात विमा कव्हर देखील बंद केले. यामध्ये यूको बँक एसबीआय कार्ड एलीट, सेंट्रल बँक ऑफ इंडिया एसबीआय कार्ड एलीट, पीएसबी एसबीआय कार्ड एलीट, केव्हीबी एसबीआय कार्ड एलीट, केव्हीबी एसबीआय सिग्नेचर कार्ड आणि अलाहाबाद बँक एसबीआय कार्ड एलीट या कार्डचा समावेश आहे.