तनुष्का सिंग भारतीय हवाई दलाच्या जग्वार स्क्वॉड्रनच्या पहिल्या महिला पायलट

IAF Tanushka Singh : भारतीय हवाई दलामध्ये जग्वार या लढाऊ जेट स्क्वॉड्रनच्या पायलट म्हणून फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंग यांची निवड झाली आहे. जेट स्क्वॉड्रनच्या त्या पहिल्या महिला ऑफिसर आहेत.
[gspeech type=button]

भारतीय हवाई दलामध्ये जग्वार या लढाऊ जेट स्क्वॉड्रनच्या पायलट म्हणून फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंग यांची निवड झाली आहे. जेट स्क्वॉड्रनच्या त्या पहिल्या महिला ऑफिसर आहेत.

जग्वार फायटर जेट

‘जग्वार’ हे भारतीय हवाई दलाचं दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे. या लढाऊ विमानामध्ये कमी उंचीवरून उड्डाण करण्याची क्षमता आहे. हे विमान जमीन आणि समुद्रावरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी वापरलं जातं. तसंच हवाई संरक्षणासाठीही या लढाऊ विमानाचा उपयोग होतो.

लष्करी सेवेचा वारसा

तनुष्का सिंग यांचा जन्म लष्करी सेवेची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही सशस्त्र दलामध्ये होते. तनुष्का यांचा जन्म उत्तरप्रदेशमध्ये झाला. तरी, 2007 पासून त्याचं कुटुंब कर्नाटकमधील मंगलोर इथं स्थायिक झाले आहे. तनुष्का यांनी त्यांचं शिक्षण मंगलोरजवळील सुरथकलमध्ये पूर्ण केलं. 2022 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेकची पदवी घेतली आहे. वडील आणि आजोबा हे भारतीय लष्करामध्ये असल्यानं तनुष्का यांनाही लष्करातच सेवा करायची होती. पण भारतीय हवाई दलामध्ये जास्त संधी असल्याचं समजल्यावर त्यांनी हवाई दलामध्ये करिअर करण्याचं ठरवलं.

तेलंगणातल्या डिंडीगुल वायू सेना अकादमीमध्ये तनुष्का यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर हॉक एमके 132 एअरक्राफ्टमध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी लढाऊ विमान चालवण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं.

संपूर्ण कुटुंबियांचा अभिमान

तनुष्का यांचे आजोबा निवृत्त कॅप्टन डी.बी.सिंग यांनी आनंद व्यक्त करताना या यशाचं श्रेय तनुष्काच्या आजींना दिलं आहे. निवृत्त कॅप्टन डी.बी.सिंग सांगतात की, तनुष्काच्या आजींनी संपूर्ण कुटुंबाला खूप चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं आहे. त्यांनी तनुष्काला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं आहे.

अलिकडे भारतीय हवाई दलामध्ये महिलांना खूप संधी उपलब्ध होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. तनुष्का यांच्या निवडीनंतर देशातल्या अनेक मुलींना या क्षेत्रात येऊन देशाची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळेल हे निश्चित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं
Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ