जम्मू-काश्मीरमधील लष्कारांच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला; दोन जवानांसह दोन हमालांचा मृत्यू  

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा लष्कारावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 18 राष्ट्रीय रायफल रेजिमेंटच्या दोन जवानांचा आणि लष्करासोबत हमाल म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लष्करी जवानांसह आणखी दोन  हमालही या हल्ल्यात गंभीर जखमी आहेत.
[gspeech type=button]

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा लष्कारावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 18 राष्ट्रीय रायफल रेजिमेंटच्या दोन जवानांचा आणि लष्करासोबत हमाल म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लष्करी जवानांसह आणखी दोन  हमालही या हल्ल्यात गंभीर जखमी आहेत.

दक्षिण काश्मीरमधल्या बुटा पाथरी भागात ही घटना घडली आहे. लष्करी साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हा हल्ला केला आहे.  दरम्यान, लष्कारांकडून शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे.

राज्यपालांची सुरक्षा आढावा बैठक

गुरुवारी राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगर येथे सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. आठवड्याभरात एका पाठोपाठ घडत असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीत राज्यपाल मनोज सिन्हा यांनी लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. 

राज्यपालांनी लष्करी अधिकाऱ्यांकडून  बोटा पाथरी दहशतवादी हल्ल्याची माहिती घेतली. या दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याचे  आदेश दिले असून शोधमोहिम सुरु असल्याची माहिती राज्यपालांनी दिली. दरम्यान, राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शहीद जवांनांप्रती शोक व्यक्त केला. 

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला निषेध

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. शहीद जवांनांच्या प्रती शोक करत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

याआधी घडलेल्या घटना 

18 ऑक्टोबरला शोपियान जिल्ह्यातल्या जैनापोर  गावामध्ये कामगारांची दशतवाद्यांनी गोळ्या मारून हत्या केली. हा कामगार बिहारमधून काश्मीरमध्ये नोकरीसाठी आला होता. 

24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातल्या बागुंड गावामध्ये एका तरुणावर दहशतवादी हल्ला झाला. 19 वर्षीय हा मुलगा उत्तर प्रदेशमधल्या विजनोर येथून काश्मीरमध्ये कामासाठी आला आहे. या घटनेत त्यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे आता रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

रविवार 20 ऑक्टोबर रोजी गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्याच्या हल्ल्यात एका स्थानिक डॉक्टराचा आणि सहा स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर श्रीनगर-सोनमार्ग महामार्गावरील झेड-मोडवर बोगद्याच्या प्रकल्पावर काम करत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ