2025 चा पहिला उल्कावर्षाव ‘क्वाड्रंटिड्स’ भारतातून दिसणार!

2025 Quadrantids : 2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिसणारा क्वाड्रंटिड्स उल्कावर्षाव यंदा 3 आणि 4 जानेवारी रोजी असेल.
[gspeech type=button]

2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिसणारा क्वाड्रंटिड्स उल्कावर्षाव यंदा 3 आणि 4 जानेवारी रोजी असेल. खगोल अभ्यासकांच्या मते, दर तासाला 80 ते 120 उल्का तुटताना आपल्याला पाहता येतील.

उल्कावर्षाव कधी आणि कुठे पाहायचा?

– उल्कावर्षावाचा शिखर कालावधी 4 जानेवारीच्या पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान असेल.
– शहरातील कृत्रिम प्रकाशापासून दूर, अंधाऱ्या ठिकाणी उल्का वर्षावाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येईल.
– हा उल्का वर्षाव पाहता यावा म्हणून लखनऊ येथील इंदिरा गांधी तारांगणात दुर्बिणी बसवण्यात येणार आहेत.

क्वाड्रंटिड्स उल्कावर्षावाची वैशिष्ट्ये

इतर उल्कावर्षाव हे दोन दिवसांपर्यंत टिकतात, पण क्वाड्रंटिड्स फक्त काही तासांत पिकवर पोहोचतो.  या उल्कावर्षावाचे कण खूपच कमी प्रमाणात असतात. या कणांच्या प्रवाहातून पृथ्वी जवळजवळ काटकोनातून जाते, या उल्कांचा प्रकाश खूप तेजस्वी असतो. यामुळे आकाश झळाळून जाते.  हा उल्कावर्षाव 2003 EH1 नावाच्या क्षुद्रग्रहामुळे होतो. नासाच्या मते, हा एक ‘मृत धूमकेतू’ असू शकतो.

उल्का वर्षाव कसा पाहावा?

उल्का पाहण्यासाठी दुर्बिणीची किंवा विशेष साधनांची आवश्यकता नाही.शहराच्या बाहेर, प्रकाश प्रदूषण कमी असलेल्या ठिकाणी जाऊन आणि योग्य वेळी निरीक्षण केल्यास आपण या उल्कावर्षावाचा आनंद घेऊ शकतो.

क्वाड्रंटिड्सचे महत्त्व

फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जेरोम लालँडे यांनी 1795 मध्ये शोधलेल्या ‘क्वाड्रन्स म्युरॅलिस’ या नामशेष झालेल्या तारकापुंजावरून हा उल्कावर्षाव ओळखला जातो. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दिसणारा हा उल्कावर्षाव उत्तरेकडील गोलार्धात सर्वाधिक स्पष्ट दिसतो.

क्वाड्रंटिड्स उल्कावर्षाव कधीपर्यंत दिसेल?

क्वाड्रंटिड्स उल्कावर्षाव 27 डिसेंबरपासून सुरू झाला असून, 16 जानेवारीपर्यंत दिसेल. मात्र, 3 आणि 4 जानेवारीला याचा सर्वाधिक प्रभावी कालावधी असेल.   उत्तर गोलार्धात सर्वात चांगल्या प्रकारे दिसणारे क्वाड्रंटिड्स गुरुवारपर्यंत सक्रिय राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ