9 वर्षांतच व्हिसाला मागे टाकत युपीआय सेवा बनली जगातील नंबर 1 पेमेंट सिस्टीम

UPI Rises to Top : भारताची डिजिटल क्रांती संपुर्ण जगाला थक्क करत आहे. भारताची स्वदेशी पेमेंट सिस्टीम युपीआय (UPI - युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस), ही आता जगात सर्वात जास्त वापरली जाणारी रियल-टाईम पेमेंट सिस्टीम म्हणून उदयाला आली आहे
[gspeech type=button]

भारताची डिजिटल क्रांती संपुर्ण जगाला थक्क करत आहे. भारताची स्वदेशी पेमेंट सिस्टीम युपीआय (UPI – युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस), ही आता जगात सर्वात जास्त वापरली जाणारी रियल-टाईम पेमेंट सिस्टीम म्हणून उदयाला आली आहे. युपीआयच्या या यशाने अनेक दशकांपासून पेमेंटच्या जगात दबदबा असलेल्या व्हिसा (Visa) सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीलाही मागे टाकलं आहे.

फक्त 9 वर्षांतच व्हिसाला दिलं आव्हान

युपीआयने ज्या वेगाने प्रगती केली आहे, ती पाहून अनेक आर्थिक तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. भारतामध्ये युपीआय सेवा 2016 साली सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या या काळातच युपीआयने जे यश मिळवलं आहे, ते खरंच खूप मोठं आहे. एका रिपोर्टच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात युपीआयद्वारे तब्बल 64 कोटी रुपयांचे व्यवहार होतात. याउलट, व्हिसाचे दररोज 63.9 कोटी रुपयांचे व्यवहार होतात. या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, युपीआयने व्हिसाला मागे टाकून नंबर एकचं स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा : UPI ट्रान्जेक्शनवरही भरावा लागणार कर!

IMF कडून भारताचं कौतुक! ‘ग्लोबल फास्ट पेमेंट लीडर’ म्हणून गौरव

भारताच्या यशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’ (IMF) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. या रिपोर्टमध्ये त्यांनी भारताला ‘ग्लोबल फास्ट पेमेंट लीडर’ म्हटलं आहे. या यशाचं मुख्य कारण भारताची युपीआयची पेमेंट सिस्टीम असल्याचं IMF ने म्हटलं आहे.

शहरांपासून गावागावांपर्यंत पोहोचली युपीआय

युपीआयच्या मदतीने फक्त शहरांमध्येच नाही, तर आपल्या गावात आणि छोट्या शहरांमध्येही लोक आता सहजपणे डिजिटल पेमेंट करू शकतात. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत सगळीकडेच क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची सोय झाली आहे. यामुळे प्रत्येकाला बँकेच्या सुविधा वापरणं सोपं झालं आहे. डिजिटल पेमेंटसाठी आता डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गरज लागत नाही. मोबाईलच्या एका क्लिकवर लगेच व्यवहार पूर्ण होतो. यामुळेच लोकांचा युपीआय वरचा विश्वास वाढला आहे.

हेही वाचा : युपीआय पेमेंटच्या नियमांत बदल, जाणून घ्या नविन नियम काय आहेत?

जुलै 2025 ची आकडेवारी

युपीआयचा वापर किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हे जुलै 2025 च्या आकडेवारीतून स्पष्ट होतं. फक्त एका महिन्यात युपीआय द्वारे तब्बल 18.39 अब्ज व्यवहार झाले. ज्यांची एकूण किंमत 24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 32 टक्क्यांनी जास्त आहे. हे आकडे हे दाखवतात की, लोक युपीआय किती मोठ्या प्रमाणात आणि विश्वासाने वापरत आहेत.

युपीआय पेमेंट सिस्टीम इतकी यशस्वी का झाली?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, युपीआय सेवा वापरणं खूप सोपं आहे. फक्त काही क्लिकमध्ये आपण पैसे पाठवू शकतो, बिल भरू शकतो किंवा बँकेचा बॅलन्सही तपासू शकतो.

युपीआय पेमेंटची रचना अशी केली आहे की, कोणतीही बँक किंवा फिनटेक कंपनी त्यात सहभागी होऊ शकते. यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे आणि त्यामुळे लोकांना उत्तम सुविधा आणि आकर्षक ऑफर्स देखील मिळत आहेत.

जनधन योजनेमुळे देशातील बहुतेक लोकांची बँक खाती उघडली गेली. यामुळे UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ज्यांच्याकडे आधी बँक खातं नव्हतं, तेही आता सहजपणे डिजिटल पेमेंट करू लागले. यामुळे युपीआय पेमेंट सिस्टीमचा वापर इतका वाढला.

भारताबाहेरही पोहोचली युपीआय सेवा

युपीआयचं यश आता भारताबाहेरही पोहोचलं आहे. संयुक्त अरब आमिराती, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस अशा 7 देशांमध्ये आता युपीआयची सेवा वापरली जात आहे. फ्रान्समध्ये युपीआय सुरू झाल्यामुळे, भारतीय लोकांना युरोपमध्ये पेमेंट करणं सोपं झालं आहे.

भारत सरकार आता ब्रिक्स (BRICS) देशांमध्येही युपीआयला एक स्टँडर्ड पेमेंट सिस्टीम म्हणून लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. जर हे झालं, तर आंतरराष्ट्रीय व्यवहार अजून सोपे होतील आणि भारत डिजिटल क्षेत्रात एक ग्लोबल लीडर बनेल.

युपीआय सेवा आता फक्त एक पेमेंट सिस्टीम राहिली नसून. ती भारताच्या डिजिटल आत्मनिर्भरतेची ओळख बनली आहे. या 9 वर्षांत युपीआयने डिजिटल पेमेंटची व्याख्याच बदलून टाकली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Leather from coconut Water : नारळ पाण्यापासून चामडं तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालंय. कल्पवृक्षाच्या आधुनिक वापराचं दारंही खुलं झालंय. हे
Kartavya Bhavan : दिल्लीमध्ये फिरताना ‘कर्तव्य पथ’ पाहण्याचा अनुभव खूपच खास असतो. आणि आता याच कर्तव्य पथावर एक नवीन, सुंदर
India's Wealth : जागतिक इक्विटी रिसर्च अँड ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये असलेली असमानता ही समोर आली आहे. भारतातील

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ