पहिले परमवीरचक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांच्या वीरमरणास 77 वर्ष

Major Somnath Sharma : भारताचे पहिले परमवीरचक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा यांना वीरमरण प्राप्त झालेल्या घटनेला 77 वर्ष झाली.
[gspeech type=button]

भारताचे पहिले परमवीरचक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा यांना वीरमरण प्राप्त झालेल्या घटनेला 77 वर्ष झाली. काश्मीरचा जो भाग आपल्या ताब्यात आहे, त्याचे श्रेय या वीर जवानांनाच जाते. त्यातलेच एक योद्धा म्हणजे “मेजर सोमनाथ शर्मा”, भारताचे पहिले परमवीर चक्र विजेता म्हणून ते ओळखले जातात. मेजर शर्मा दिनांक 3 नोव्हेंबर 1947 रोजी आपल्या देशासाठी लढताना शहीद झाले.

दुसरे महायुद्ध आणि भारतीय सेना

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, मेजर शर्मा 19 व्या हैदराबाद रेजिमेंटच्या 8 व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. ही बटालियन आता कुमाऊँ रेजिमेंटची चौथी बटालियन म्हणून ओळखली जाते. यावेळी ते जपानच्या सैनिकांविरुद्ध लढले होते. एकदा, त्यांचा एक साथीदार लढाईत गंभीर जखमी झाला होता आणि तो चालू देखील शकत नव्हता त्यावेळी, अधिकारी त्यांना सांगत होते की जखमी सैनिकाला सोडून द्या, पण मेजर शर्मा म्हणाले, “मी त्याला सोडणार नाही.” आणि धैर्याने त्यांनी सैनिकाचे प्राण वाचवले.

1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यावर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने स्थानिक टोळीवाल्या हल्लेखोरांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली. श्रीनगर हे काश्मीरमधील मुख्य शहर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. यासाठी, 31 ऑक्टोबर 1947 रोजी सोमनाथ शर्मांचं पोस्टिंग श्रीनगरला करण्यात आलं. त्यांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र देशभक्तीत बुडालेल्या मेजर शर्मा यांनी श्रीनगरला जायचा आग्रह धरला. 3 नोव्हेंबर 1947 रोजी सोमनाथ शर्मांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बडगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले.

श्रीनगरच्या एअरफील्डवर हल्ला करण्याचा पाकिस्तानींचा प्रयत्न होता, कारण त्या ठिकाणाहून भारतीय सैनिकांची ये-जा होत होती. त्यामुळे, हे एअरफील्ड वाचवणे भारतासाठी अत्यावश्यक होते. मेजर शर्मा आणि त्यांच्या सैनिकांनी बडगाम इथं आपला चौकी बसवली. पण मग मेजर शर्मा यांच्या लक्षात आलं की, स्थानिक टोळीवाल्यांची बडगाममधली हालचाल भारतीय सैन्याचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे. खरा हल्ला तर पश्चिम दिशेहून होणार आहे. मेजर शर्मा यांचा हा अंदाज अचूक निघाला. दुपारी साधारण अडिचच्या सुमारास पाकिस्तानी लष्करानं हल्ला चढवला. मेजर शर्मांसह त्यांची पन्नास जणांच्या तुकडीला तिन्ही बाजूंनी वेढा पडला. यावेळी मेजर शर्मा यांना जाणवले की, जर पाकिस्तानी सैनिक पुढे सरकले, तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल. या लढाईच्या वेळी एक तोफगोळा मेजर शर्मा यांच्या जवळच येऊन फुटला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांनी वायरलेस मेसेज पाठवला, “शत्रू 50 यार्डावर आला आहे. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा अनेकपटीने कमी सैनिक आहेत आणि आम्ही भयंकर गोळीबारास सामोरे जात आहोत. मी इथे एक इंचही मागे सरकणार नाही, आम्ही अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे लढू. मेजर शर्मा आणि त्यांच्या सैनिकांनी साहसाने लढाई केली आणि श्रीनगर जिंकले. पण या संघर्षात 3 नोव्हेंबर 1947 ला मेजर सोमनाथ शर्मा शहीद झाले.

असीम शौर्य आणि बलिदानासाठी, 26 जानेवारी 1950 रोजी, मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. भारतीय सैन्यातील ते पहिले ‘परमवीर चक्र विजेता’ ठरले.

हिमाचल प्रदेशातील वीर

मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म 31 जानेवारी 1923 रोजी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे एका डोगरा ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात लष्करी परंपरा होती. त्यांची भावंडेही सैन्यात होती. नैनितालमधील शेरवूड कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी डेहराडूनमधील प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 22 फेब्रुवारी 1942 रोजी ‘रॉयल मिलिटरी अकादमी, सँडहर्स्ट’मधून पदवी प्राप्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ