परदेशात राहणाऱ्या भारतीयांना घरबसल्या मतदानाचा हक्क मिळणार का?

right to vote remotely : परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना (NRI) आता घरबसल्या मतदान करण्याचा हक्क मिळणार का? याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सध्या, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदान करण्यासाठी भारतात येऊनच मतदान केंद्रावर जावे लागते. पण, आता एक संसदीय समिती परदेशी भारतीयांना घरबसल्या मतदान करण्यासाठी पाठिंबा देत आहे.
[gspeech type=button]

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना (NRI) आता घरबसल्या मतदान करण्याचा हक्क मिळणार का? याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सध्या, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदान करण्यासाठी भारतात येऊनच मतदान केंद्रावर जावे लागते. पण, आता एक संसदीय समिती परदेशी भारतीयांना घरबसल्या मतदान करण्यासाठी पाठिंबा देत आहे.

परदेशातून भारतात येऊन मतदान करणे खूप खर्चिक असल्याने. अनेकजण मतदानाला येऊ शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना प्रतिनिधीद्वारे (proxy voting) किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी होत आहे.

NRI नागरिकांना मतदानाचा हक्क

भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, परदेशात राहणारे भारतीय जे भारताचे नागरिक आहेत आणि त्यांनी दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेतलेले नाही. नोकरी किंवा शिक्षणासाठी जे भारतीय नागरिक भारताच्या बाहेर राहतात त्यांना मतदानाचा हक्क आहे. हे नागरिक ज्या मतदारसंघात नोंदणीकृत आहेत, त्या मतदारसंघात मतदान करू शकतात.

2010 मध्ये, भारताने लोकप्रतिनिधित्व कायद्यात सुधारणा केली होती. त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला. पण त्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करणे आवश्यक होते.

जगभरात सुमारे 1.8 कोटी परदेशात राहणारे भारतीय (NRI) आहेत.आणि भारत जगात सर्वात मोठी परदेशी लोकसंख्या असलेला देश आहे. हे भारतीय प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती (UAE), गल्फ स्टेट्स, अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडममध्ये राहतात.

2024 लोकसभा निवडणुकीत परदेशी मतदारांची उपस्थिती कमी.

2024 लोकसभा निवडणुकीत परदेशी भारतीय नागरिकांची नोंदणी झाली होती. मात्र त्यांच्या मतदानाची संख्या खूप कमी होती. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 1,19,374 परदेशी मतदारांची नोंदणी झाली. परंतु, त्यापैकी केवळ 2,958 जणांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला असे इंडियन एक्सप्रेसने सांगितलं आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, 99,844 नोंदणीकृत परदेशी मतदारांपैकी 25,606 जणांनी मतदान केलं होतं. यापैकी सर्वाधिक मतदार केरळमधील होते. मात्र 2024 मध्ये मतदारांमध्ये खूप घट दिसून आली.

दूरस्थ मतदानाची ( remote voting ) चर्चा

परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी निवडणूक आयोगाने दूरस्थ मतदानाचे उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे. 2014 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने परदेशी मतदारांना मतदानाच्या अधिकारावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने परदेशी मतदारांसाठी दोन उपाय सुचवले ई-पोस्टल बॅलेट (e-postal ballot) आणि प्रतिनिधी मतदान (proxy voting).

ई-पोस्टल बॅलेट पद्धतीमध्ये परदेशात राहणारा मतदार मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बॅलेट प्राप्त करतो. त्यावर मतदान करतो.आणि ते भारतीय दूतावासात किंवा पोस्टाने जमा करतो.

तर, प्रतिनिधी मतदान पद्धतीमध्ये मतदार त्याचा प्रतिनिधी निवडू शकतो जो त्याच्या वतीने मतदान करेल

प्रतिनिधी मतदानावर विरोध (Proxy Voting)

प्रतिनिधी मतदानाला भारतीय जनता पक्षाने समर्थन दिले असले तरी, अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला आहे. 2018 मध्ये, लोकसभेने लोकप्रतिनिधित्व (सुधारणा) विधेयक मंजूर केले होते. या विधेयकानुसार, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना प्रतिनिधीद्वारे मतदान करण्याचा अधिकार मिळणार होता. मात्र, हे विधेयक राज्यसभेत पोहोचले नाही आणि कालांतराने रद्द झाले.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा यावर विरोध होता. त्याचं म्हणणं होतं की, “प्रतिनिधी मतदानाचा गैरवापर होऊ शकतो, आणि यामुळे निवडणूक घोटाळा होण्याची शक्यता आहे.”

संसदीय समितीचा प्रस्ताव

शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीने (Parliamentary Panel on External Affairs) परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी दूरस्थ मतदानाचा मार्ग सुचवला आहे. समितीने परदेशी मतदारांसाठी “प्रतिनिधी मतदान” किंवा “ई-पोस्टल बॅलेट” लागू करण्याची मागणी केली आहे.सध्याच्या प्रणालीमुळे परदेशीय मतदारांचे निवडणूक अधिकार बाजूला पडल्याचे समितीने निदर्शनास आणले असल्याचं , इकॉनॉमिक टाइम्स ने आपल्या वृत्तात सांगितलं आहे.

संसदीय समितीने या मुद्द्यावर विचार केला आहे की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. आणि त्यांना मतदानाचा हक्क दिला जात नाही हे योग्य नाही. समितीने परराष्ट्र मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि निवडणूक आयोगाने या विषयावर विचार करावा अशी मागणी केली आहे.

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना घरबसल्या मतदान करण्यासाठी काही पर्याय सुचवले गेले आहेत. आणि याबाबत संसदीय समितीने आपल्या अहवालात प्रस्ताव दिला आहे. जर हे उपाय लागू झाले, तर परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

FASTag Annual Pass: येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला एक नवीन FASTag-आधारित वार्षिक पास मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आता टोल
Iran - Israel War : इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना
G - 7 Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 - 17 जून 2025 रोजी होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ