AI क्षेत्रात ही स्त्रियांचा बोलबाला

Women And AI : तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक अशा AI तंत्रज्ञानात महिलांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. भारतातल्या आयटी क्षेत्रामध्ये AI वर आधारित असलेल्या काही कंपन्यांची स्थापना ही महिलांनी केली आहे. आणि त्या त्यांच्या कंपनी उत्तमरित्या सांभाळत आहेत.  
[gspeech type=button]

स्त्री-पुरुष समानता यावर कितीही चर्चेच्या फैऱ्या झाडल्या तरिही हाती फारसं काही लागत नाही.  दशकभरापूर्वी आयटी तंत्रज्ञान क्षेत्रात ही पुरुषांचे वर्चस्व होतं. महिला कितीही सक्षम असल्या तरी त्यांना महत्त्वाच्या पदावर संधी दिली जायची नाही. आता ही परिस्थिती फार काही बदल झाला नाही. तरिही महिलांनी आपल्या जिद्दी आणि कष्टाच्या जोरावर तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक अशा AI तंत्रज्ञानात आपलं स्थान निर्माण केलं आहे. भारतातल्या आयटी क्षेत्रामध्ये AI वर आधारित असलेल्या काही कंपन्यांची स्थापना ही महिलांनी केली आहे. आणि त्या त्यांच्या कंपनी उत्तमरित्या सांभाळत आहेत.  

 

गीता मंजुनाथ – संस्थापक, निरामयी हेल्थ अॅनालिटिक्स

निरामयी हेल्थ अॅनालिटिक्स ही बँगलोर येथली कंपनी आहे. गीता मंजूनाथ यांनी   AI च्या साहय्याने आजाराचं निदान करु शकणाऱ्या या कंपनीची स्थापना केली आहे. 

या कंपनीने स्तनाचा कॅन्सर विषयी जास्त संशोधन करुन पारंपारिक पद्धती ऐवजी AI मशीन मध्ये दिलेल्या माहितीनुसार स्तनाचा कॅन्सर आहे की नाही हे पहिल्या स्टेजलाच कसं ओळखता येईल, यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. 

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साहय्याने केलेल्या संशोधनासाठी त्यांना फोर्ब्सच्या 2020 सालच्या यादीत इंडियाज टॉप वूमन अचीव्हर्स म्हणून गौरविलं होतं. 

निकी परमार – एसेंशियल एआय 

निकी परमार ही मूळची पुण्यातली. तिने कोणाच्याही मदतीशिवाय कोडींग शिकून घेतलं आहे. आणि आज तिने व्यवसाय हा अधिक प्रभावीपणे कसा हाताळता येईल यासाठी आवश्यक असलेले AI टूल्स निर्माण केले आहेत. या तिच्या स्टार्ट अप ला गूगल, निविदिआ, एएमडी सारख्या कंपन्यांनी आर्थिक सहाय्य केलं आहे. 

निकीची आणखीन एक अचीव्हमेंट आहे ती म्हणजे, एआय तंत्रज्ञानामध्ये चॅट जीपिटी सारखे टूल्स कशा पद्धतीने बदल घडवून आणत आहेत यावर आधारित ‘अटेंशन इज ऑल यू नीड’ या रिसर्च पेपरच्या लेखनामध्ये तिचा महत्वपूर्ण सहभाग आहे. 

अश्विनी अशोकन वूई एआय 

वूई एआय ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटच्यामाध्यमातून आपण आपली ऑफिसची कामं जशी की, प्रेझेंटेशन, माहितीचं विश्लेषण, एखादी माहिती मिळवून देणे, आपल्या उत्पादना संबंधीत मार्केट रिसर्च करणं अशी अनेक कामं AI  च्या साहय्याने जलदगतीने करुन  देतात. अश्विनी अशोकन आणि तिचे पती डॉ. आनंद चंद्रशेखरन यांनी या वेबसाईटची निर्मिती केली आहे.  

अनिता ठाकूर – GeoIQ

विविध उत्पादनांशी संबंधित कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांविषयी आवश्यक असलेली माहिती, मार्केट रिसर्च, उत्पादनाचा खप, इन्वेंटरी मॅनेजमेंट, उत्पादनांची विक्री किती होऊ शकते, कोणत्या भागात उत्पादानाची मागणी जास्त आहे अशा सगळ्या बाजारपेठेशी आणि ग्राहकांशी संबंधीत माहिती AI च्या साहय्याने मिळवून ती कंपन्यांना पुरवते. अनिता ठाकूर या  GeoIQ च्या सहसंस्थापक आहेत. 

निधी: नेमा एआय 

नेमा एआय हा शैक्षणिक क्षेत्रातला एआय वर आधारित स्टार्ट अप आहे.  न्यूरोडायव्हर्जंट म्हणजे ज्यांची शिकण्याची गती कमी किंवा सामान्य मुलांपेक्षा वेगळे असणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी मदत करणारे तंत्रज्ञान आहे. यासोबतच शिक्षकांना शिकवण्या पलीकडे जी वेगवेगळी कामं असतात त्यात मदत करतं. यामुळे शिक्षकांचा अन्य कामा संबंधीत भार कमी होऊन शिकवण्यासाठी अधिक वेळ देता येतो. 

सुर्या प्रभा के. यू कोड इनटेलिंन्स सोल्यूशन्स

सुर्या प्रभा के. हिने तामिळनाडूतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्या विकसीत व्हावे, त्यांना तंत्रज्ञानाची ओढ लागावी, या क्षेत्रात प्रगती करावी म्हणून खास ‘आर्टिफिशियल इन्टेलिंजन्स फॉर किड्स’ मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सूर्याने विद्यार्थ्यांनी संगणकासारखा जलग आणि सुटसुटीत विचार करुन शिकावं यासाठी ‘यू कोड इनटेलिंन्स सोल्यूशन्स’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यावर विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासाला उपयोगी पडतील असे खेळ आणि अन्य उपक्रम उपलब्ध असतात. 

कौसंबी मंजिता –  मेसन

मेसन ही लहान किंवा स्टार्ट अप उद्योजकांना ई-कॉमर्स पद्धतीने उत्पादनाची विक्री करणाऱ्या व्यवयायिका कमी कमिशन शुल्कावर व्यवसाय करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते. 

ऑनलाईन पद्धतीने विक्री करताना ईृकॉमर्स वेबसाईट्स कंपनीचे शुक्ल हे खूप जास्त असते. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या छोट्या कंपन्यांना हे परवडण्याजोगं नसतं. त्यामुळे त्यांना व्यवसाय वाढीसाठी अडचणी येतात. त्यामुळे कौसंबी मंजिता आणि बरादा साहू यांनी मेसन यांनी छोट्या व्यवसायिकांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. अन्य मोठ्या वेबसाईट्स या ई-कॉमर्स विक्रित्याकडून 30 टक्के कमिशन घेतात त्याउलट मेसन हे आपल्या ग्राहकांकडून एकुण उत्पादन विक्रीवर केवळ 1 टक्के शुल्क आकारते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ