द बेबी बॉस

Vaibhav Suryawanshi : वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये शतक झळकावून एक ना अनेक विक्रम मोडित काढले आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरण्याचा मान त्याने मिळवला.
[gspeech type=button]

वयाच्या 14 व्या वर्षी तुम्ही काय करत होता ? सोशल मीडियावर सध्याचा ट्रेडिंग टॉपिक. अचानक हा विषय ट्रेंडिंग होण्याचं कारण काय? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असणार. तर हा विषय चर्चेत आणण्यासाठी कारणीभूत ठरला आहे, इंडियन प्रिमियर लीगमधला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी.

आयपीएल युवा खेळाडूंचं व्यासपीठ

आयपीएल कायमच युवा क्रिकेटपटूंसाठी आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठीचं हक्काचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा पुरेपुर फायदा उचलला तो राजस्थानचा रॉयल फलंदाज वैभव सुर्यवंशीने. आयपीएलमध्ये शतक झळकावून त्याने एक ना अनेक विक्रम मोडित काढले आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरण्याचा मान त्याने मिळवला.

त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये भारताकडून वेगवान शतक झळकावणार क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा तडाखेंबद बॅट्समन ख्रिस गेलनंतरचा दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. वयाच्या 14 व्या वर्षी संयमी फलंदाजी करत त्यानं आपल्या फलंदाजीची भुरळ सर्वांना घातली आहे.

असा घडला वैभव सूर्यवंशी…

वैभव सूर्यवंशीच्या वडिलांना क्रिकेटपटू व्हायचं होतं. मात्र, त्याचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न सत्यात उतरु शकलं नाही. पण त्यांचा मुलगा वैभव सूर्यवंशीने आपल्या वडिलाचं स्वप्न पूर्ण केलं.

सुरुवातीला वैभवने आपल्या वडिलांकडूनच क्रिकेटचे धडे घेतले. त्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी तो समस्तीपूर ते पाटणा असा जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करुन क्रिकेटचा सराव करु लागला. आपण गुगल मॅपवर समस्तिपूर ते पाटणा हे अंतर टाकलं तर तब्बल तीन तासांचा हा प्रवास असल्याचं पहायला मिळतंय. म्हणजेचं वैभव सुर्यवंशी रोज समस्तीपूर ते पाटणा आणि पाटणा ते समस्तिपूर असा सहा तासांचा प्रवास करायचा. सहा तासांचा प्रवास आणि सहा तासांचा सराव हा त्याचा सलग चार वर्षाचा दिनक्रम होता. त्याच्या याच मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे.

वैभवच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्याच्या वडिलांने जमिनही विकली. आर्थिक किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वैभवच्या प्रशिक्षणामध्ये अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी त्याच्या कुटुंबियांनी घेतली.

वैभवनंही शतक झळकावल्यानंतर त्यांने आपल्या यशाचं श्रेय पालकांना दिलं. वैभव सांगतो की, “सकाळी मैदानावर सरावासाठी वेळेवर पोहचण्यासाठी माझी आई रात्री 11 वाजता झोपायची आणि लगेच रात्री दोन वाजता उठायची. केवळ तीन तास झोप घेऊन ती माझ्यासाठी जेवण बनवायची.” वडिलांनी वैभवसाठी आपलं काम थांबवलं. वैभवच्या मोठ्या भावाने त्या कामाची जबाबदारी घेतली. मी जे काही आहे ते माझ्या आई-वडिलांमुळेच असल्याचं वैभव सांगतो.

स्थानिक क्रिकेटमध्ये वैभवचा जलवा

वयाच्या 12 व्या वर्षी विनू मंकड ट्रॉफीमध्ये बिहारच्या अंडर-19 संघाकडून खेळला. त्यानंतर 12 वर्ष आणि 284 दिवसाचा असताना त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं. 13 व्या वर्षी त्याने विजय हजारे स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली. 2023 मध्ये इंडिया-बी संघाकडून खेळताना त्यानं दोन अर्धशतकांसह (हाफ सेंच्यूरी) 177 धावा केल्या होत्या. 2024 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळताना त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक झळकावत आपल्या फलंदाजीची जादू दाखवली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंडर-19 मधील हे दुसरं वेगवान शतक ठरलं होतं.

लक्ष्मण आणि द्रविडकडून गुरुमंत्र

व्ही.व्ही. एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड भारतीय क्रिकेटमधील हे असे दोन चेहरे आहेत की, ते क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतासाठी युवा क्रिकेटपटू घडवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या मुशीत आजवर अनेक क्रिकेपटू घडले आहेत. आणि आता वैभव सूर्यवंशी नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं कामही या दोघांनी केलं आहे. बीसीसीआयच्या अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीमध्ये वैभव इंडिया बी कडून खेळताना 36 धावांवर बाद झाला. यानंतर त्याला अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी लक्ष्मणने त्याला समजावलं होतं की, आम्ही क्रिकेटपटू किती धावा करतो हे पाहत नाही. तर खेळाडूमध्ये किती काळ खेळायची क्षमता आहे हे तपासतो.

हेही वाचा: मुंबई इंडियन्स: उदयोन्मुख क्रिकेटपटू घडवणारी फॅक्टरी

लक्ष्मणनेच आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविडकडे त्याच्या नावाची शिफारस केली होती. सुरुवातीलाच लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दोन दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळणे हे वैभवसाठी निश्चितच फायदेशीर ठरलं आहे. वैभवनेही आपल्या प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ ठरवत शतक झळकावत आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली. प्रशिक्षक राहुल द्रविड दुखापतग्रस्त असूनही आपल्या दुखापतीची परवा न करता खुर्चीवरुन कसाबसा उभा राहून त्यांने वैभवला दाद दिली. वैभवच्या शतकाचा आनंद द्रविडच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

राजस्थानकडून ‘रॉयल’ पदार्पण

राजस्थान रॉल्सने वैभव सूर्यवंशीला 1.1 कोटींची बोली लावत खरेदी केलं. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही. मात्र, संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर त्याला संघात, संधी मिळाली. वैभव सूर्यवंशीने 19 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शार्दुल ठाकूरला उत्तुंग षटकार खेचत दिमाखात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्याच्या बॅटची जादू क्रिकेटप्रेमींना पूहायला मिळाली. गुजरात टायन्सविरुद्ध तर त्यानं शतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. 35 चेंडूत त्याने शतक झळकावत इतिहास रचला आहे. वैभवने आतापर्यंत राजस्थानसाठी तीन सामने खेळलेत. यामध्ये वैभवने 75.50 च्या सरासरीने 222.05 च्या सरासरीने 150 धावा केल्यात.

हेही वाचा: नेमबाजीत सुवर्णवेध घेणारी फोगटकन्या!

वैभवसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होणार ?

वैभव सुर्यवंशीच्या या स्फोटक 101 धावांच्या खेळीमुळे 16 वर्षीय सचिन तेंडुलकरच्या आठवणी क्रिकेटपटूंच्या मनात ताज्या झाल्या असतीलच.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत वैभवने टीम इंडियाच्या संघात पोहचण्यासाठी दार तर ठोठावलं आहे. तो 14 वर्षांचा असल्याने त्याच्याकडे भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी मोठी संधी आहे. मात्र यासाठी त्याला आपल्या कामगिरीत कमालीचं सातत्य राखावं लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

D. Gukesh Chess Champion : वयाच्या सातव्या वर्षी बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जी. गुकेश पाहिलं होतं. 2024 साली म्हणजे
जो क्रिकेटपटू कसोटी संघात आपलं स्थान पटकांवण्यासाठी झगडत होता. तो या संघाचा कर्णधार कसा होऊ शकतो? असा सवाल काही माजी
Neeraj Chopra : 16 मे 2025 रोजी दोहामध्ये पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 90.23 मीटर भाला फेकत नव्या राष्ट्रीय

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ