‘पोल वोल्ट’चा राजा!

Mondo Pole Vault : 2024 च्या पॅरिस गेम्समध्ये ड्युपलेंटिसने 6 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक मिळवले. पण ते त्याच्यासाठी पुरेसे नव्हते. तो स्वतःला आणखी पुढे नेऊ इच्छित होता. त्याने 6.25 मीटरची अविश्वसनीय उडी मारत काही महिन्यांपूर्वी त्याने स्वत:च प्रस्थापित केलेला जागतिक विक्रम मोडित काढला.
[gspeech type=button]

आर्मंड ड्युपालांटीस म्हणजे विक्रम! आणि विक्रम म्हणजेच आर्मंड ड्युपलांटीस… पोल वोल्टच्या दुनियेतील हे एक असं नाव आहे की, ज्याचा जन्म हा केवळ पोल वोल्टचे नवे विक्रम प्रस्थापित आणि जुने विक्रम मोडण्यासाठीच झाला आहे.  नुकत्याच पार पडलेल्या स्टॉकहोम डायमंड लीग स्पर्धेत स्वीडनच्या आर्मंड डुप्लांटिसने 6.28 मीटर उडी मारत आपल्या कारकिर्दीतला बारावा आणि जागतिक स्तरावरील नवा विक्रमही त्याने प्रस्थापित केला. डबल ऑलिम्पिक चॅम्पियन डुप्लांटिसने फेब्रुवारीमध्ये केलेल्या विक्रमात पहिल्याच प्रयत्नात एक सेंटीमीटरने सुधारणा केली. दरम्यान, या स्पर्धेपूर्वी त्याने चाहत्यांना आश्वासन दिले होते की, पुन्हा एकदा स्वत:चाच विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेल. त्यातच स्पर्धेपूर्वी ‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी ओळख असणाऱ्या उसेन बोल्टला भेटल्यानंतर 25 वर्षीय डुप्लांटिसला थोडी अधिकच प्रेरणा मिळाली होती ही बाब  नाकारता येणार नाही.

विक्रमांचा बेताज बादशहा 

पोल वोल्टच्या कुठल्याही स्पर्धेत डुप्लांटिस कधीही डार्क हॉर्स अथवा अंडरडॉग नव्हता. कारण ज्युनियर स्तरावर  त्याने 2015 वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप, 2017 युरोपियन ज्युनियर चॅम्पियनशिप आणि 2018 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलं होतं. तो एलिट रँकमध्ये आला तेव्हा पोल व्हॉल्टिंगमधील प्रत्येकाला तो कोण आहे हे माहीत होतं. मात्र, ड्युपलेंटिसचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. 2017 मध्ये लंडनमध्ये झालेली त्याची पहिलीच एलिट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा ड्युपलेंटीसला बरचं काही शिकवून गेली. या स्पर्धेतील पराभव स्वीकारणे आणि त्यातून शिकणे हे एखाद्या खेळाडूसाठी विजयाइतकेच महत्त्वाचे असते.  डुप्लांटिसने या पराभवानंतर स्वतःला पुन्हा उभे तर केलेच. शिवाय त्याने मैदानावर जोरदार पुनरागमनही केले. 2018 च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये 6.05 मीटर उडी मारून त्याने विजय तर मिळवलाच. तसंच त्याची ही उडी पोल वोल्टच्या इतिहासील सर्वोत्तम पाचवी संयुक्त उडी ठरली होती. 

जेव्हा शिष्याने मोडला गुरुचा विक्रम

2020 मध्ये ड्युंपलांटिसला त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सपाडली. त्याची कामगिरी अधिक बहरु लागली होती. हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी पोलंडमधील टोरुन येथे त्याने 6.17 मीटरची उडी मारली. आणि ड्युपलेंटिसने आपला बालपणीचा आदर्श रेनॉ लॅव्हिलेनीचा जवळजवळ सहा वर्षे जुना जागतिक विक्रम मोडला. त्याची ही कामगिरी विशेष होती. कारण या स्पर्धेत त्याने आपला आदर्श असलेल्या रेनॉचा विक्रम मागे टाकण्याचा पराक्रम केला होता. यानंतर जवळपास आठ दिवसाने त्याने आणखी एका विक्रम प्रस्थापित केला. 15 फेब्रुवारी रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो इथे त्याने 6.18 मीटरपेक्षा जास्त अंतर पार केले. आणि स्वतःचाच विश्वविक्रम मोडला. त्यानंतर, सप्टेंबरमध्ये इटलीच्या रोममध्ये त्याने 6.15 मीटर उडी मारून दिग्गज पोल व्हॉल्टर सर्गेई बुब्काचा 1994 चा सर्वोत्तम 6.14 मीटरचा जागतिक विक्रम मोडला. 

हे ही वाचा : पिक्चर अभी बाकी है…

मोंडो ड्युपलांटिसची यशोगाथा

2020 पासून त्याने केलेल्या अविश्वसनीय कामगिरीने डुप्लांटिस हे नाव केवळ स्वीडनमध्येच नव्हे तर जगभरात घराघरामध्ये ओळखले जाऊ लागले. 2022 मध्ये त्याने पुन्हा एकदा स्वतःचाच विश्वविक्रम मोडून इतिहासात आपले नाव नोंदवले. त्याने हंगामाची सुरुवात बेलग्रेड सर्बिया येथे 6.19 मीटर उंची गाठून केली. त्यानंतर एका आठवड्यानंतर जागतिक ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये 6.20 मीटरपेक्षा जास्त उडी मारली. यानंतर युजीन इथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 6.21 मीटरपेक्षा जास्त उंची गाठली. युजीनमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवून डुप्लांटिसने या खेळातील सर्व मोठी विजेतेपदे आपल्या नावावर केली होती.  त्याव्यतिरिक्त, 2022 च्या त्याच्या विक्रमी हंगामात त्याने सहा मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवर  म्हणजे तब्बल 22 वेळा व्हॉल्ट मारला. त्यामुळे 23 वर्षीय या खेळाडूकडे इतिहासातील इतर कोणत्याही पोल व्हॉल्टरपेक्षा सहा मीटरपेक्षा जास्त अंतर आहे.

विक्रमांची मालिका सुरुच

ड्युपलेंटीसच्या विक्रमांची मालिका इथे थांबली नाही. 2023 च्या सुरुवातीलाच त्याने फ्रान्समधील क्लेरमोंट-फेरांड येथे झालेल्या ऑल स्टार पेर्चे इनडोअर स्पर्धेत 6.22 मीटर उंचीवर स्वतःचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर हंगेरीच्या बुडापेस्ट इथे 2023 च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने आणखी एक सुवर्णपदक जिंकले आणि नंतर युजीनमधील डायमंड लीग स्पर्धेत 6.23 मीटर उंची गाठून त्याने आणखी एका नवीन विश्वविक्रमासह वर्षाची सुरुवात केली. त्यानंतर 2024 मध्ये, त्याने चीनमधील झियामेन येथे झालेल्या डायमंड लीगमधील जागतिक-सर्वोत्तम विक्रमात आणखी एक सेंटीमीटरची भर घातली. 2024 च्या पॅरिस गेम्समध्ये ड्युपलेंटिसने 6 मीटर अंतर पार करून आणि सुवर्णपदक मिळवले. पण ते त्याच्यासाठी पुरेसे नव्हते. तो स्वतःला आणखी पुढे नेऊ इच्छित होता. त्याने 6.25 मीटरची अविश्वसनीय उडी मारत काही महिन्यांपूर्वी त्याने स्वत:च प्रस्थापित केलेला जागतिक विक्रम मोडित काढला. 

हे ही वाचा : 64 घरांचा राजा

कठोर मेहनत ड्युपलांटिसच्या यशाचं गमक

ड्युपलेंटिसच्या सर्वच जागतिक विक्रम आणि जेतेपदांमागे अर्थातच खूप मेहनत आहे. त्याचे वडील स्वत: ‘पोल वेल्ट’ हा खेळायचे. त्याची आई हेप्थेलॉन या क्रीडा प्रकारात खेळायची. या प्रवासात ड्युपलांटिसला कुटुंबीयांची साथ मिळाल्यानेच तो विक्रमांचे इमले रचताना दिसतोय. वयाच्या जवळपास तीन वर्षांपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरु आहे. आपल्या पोल वोल्टच्या कारकीर्दीमध्ये दोन वेळा ‘वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर’ पुरसाकर पटाकवूनही अजूनही तो  नम्रपण सगळ्यांची वागतो. त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत त्यामुळेच ड्युपलांटिस  ‘पोल वोल्ट’च्या दुनियेचा राजा आहे.  तो कधीही कोणत्याही विजयाला गृहीत धरत नाही. भविष्यात त्याला निश्चितच आणखी विक्रम प्रस्थापित करायचे आहेत. डुप्लांटिस स्वतः म्हणतो, “मी फक्त बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, उंच उडी मारण्याचा प्रयत्न करतो,  मी विक्रम मोडण्याचा प्रयत्न करतो आणि मी फक्त आपल्या सुधारणा करत राहण्याचा प्रयत्न करतो.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

कोनेरु हम्पीच्या वयाच्या अर्ध्या वयाची असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने या स्पर्धेत टॉप टेनमध्ये असलेल्या तीन बुद्धिबळपटूंना आधीच धक्का दिला
इंग्लंडमध्ये एका वनडे सामन्यात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारी क्रांती गौड ही दुसरी भारतीय महिला वेगवान गोलंदाज ठरली आहे.
D. Gukesh Chess Champion : वयाच्या सातव्या वर्षी बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जी. गुकेश पाहिलं होतं. 2024 साली म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ