भारतीय महिला फुटबॉल संघाची गगनभरारी 

The Indian women's football team : भारतीय महिला फुटबॉल संघ 22 वर्षांत प्रथमच एएफसी महिला आशियाई कपसाठी पात्र ठरला आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे भारताच्या या महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदाच एएफसी महिला आशियाई कप 2026 साठी पात्रता मिळवली
[gspeech type=button]

भारतीय महिला फुटबॉल संघ 22 वर्षांत प्रथमच एएफसी महिला आशियाई कपसाठी पात्र ठरला आहे. जेव्हा भारताची कर्णधार संगीता बास्फोरने थायलंडविरुद्ध आपला दुसरा गोल नोंदवला त्यावेळी तिने केवळ विजयावर शिक्कामोर्तब केले नाही. तर तिने भारतीय महिला फुटबॉल संघाची इतिहासात नोंद केली. केवळ गुणवत्तेच्या आधारे भारताच्या या महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदाच एएफसी महिला आशियाई कप 2026 साठी पात्रता मिळवली. भारताचे शेवटचे दोन आशियाई कप सामने पात्रता फेरीशिवाय झाले होते. 2003 मध्ये 14 संघांच्या फॉरमॅटचा भाग म्हणून आणि 2022 मध्ये यजमान म्हणून संधी मिळाली होती. मात्र, भारतीय फुटब़ॉल संघाने कोविड-19 मुळे स्पर्धेदरम्यानच माघार घेतली होती. मात्र, यावेळी कुठलाही शॉर्टकर्ट न स्वीकारता केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आगेकूच केली आहे.

भारतीय महिला फुटबॉलपटूंनी घडवला इतिहास

पहिल्या तीन सामन्यांमध्ये मंगोलियाविरुद्ध 13-0, तिमोर-लेस्टेविरुद्ध 4-0 आणि इराकविरुद्ध 5-0 असा दमदार विजय मिळवल्यानंतर, क्रिस्पिन छेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला फुटबॉल संघाला एएफसी महिला आशियाई कप 2026 पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात त्यांच्या सर्वात कठीण परीक्षेचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या उच्च थायलंड संघाविरुद्ध भारत अंडरडॉग होता. जगात ७० व्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ फिफा क्रमवारीत थायलंडपेक्षा 24 स्थानांनी पिछाडीवर होता. थालंडविरुद्धचा 2-1 असा विजय केवळ एक सामना नव्हता. तर भारतीय महिला फुटबॉलसाठी नवा आशेता किरण होता. थायलंड याआधी 2015 आणि 2019 च्या फिफा महिला विश्वचषकात सहभागी झाला आहे. आणि अशा संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे ही अजिबात साधी बाब नव्हती.

हेही वाचा: ‘क्रिकेट महासत्ता भारत’, जागतिक क्रीडा महासत्ता बनणार का ?

कर्णधार संगीता बास्फोरमुळे स्वप्नपूर्ती 

पुढील वर्षी एएफसी आशिया कपपर्यंतच्या भारताच्या प्रवासात एक नायक म्हणून उदयास आलेल्या या फुटबॉलपटूने दुखापती आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक काळ्या रात्री पाहिल्या आहेत. अंतिम सामन्या संगीताने दोन गोल्डन गोल करत आपल्या संघाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. विजयानंतर संगीता म्हणाली, “सर्व कठोर परिश्रम, सर्व हृदयद्रावक, आम्ही जिंकू न शकलेले सर्व मागील सामने, प्रत्येक गोष्टीचे फ्लॅशबॅक एकत्र आले. शेवटी आम्ही ते साध्य केले आणि आम्ही आनंदाने घरी परतू शकलो. ती एक डिफेन्सिव्ह मिडफिल्डर आहे. तिलाही या पोझिशनवर खेळायला आवडते. तिचे काका आणि माजी मोहन बागान खेळाडू विजय बासफोर यांच्या अकादमीत तिने फुटबॉलचे बाळकडू प्यायले आहे. बहुतेक मुले गोल करण्याच्या आनंदासाठी फुटबॉल खेळायला सुरुवात करतात. पण संगीताला चेंडू मारणे खूप आवडायचे. नेमबाजीचा सराव हा माझा आवडता मनोरंजन होता आणि ती सरावादरम्यान मुलांसोबत अनवाणी खेळत असे. कधीकधी त्यांचा चेंडू लपवायचो आणि त्या चेंडूशी खेळायचो. ही गोष्ट साधारणपणे २००७ च्या आसपासची आहे. बिजय यांच्या अनुभवी डोळ्यांनी तिच्यातील एक चमक पाहिली. ती खेळासाठी एक देणगी होती. तिच्या आईची यासाठी परवानगी घेणे अत्यंत कठीण होते. पण त्यांनी संगीताच्या आईला समजावून सांगितले. यानंतर आईने तिला बूट आणि अशाच प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी 250 रुपये दिले. फुटबॉल खेळण्यासाठी तिने तिच्या पालकांकडून हेच शेवटचे पैसे घेतले होते. फुटबॉलने आपल्याला खूप काही दिले आणि या खेळामुळे मी माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकले,”असे संगीता म्हणते.

दुखापतींवर मात करत संगीताची यशस्वी वाटचाल

2021 मध्ये संगीताला अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट दुखापत झाली. ही दुखापत तिच्यासाठी एका वाईट स्वप्नासाऱखी होती. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये तिची शस्त्रक्रिया झाली आणि यातून सावरत फुटबॉलच्या मैदानावर परतण्याचे कठीण काम सुरू झाले होते. पुढील नऊ महिने ती फुटबॉल खेळू शकली नाही. त्याहूनही वाईट म्हणजे, तिला सशस्त्र सीमा बाल अर्थातचएसएसबीमधील तिच्या नोकरीतून मिळालेल्या पगारातून पुनर्वसनाचा खर्च स्वतः करावा लागला होता. दुखापतीतून एककीकडे झगडत असताना तिला आणखी एक मोठा धक्का बसला. शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्यानंतर लगेचच तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी तिला स्वतःला कसे सांभाळायचे हे समजत नव्हते. तिची आई या कठीण प्रसंगात घरी एकटी होती. आजही काही प्रमाणात ती घरी एकटी असते. तेव्हा संगीताला तिची काळजी वाटते. पण फुटबॉल या खेळातूनच तिला परत लढण्याची ऊर्जा मिळवली. त्यावेळी बरेच काही घडत होते पण ती न डगमगता खंबीरपणे उभी राहिली. आणि भारतीय महिला फुटबॉलला याच संगीताने आज एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्री यांचे बहुमुल्य मार्गदर्शन

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एएफसी महिला आशियाई कप 2026 स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघ पात्र ठरल्यानंतर दार्जिलिंग टेकड्यांमधून आलेल्या भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्री यांच्यावरही कौतुकांचा वर्षाव होत आहे. फुटबॉलपटूंचा एक मुख्य गट तयार करुन त्यांच्यासोबत नियमित सराव केल्याने संघाला ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एएफसी महिला आशियाई कप २०२६ स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यास मदत झाली आहे. एएफसीच्या पात्रता फेरीत विजय मिळवल्यानंतर ही पात्रता भारतीय महिला फुटबॉलसाठी नवी उभारी देणारीच ठरणार आहे. ही पात्रता या स्पर्धेत स्थान मिळवण्यापलीकडे ती खोलवर रुजलेल्या प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध अनपेक्षित विजयाची कहाणी आहे.

काही महिन्यांपूर्वी याच भारतीय संघाला उझबेकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांच्या तयारीबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या होत्या. पण क्रिस्पिन छेत्री जे डगआउटमध्येही नव्हते. परवाना अडचणींमुळे बाजूला राहून संघाचे व्यवस्थापन करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला एक नवीन मानसिकता आणि लवचिकता मिळाली. या उल्लेखनीय बाब म्हणजे, पात्रता फेरीत भारत हा एकमेव संघ होता जो अशा परिस्थितीत खेळला होता. या स्पर्धेत सुरुवातीला अंतिम अकरा फुटपॉलपटू निश्चित नसल्यामुळे आणि 22 हून अधिक फुटबॉलपटू बदलल्यामुळे, संघ वैयक्तिक प्रतिभेपेक्षा सामूहिक विश्वासावर अधिक अवलंबून होता. या संघाने 53 दिवसांच्या राष्ट्रीय शिबिरातून तयारी केली. आपल्या स्वप्नाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली.

भारतीय महिला संघासाठी जागतिक फुटबॉलची कवाडे खुली होणार

भारतीय संघला आता जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी मिळणार आहे. 1 ते 21 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एएफसी महिला आशियाई कप 2026 मध्ये फक्त 12 संघ सहभागी होतील. भारताचा समावेश यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा आता एलए 2028 ऑलिंपिक आणि फिफा महिला विश्वचषक 2027 या दोन्हीसाठी पात्रता स्पर्धा आहे. सर्व आठही संघ यामध्ये उपांत्यपूर्व फेरीतील ऑलिंपिक पात्रता प्रवास सुरू ठेवणार आहेत. 2027 च्या महिला विश्वचषकासाठी कोणते 6 संघ थेट पात्र ठरतील हे देखील एएफसी महिला आशियाई कप 2026 मध्ये निश्चित केले जाईल. याव्यतिरिक्त, आणखी 2 संघ इंटरकॉन्टिनेंटल प्लेऑफमध्ये जातील. ज्यामुळे महिला फुटबॉलमधील सर्वात मोठ्या टप्प्यात जाण्याचा आणखी एक मार्ग भारतासाठी उपलब्ध होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

कोनेरु हम्पीच्या वयाच्या अर्ध्या वयाची असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने या स्पर्धेत टॉप टेनमध्ये असलेल्या तीन बुद्धिबळपटूंना आधीच धक्का दिला
इंग्लंडमध्ये एका वनडे सामन्यात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारी क्रांती गौड ही दुसरी भारतीय महिला वेगवान गोलंदाज ठरली आहे.
D. Gukesh Chess Champion : वयाच्या सातव्या वर्षी बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जी. गुकेश पाहिलं होतं. 2024 साली म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ