Marathi Abhijat Bhasha | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारा प्राचीन शिलालेख
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीची पहिली अट म्हणजे ती भाषा अगदी पुरातन म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचा पुरावा असणं गरजेचं आहे. मराठी भाषेसाठीचा हा पुरावा पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये मिळाला आहे. या लेण्यांच्या दगडी भिंतींवर सातवाहन काळातील एक शिलालेख कोरलेला असून हाच पुरावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्वाचा ठरला आहे.