V K Rajwade Research Institute | इतिहास संशोधकांसाठी पर्वणी असलेली वि. का राजवाडे संशोधन संस्था
वि. का. राजवाडे या इतिहास संशोधन संस्थेत ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके जतन करून संशोधन व संशोधन संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय फारसी, मोडी, संस्कृत, मराठी, हिंदी भाषेतील कागदपत्रे, शिलालेख, ऐतिहासिक मूर्ती, दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह राजवाडे संशोधन मंडळात आहे. येथे संशोधनासाठी देशभरातील संशोधक येत आहेत. राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालयही आहे. या ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या 25 हजार आहे.