पडिक जमिनीतून मिळवा ऑक्सीजन आणि उत्पन्न हवामान बदलाच्या परिणामांवर जागतिक पातळीवर अनेक परिषदा होतात. पण यावर खरा मार्ग खेड्यांमध्ये प्रत्यक्ष काम करूनच निघणार आहे. बेसुमार वृक्षतोड रोखण्यासोबतच पडिक जमिनी हरित करणे आणि भविष्यात उत्पन्नाचा स्रोत या गोष्टी एकाच वेळी करता येण्यासारख्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील किसळ-पारगावमधील गावकऱ्यांनी सुरू केलेली ‘हरित समृद्ध ग्राम’ची चळवळ काय आहे पाहुयात.