तरुणांमध्ये मुरुमांचे वाढते प्रमाण – त्वरित उपायांची घाई आणि समस्या

Acne Issues in young age : पौगंडावस्थेपासून म्हणजेच वयाच्या तेराव्या वर्षापासून साधारण 25 वर्षापर्यंत तरुणपणी चेहऱ्यावर मुरुम येणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. परंतु हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. असंतुलित आहार, झोपेची कमतरता, हार्मोनल बदल, तणाव, आणि प्रदूषण यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. मुरुमांमुळे आत्मविश्वास कमी होतो, चेहरा निस्तेज दिसतो. आणि अनेक तरुण मानसिक तणावाला बळी पडतात.
[gspeech type=button]

पौगंडावस्थेपासून म्हणजेच वयाच्या तेराव्या वर्षापासून साधारण 25 वर्षापर्यंत तरुणपणी चेहऱ्यावर मुरुम येणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. परंतु हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. असंतुलित आहार, झोपेची कमतरता, हार्मोनल बदल, तणाव, आणि प्रदूषण यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. मुरुमांमुळे आत्मविश्वास कमी होतो, चेहरा निस्तेज दिसतो. आणि अनेक तरुण मानसिक तणावाला बळी पडतात.

त्वरित उपायांची घाई – त्वचेसोबत केलेला प्रयोग

तरुणांना त्यांच्या त्वचेवर झटपट बदल हवा असतो. ‘लगेच मुरुम जाऊन चेहरा सुंदर दिसावा’ अशी अपेक्षा असते. त्यामुळे ते बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स, फेसवॉश, आणि उपचारांकडे आकर्षित होतात. अनेक कंपन्या ‘७ दिवसांत मुरुम गायब’ असे जाहिरातींमध्ये दाखवतात. पण प्रत्यक्षात असे होत नाही. यामुळे अनेक तरुण एका उत्पादनानंतर दुसरे उत्पादन वापरत राहतात आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.

मित्र-मैत्रिणींवर विसंबून घेतलेले निर्णय

“माझ्या मित्राने अमुक एका फेसवॉशचा वापर केला आणि त्याला फायदा झाला, त्यामुळे मीही तोच वापरेन” अशी मानसिकता अनेक तरुण ठेवतात. पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कोणाची तेलकट त्वचा असते, कोणाची कोरडी, तर कोणाला सेंसिटिव्ह त्वचा. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेले प्रॉडक्ट आपल्यालाही फायदेशीर ठरेल, असे गृहित धरून उपयोग होत नाही.

टीव्ही आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती

टीव्हीवरील आणि सोशल मीडियावरील जाहिरातींमध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींना घेऊन उत्पादने प्रमोट केली जातात. “हे क्रीम वापरून माझे मुरुम गायब झाले” असे दाखवले जाते. पण सेलिब्रिटींच्या त्वचेवर अनेक प्रोफेशनल ट्रीटमेंट्स होतात, जी सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही आणि खिशाला ही परवडत नाही.

 त्यामुळे अशा जाहिरातींवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. आज बेसिक लेसरचे एक सीटिंग जवळजवळ साडेतीन हजारापासून सुरू होते.

विविध प्रकारचे फेसवॉश आणि त्याचा परिणाम

बाजारात तेलकट, कोरड्या आणि संमिश्र त्वचेसाठी वेगवेगळे फेसवॉश उपलब्ध आहेत.

तेलकट त्वचेसाठी: सॅलीसिलिक ॲसिड असलेले फेसवॉश (उदा. Neutrogena Oil-Free Acne Wash, Kaya Acne Free Face Cleanser)

कोरड्या त्वचेसाठी: हायड्रेटिंग आणि माइल्ड फेसवॉश (उदा. Cetaphil Gentle Skin Cleanser, Simple Refreshing Face Wash)

संमिश्र त्वचेसाठी: जेल बेस्ड फेसवॉश (उदा. Green Tea Face Wash, Himalaya Neem Face Wash)

योग्य मॉइश्चरायझर नसल्यामुळे वाढणारी समस्या

मुरुम असल्यामुळे अनेक तरुण मॉइश्चरायझर लावायचे टाळतात. पण ऑइल कंट्रोल फेस वॉश वापरल्यानंतर हळूहळू त्वचा कोरडी होत जाते कारण ऑइल प्रोडक्शन थांबलेले असते.

 त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक असते. 

तेलकट त्वचेसाठी: जेल-बेस्ड किंवा ऑइल-फ्री मॉइश्चरायझर (उदा. Plum Green Tea Mattifying Moisturizer, Neutrogena Hydro Boost)

कोरड्या त्वचेसाठी: क्रीम-बेस्ड मॉइश्चरायझर (उदा. Cetaphil Moisturizing Lotion, Bioderma Atoderm)

संमिश्र त्वचेसाठी: हलक्या टेक्सचरचे मॉइश्चरायझर (उदा. Simple Hydrating Light Moisturizer)

सनस्क्रीनचा अभाव – त्वचेसाठी मोठा धोका

सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर मुरुमांच्या गडद खुणा आणि हानीकारक परिणाम होतात. त्यामुळे योग्य सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.

ऑइल-फ्री आणि मॅट फिनिश सनस्क्रीन: (उदा. La Shield Oil-Free Sunscreen, Re’equil Oxybenzone Free Sunscreen)

संवेदनशील त्वचेसाठी: (उदा. Bioderma Photoderm, Derma Co Ultra Matte Sunscreen)

चुकीच्या उपायांमुळे वाढणारी समस्या

गुगल आणि सोशल मीडियावर विविध घरगुती उपाय सांगितले जातात. ‘बेसन लावा’, ‘लिंबू घासा’, ‘टूथपेस्ट लावा’ असे उपाय अनेक जण करून बघतात. पण यामुळे त्वचेवर इरिटेशन होते, मुरुमं आणखी वाढतात, आणि काळे डाग वाढण्याची शक्यता वाढते.

तरुणांनी मुरुमांवर उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? त्वचेसाठी उत्तम दिनचर्या कशी ठेवावी? योग्य डाएट आणि लाइफस्टाईल याबद्दल पुढील भागात सविस्तर चर्चा करूया.

 

15 Comments

  • Krutika

    Good Read and well explained

  • सौ. मीरा त्रिफळे

    Cetaphil moistrizer lotion ने wrinkle ची समस्या दूर होईल का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • Meeta Joshi

    उपयुक्त माहिती.

  • Kalpana

    Khupach Chan mahiti dili ahe.

  • Neeta Abhyankar

    छान माहिती.

  • Meena Dumbre

    Very helpfull information 👍 Thanks for sharing 🙏🙏

  • Amita joshi

    Good content

  • Vinay Joshi

    छान माहिती.

  • Arati

    Right topic

  • Deepa Agashe

    Very informative. Thanks

  • MRS.MEDHA B.PATHAK

    मी स्वतः कधीच सौंदर्य प्रसाधने वापरत नाही. कधीही ब्यूटी पार्लरमध्ये गेली नाही. घरगुती उपायांवर भर देत असते. तुमच्या पुढील मार्गदर्शनासाठी उत्सुक आहे कारण तुमच्याकडूनच योग्य मार्गदर्शन मिळणार याची खात्री आहे. धन्यवाद.

  • Abhishek Shivalkar

    Excellent. Awaiting further updates regarding proper diet to follow to avoid such occurrence.

  • Mamta Thakkar

    👌👌

  • Mamta Thakkar

    Nicely explained 👌

  • विजय मुळ्ये

    छान.
    उपाय न करणे आणि चुकीचे करणे हे समस्येचं मूळ आहे का ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

15 Responses

  1. छान.
    उपाय न करणे आणि चुकीचे करणे हे समस्येचं मूळ आहे का ?

  2. मी स्वतः कधीच सौंदर्य प्रसाधने वापरत नाही. कधीही ब्यूटी पार्लरमध्ये गेली नाही. घरगुती उपायांवर भर देत असते. तुमच्या पुढील मार्गदर्शनासाठी उत्सुक आहे कारण तुमच्याकडूनच योग्य मार्गदर्शन मिळणार याची खात्री आहे. धन्यवाद.

  3. Cetaphil moistrizer lotion ने wrinkle ची समस्या दूर होईल का? कृपया मार्गदर्शन करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ