बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या 100 भारतीयांना आणलं परत!

Indians deported by US : बुधवार , दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी, अमेरिकेचं एक मोठं लष्करी विमान पंजाबमधील अमृतसरमध्ये उतरलं. या विमानात अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे भारतीय होते. हे लोक हरियाणा, चंदिगड, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राहणारे आहेत.
[gspeech type=button]

बुधवार , दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी, अमेरिकेचं एक मोठं लष्करी विमान पंजाबमधील अमृतसरमध्ये उतरलं. या विमानात अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे भारतीय होते. हे लोक हरियाणा, चंदिगड, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राहणारे आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. त्यांनी लगेच याची अंमलबजावणी सुरू करून मेक्सिको, कोलंबिया, होंडुरास, ग्वाटेमाला, पेरू या शेजारी देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशांत परत पाठवलं आहे.

अमेरिकेतून 104 भारतीयांना परत पाठवलं!

अमेरिकेत बेकायदेशीर राहत असलेल्या 104 भारतीयांना अमेरिकेने परत पाठवलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 11 कर्मचारी आणि 45 अमेरिकन अधिकारी होते. हे विमान मंगळवारी (4 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजता सॅन अँटोनियो, टेक्सास येथून निघाले.

परत आलेल्या लोकांमध्ये गुजरात आणि हरियाणाचे प्रत्येकी 33 लोक आहेत. तर 30 पंजाबचे, 3 महाराष्ट्राचे, उत्तर प्रदेश आणि चंदीगडचे प्रत्येकी 2 नागरिक आहेत. या विमानात 25 महिला आणि 12 लहान मुले होती, यामध्ये एका 4 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. परत आलेल्या या लोकांमधील 48 जणांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे

‘न्यूज 18’ नुसार, हे विमान दिल्लीमध्ये उतरणार होते, पण वरिष्ठ पातळीवर निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे, हे विमान पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरले.

‘इंडिया टुडे’च्या माहितीनुसार, प्रत्येकाला भारतात पाठवण्यापूर्वी त्यांची ओळख तपासण्यात आली होती. हे विमान जर्मनीमधील रामस्टीन एअर बेसवर इंधन भरून नंतर अमृतसरला रवाना झाले.

अमेरिकेतून भारतीयांना परत आणण्यासाठी लष्करी विमानाचा वापर

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्यासाठी अमेरिकेने पहिल्यांदाच लष्करी विमानाचा वापर केला. ‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या माहितीनुसार, सी-17 ग्लोबमास्टर नावाच्या जेट इंजिन असलेल्या विमानात शौचालय आणि अमेरिकन सैनिकांसाठी बसण्याची सोय होती.

एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत, अमेरिकेच्या दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “भारतात लोकांना परत पाठवण्याबद्दल मला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. मी त्याबद्दल जास्त माहिती देऊ शकत नाही. पण अमेरिका आपली सीमा सुरक्षा अधिक कडक करत आहे, कायद्यांमध्ये बदल करत आहे आणि जे लोक विनापरवाना आले आहेत, त्यांना परत पाठवत आहे.”

‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, पेंटागन टेक्सास आणि कॅलिफोर्नियातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या 5,000 पेक्षा जास्त स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी विमाने पुरवत आहे.

आता काय होणार?

‘न्यूज 18’ च्या माहितीनुसार, अमेरिकेचं विमान पंजाबमध्ये उतरल्यानंतर, त्या विमानातून आलेल्या भारतीयांची चौकशी केली जाईल. ते भारतीय नागरिक आहेत की इतर ठिकाणाहून आले आहेत, हे तपासले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या लोकांना अमेरिकेत विनापरवाना पाठवणारे कोण आहेत, याचाही शोध घेतला जाईल.

अमेरिकेत किती भारतीय बेकायदेशीरपणे राहतात ?

अमेरिकेत जवळपास 7 लाख 25 हजार भारतीय नागरिक कागदपत्रांशिवाय राहत आहेत. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिका सुमारे 18,000 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची योजना करत आहे.अमेरिकेत किती भारतीय बेकायदेशीरपणे राहतात, याची निश्चित आकडेवारी नसल्यामुळे ही संख्या वाढूही शकते.

अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर लोकांना हद्दपार करण्याचं ट्रम्प यांच आश्वासन पूर्ण करण्यासाठी भारत अमेरिकेला सहकार्य करत आहे आणि आपल्या नागरिकांना परत घेत आहे.

भारतासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की, यामुळे अमेरिकेत भारतीयांच्या कायदेशीर प्रवासावर कोणताही परिणाम होऊ नये.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, “जगात कुठेही, अमेरिकेतही, जर आपले नागरिक विनापरवाना राहत असतील, तर त्यांना भारतात परत आणायला आम्ही तयार आहोत.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Operation Sindhu : इराणमधून 110 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणारं पहिलं विमान गुरुवार, दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे भारतात पोहोचलं.
Rain update: महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. विशेषतः कोकण आणि मुंबई परिसरात येत्या काही
Gujarat plane crash : गुजरातमधल्या अहमदाबादहून लंडन इथल्या गॅटवीक इथे जाणाऱ्या विमानाला 12 जून रोजी दुपारी साधारण दीडच्या सुमारास अपघात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ