फॉक्सकॉनची ‘एन्नोकॉन’ उपकंपनी ‘मेक इन इंडिया’ योजनेत सहभागी  

Ennoconn company : तैवानमधील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉन आता भारतात आपला विस्तार करत आहे. त्यांच्या एन्नोकॉन (Ennoconn) या उपकंपनीने तामिळनाडूमध्ये नोंदणी केली आहे.
[gspeech type=button]

तैवानमधील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉन आता भारतात आपला विस्तार करत आहे. त्यांच्या एन्नोकॉन (Ennoconn) या उपकंपनीने तामिळनाडूमध्ये नोंदणी केली आहे. ही कंपनी ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत काम करणार असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहिती तंत्रज्ञान (ICT), आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये काम करणार आहे. म्हणून, एन्नोकॉन कंपनी तामिळनाडूमध्ये आली आहे.

फॉक्सकॉनचा भारतातील मोठा विस्तार

फॉक्सकॉन कंपनी आयफोन बनवणारी प्रमुख उत्पादक कंपनी आहे. भारतामध्ये तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर तालुक्यात या कंपनीचा मोठा कारखाना आहे. या कारखान्यात सुमारे 40,000 कर्मचारी काम करतात. आतापर्यंत फॉक्सकॉन मुख्यतः स्मार्टफोन उत्पादनावर लक्ष केंद्रित करत होती. मात्र आता त्यांनी क्लाऊड सेवा, औद्योगिक ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातही काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

एन्नोकॉनची भूमिका आणि स्पर्धा

एन्नोकॉन कंपनी ही फॉक्सकॉनची 2007 पासूनची उपकंपनी आहे. क्लाऊड-आधारित AI सेवा, स्मार्ट उत्पादने आणि औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. भारतातील आपल्या विस्तारानंतर, एन्नोकॉनला ॲडव्हान्टेक, सीमेन्स आणि रॉकवेल ऑटोमेशन यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल.

भारत सरकारचा ‘मेक इन इंडिया’ आणि PLI योजनेला पाठिंबा

भारत सरकार उद्योगांना चालना देण्यासाठी ‘प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (PLI) योजनेअंतर्गत मोठा निधी देत आहे. जेणेकरून भारतातच वस्तू बनवण्यावर भर दिला जाईल. 2025-26 पर्यंत महत्त्वाच्या उद्योगांसाठी सरकारने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्रात वेगाने विस्तार होत आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत भारतात 1.46 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आणि पुढील एका वर्षात ती 2 लाख कोटींपेक्षा जास्त होईल, असा अंदाज आहे.

प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत उद्योगांसाठी मोठा निधी

PLI योजनेअंतर्गत अनेक उद्योगांना जास्त निधी मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT हार्डवेअर उद्योगासाठी 2024-25 मध्ये 5,777 कोटी निधी दिला जात होता. आता तो 9,000 कोटीं इतका केला आहे. त्याचप्रमाणे, ऑटोमोबाईल आणि गाड्यांचे सुटे भाग यांच्या उत्पादनासाठी निधी 346.87 कोटींवरून 2,818.85 कोटींवर नेण्यात आला आहे.

गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती

या गुंतवणुकीमुळे 12.50 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाची निर्मिती आणि विक्री झाली. यामुळे 9.5 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असून ही संख्या 12 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे ‘Nirmala’ या संस्थेचे म्हणणे आहे.

एन्नोकॉन भारतात काय बनवणार?

एन्नोकॉनने कंपनीने भारतातील उत्पादन योजनेबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र त्यांनी औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), स्मार्ट उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि PLI योजनेच्या पाठबळामुळे, भारतातील उत्पादन क्षेत्र वेगाने विकसित होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

golden year for Indian women athletes : या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत भारतीय महिला खेळाडूंनी जी जबरदस्त कामगिरी केली आहे.
A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक
Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ