गंगा नदीतील डॉल्फिनची जनगणना !

Dolphins: पर्यावरण मंत्रालयाने जागतिक वन्यजीव दिनानिमित्त एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भारतीय वन्यजीव संस्थेने (WII) गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमधील डॉल्फिनची माहिती दिली. या गणनेत गंगा नदीत एकूण 6,324 डॉल्फिन आढळले.
[gspeech type=button]

भारतामध्ये गंगा नदीतील डॉल्फिनची पहिली जनगणना चार वर्षांपूर्वी करण्यात आली. या जनगणनेत गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये एकूण 6,327 डॉल्फिन सापडले. हे विशेषत: गंगा नदीत आणि तिच्या उपनद्यांमध्ये दिसून आलं आहे. जिथे या प्रजातीचे प्रामुख्याने अस्तित्व आहे. भारतात एकमेव गंगा नदीत हे डॉल्फिन आपल्याला पहायला मिळतात.

जनगणनेतील निष्कर्ष

पर्यावरण मंत्रालयाने जागतिक वन्यजीव दिनानिमित्त एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भारतीय वन्यजीव संस्थेने (WII) गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमधील डॉल्फिनची माहिती दिली. या गणनेत गंगा नदीत एकूण 6,324 डॉल्फिन आढळले. ज्यात मुख्य प्रवाहात 3275 आणि उपनद्यांमध्ये 2,414 डॉल्फिन आहेत. ब्रह्मपुत्रा नदीच्या मुख्य प्रवाहात 584 आणि उपनद्यांमध्ये 51 डॉल्फिन आहेत. बियास नदीत 3 डॉल्फिन आढळले.

2021 मध्ये सुरू झालेल्या गणनेत 8,507 किलोमीटरपर्यंत नदी आणि तिच्या उपनद्यांमधील डॉल्फिन मोजले गेले. या गणनेत उत्तर प्रदेशात सर्वाधिक (2,397) डॉल्फिन आढळले. त्यानंतर बिहार (2,220), पश्चिम बंगाल (815), आसाम (635), झारखंड (162), राजस्थान आणि मध्य प्रदेश (95) आणि पंजाबमध्ये (3) डॉल्फिन आढळले.

प्रोजेक्ट डॉल्फिन

गंगा नदीतील डॉल्फिन्स या प्रजातीच्या संवर्धनासाठी 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ सुरू केला. या प्रकल्पाचे उद्दिष्ट गंगा आणि समुद्रातील डॉल्फिन्सचे संरक्षण करणे आहे. नदीतील डॉल्फिन्सची वाढ हळू असते. आणि ते धोक्याच्या ठिकाणी वावरणारे प्राणी आहेत. जे विशेषतः मासेमारीच्या जाळ्यात अडकून मरतात. यामुळे डॉल्फिन्सचे संरक्षण अत्यंत आवश्यक झालं आहे.

हे करण्यासाठी वन विभाग, मासेमार आणि मत्स्यव्यवसाय विभाग एकत्र काम करतात. या सर्वेक्षणात 58 नद्यांची पाहणी केली गेली. यामध्ये 28 नद्यांची बोटीने आणि 30 नद्यांची रस्त्याने पाहणी करण्यात आली. यामुळे डॉल्फिनची संख्या आणि त्यांना धोका असणारी ठिकाणे समजल्यामुळे, डॉल्फिन्सला वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतील.

डॉल्फिन गणनेतील आव्हाने

वन्य प्राण्यांची गणना करण्यासाठी बहुतेक वेळा जमिनीवरील प्राण्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. कॅमेरा ट्रॅप, ठराविक अंतरावर मोजणी, त्यांच्या विष्ठेचा मागोवा, पायाचे ठसे आणि डीएनएचे नमुने वापरून त्यांची संख्या मोजली जाते. पण डॉल्फिनची गणना करणे खूप अवघड आहे. ते पाण्यात राहतात आणि श्वास घेण्यासाठी काही सेकंदांसाठीच बाहेर येतात. त्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण होते. ते पाण्यात असल्यामुळे त्यांच्या जैविक खुणाही सहज मिळत नाहीत. तरीही, वन्यजीव संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉल्फिन्सची गणना केली.

गंगा नदीतील डॉल्फिन्सची संख्या

20 व्या शतकाच्या शेवटी गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या सुमारे 4,000 ते 5,000 इतकी असल्याचा अंदाज होता. परंतु, 2008 मधील एका अभ्यासानुसार ही संख्या घटून 1,800 वर आली. अलीकडील अभ्यासांनुसार, ही संख्या पुन्हा वाढून 3,500 ते 4,500 असल्याचा अंदाज आहे. मात्र, हे आकडे केवळ अंदाज म्हणून ओळखले जातात. कारण ते प्रामुख्याने बोटीतून ठराविक अंतरावर दिसलेल्या डॉल्फिनच्या संख्येवर आधारित आहेत. त्यामुळे, यापूर्वीची गणना अचूक नव्हती आणि आताची गणना अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांनी वापरलेल्या पद्धती

‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ सर्वेक्षणासाठी शास्त्रज्ञांनी ‘दृश्य आणि ध्वनि सर्वेक्षण’ पद्धतींचा वापर केला.

दृश्य सर्वेक्षण

एका बोटीवर दोन निरीक्षकांची टीम होती, जेव्हा डॉल्फिन दिसायचे, तेव्हा निरीक्षक बोटीपासून त्याचे अंतर, डॉल्फिन प्रौढ आहे की लहान बाळ, आणि तेच डॉल्फिन आधी दिसले होते का याची नोंद करायचे. नंतर, या निरीक्षणांची ध्वनि सर्वेक्षणाशी तुलना केली जायची.

ध्वनि सर्वेक्षण

डॉल्फिन्स पाण्यात विशिष्ट आवाज काढतात. हायड्रोफोन (पाण्याखालील मायक्रोफोन) च्या मदतीने या आवाजांचे रेकॉर्डिंग केले गेले आणि त्यावर आधारित डॉल्फिन्सची संख्या आणि वितरण ठरवले गेले.

डॉल्फिन जवळजवळ आंधळे असतात. त्यामुळे ते वटवाघुळांप्रमाणे ध्वनी किंवा प्रतिध्वनीच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधतात. शास्त्रज्ञांनी हायड्रोफोन नावाचे पाण्याखालील मायक्रोफोन वापरले, जे हे आवाज रेकॉर्ड करू शकतात. सिग्नल प्रोसेसिंगच्या मदतीने, प्रत्येक डॉल्फिनचा विशिष्ट आवाज अचूकपणे ओळखता येतो, असे WII च्या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या अंतिम मूल्यांकनासाठी या दोन्ही पद्धतींमधून मिळालेले निष्कर्ष गणितीय तंत्रांचा वापर करून एकत्र केले गेले. आणि अशाप्रकारे शास्त्रज्ञांनी डॉल्फिनची संख्या मोजण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.

डॉल्फिनला अनेक गंभीर धोके आहेत. 

मासेमारीच्या जाळ्यात अडकून त्यांचा अपघाती मृत्यू होणे हा सर्वात मोठा धोका आहे. इतर प्राण्यांप्रमाणे डॉल्फिनची शिकार केली जात नाही. पण ते मासेमारीच्या जाळ्यात अडकतात आणि श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू होतो. नायलॉन आणि पॉलिथिनच्या मोठ्या जाळ्या त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहेत. असे भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या (WCT) अहवालात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेच्या (IUCN) रेड लिस्टनुसार, गंगा नदीतील डॉल्फिन ‘एंडेंजर्ड’ म्हणजे धोक्यात असलेली प्रजाती म्हणून वर्गीकृत आहेत. अंदाजे 4%-5% डॉल्फिन मासेमारीच्या जाळ्यात अडकून मरतात. WCT च्या अहवालात असेही म्हटले आहे की, काहीवेळा जाळ्यात अडकलेल्या डॉल्फिनना तेल काढण्यासाठी मारले जाते. त्यांच्या चरबीतून काढलेले तेल (ब्लबर) भारत आणि बांगलादेशात माशांना पकडण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे, डॉल्फिनच्या संरक्षणासाठी मासेमारीच्या पद्धतींमध्ये बदल करणे आणि त्यांच्या शिकारीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

golden year for Indian women athletes : या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत भारतीय महिला खेळाडूंनी जी जबरदस्त कामगिरी केली आहे.
A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक
Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ