भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी 10 मे 2025 रोजी पत्रकार परिषद घेत भारत – पाकिस्तान दरम्यान हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या डिजीएमओ (Director General of Military Operations ) ने भारतीय डिजीएमओ यांना दुपारी 3.30 वाजता फोन करुन याविषयी चर्चा केली. यानुसार दोन्ही देशादरम्यान सुरू असलेले हल्ले पूर्ण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं पालन दोन्ही देशातील तिन्ही दलांकडून केलं जाईल. तसंच 12 मे 2025 रोजी दोन्ही डिजिएमओ दरम्यान चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "Pakistan's Directors General of Military Operations (DGMO) called Indian DGMO at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air… pic.twitter.com/k3xTTJ9Zxu
— ANI (@ANI) May 10, 2025
सैन्य दलाची पत्रकार परिषद
हल्ले थांबवण्याच्या निर्णयाच्या घोषणेनंतर भारतीय संरक्षणदलाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानने केलेल्या दाव्यांचं खंडण केलं आहे. पाकिस्तानने भारतीय भूभागाचं आणि एयर बेसचं नुकसानं केल्याचा चुकीचा दावा करत आहे. उलटपक्षी पाकिस्तानी हल्ल्यानंतर भारतानं स्वसंरक्षणादाखल दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी भू भाग आणि एयरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याशिवाय भारतीय सैन्याने मशिदीवर हल्ला केल्याची खोटी माहिती पाकिस्तानकडून पसरवली जात आहे. भारतीय सैन्याने याचं खंडण करताना म्हटलं आहे की, भारतीय सैन्य हे सेक्युलर असून आमचा घटनेवर पूर्ण विश्वास आहे. कोणत्याही धर्माची अवहेलना होईल असं कोणतंही कृत्य भारतीय सैन्याकडून झालेलं नाही. तसंच पाकिस्तानच्या चुकीची माहिती पसरवण्यावर आळा घातला पाहिजे असं मत कमांडर नायर यांनी व्यक्त केलं.
#WATCH | Delhi: Commodore Raghu R Nair says, " There has been understanding that has been reached to stop all military activities at sea, on the air and on land. Indian army, Indian Navy and Indian Air Forces have been instructed to adhere to this understanding…" pic.twitter.com/3FUGQp22Sw
— ANI (@ANI) May 10, 2025
भारत सरकारचा निर्णय
दरम्यान भविष्यात पाकिस्तानकडून होणारी कोणतंही दहशतवादी कृत्य हे भारताविरुद्ध युद्धाची कृती असल्याचं मानून भारत त्यानुसार पाकिस्तानला प्रत्युत्तर देईल, असा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. याला ‘अॅक्ट ऑफ वॉर’ असं म्हटलं जातं.
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यापासून या दोन्ही देशांदरम्यानचा तणाव जास्त प्रमाणात वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच पाकिस्तानी सैन्याने सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर तर पाकिस्तानने जाहीरपणे भारतावर बाँम्ब आणि मिसाईल हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हे हल्ले प्रामुख्यांने नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी केले जात आहेत. भारत ही या हल्ल्यांना प्रत्यूत्तर देत आहे. मात्र, आता भारताने कठोर निर्णय घेतला आहे. भारत सरकारने म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या यापुढच्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला युद्ध कृत्य म्हणजे ‘अॅक्ट ऑफ वॉर’ म्हणून ग्राह्य धरलं जाईल. जर आता पाकिस्तानने भारतावर यापुढे एकही ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला तर हे कृत्य सीमाभागातला ताणतणाव वाढवणारं कृत्य म्हणून घोषित केलं जाईल.
हे ही वाचा : युद्ध आणि शेअर मार्केट
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ‘अॅक्ट ऑफ वॉर’ कधी घोषित केलं जातं?
जेव्हा एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर सशस्त्र आक्रमण करतं तेव्हा त्या कृतीला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ‘अॅक्ट ऑफ वॉर’ असं म्हटलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये याची नेमकी व्याख्या नाही. तरी एखाद्या देशाने शस्त्रास्त्रांचा वापर करणे हे युद्ध घोषित करण्याची पद्धत आहे असं स्पष्ट केलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कलम 2(4) नुसार, “सदस्य राष्ट्रांना दुसऱ्या राज्याच्या प्रादेशिक अखंडतेविरुद्ध किंवा राजकीय स्वातंत्र्याविरुद्ध बळाचा वापर करण्यास मनाई आहे. तथापि, जर सशस्त्र हल्ला झाला किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने कारवाईला परवानगी दिली असेल तर कलम 51 स्वसंरक्षणार्थ बळाचा वापर करण्याची परवानगी देते.”
म्हणून, जेव्हा एखादा राष्ट्र दुसऱ्या देशाच्या शत्रुत्वाच्या कृतीला “युद्धाची कृती” म्हणून घोषित करतो, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार परवानगी असलेल्या लष्करी बळाने किंवा स्वसंरक्षणाने प्रतिसाद देऊ शकतो.
भारताची भूमिका: दहशतवाद = ‘अॅक्ट ऑफ वॉर’
भारत आता भविष्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्ध म्हणून पाहिल आणि त्यानुसार प्रत्युत्तर देईल असा निर्णय आता भारत सरकारने घेत, दहशतवादी कृत्यांविरोधात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, सद्य घडामोडी पाहता दोन्ही देशांनी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा तणाव संपूर्ण निवळला आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. आणि मुख्यत: पाकिस्तान या निर्णयाची कितपत अंमलबजावणी करेल याविषयी साशंकता आहे.