राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

राजकोेट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा
नौदलासारख्या संस्थेने केलेले काम हे चिरंतन टिकण्याएवढे मजबूत असते, अशी खात्री असते.
[gspeech type=button]

सिंधुदुर्गा शेजारील जंजिरे राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट आणि जलदुर्ग साडे तीनशे वर्षांनंतरही शाबूत असताना, महाराजांचा पुतळा उभारण्यातली सरकारची हलगर्जी लाजीरवाणी आहे. आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते अनावरण केलेला पुतळा अवघ्या एका वर्षाच्या आतच  कोसळला.

राजकोेट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा

सहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होतं 35 फुटी पुतळ्याचे उद्धाटन

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 35 फुटांचा होता. तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखल जातं आणि भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्यात आला होता.

खरंतर, नौदलासारख्या संस्थेने केलेले काम हे चिरंतन टिकण्याएवढे मजबूत असते, अशी खात्री असते. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील आणि त्या गोष्टीची आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबूतीकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही?

शिवछत्रपतींचे हे स्मारक इतक्या घाई गडबडीत का तयार करण्यात आलं?

शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर त्यांना निवडणुकीसाठी करायचा होता का? पण हे करत असताना या पुतळ्याच्या मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष झालं. किल्याचा एक एक दगड हा शिवाजी महाराजांच्यासोबतच स्वराज्याशी असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडून कित्येक गोष्टीत आपण प्रेरणा आणि स्फूर्ती घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे  भले उंच पुतळे तयार करणे आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही विचार आपण केला पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ