ई – स्वॅप बॅटरी स्टेशन्स प्रकल्पामध्ये महामुंबई मेट्रोची भागीदारी

E-SWAP Battery Stations : मुंबईभर पसरलेल्या मेट्रो आणि मोनोरेलच्या स्थानकांवर ईःस्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. 
[gspeech type=button]

मुंबईभर पसरलेल्या मेट्रो आणि मोनोरेलच्या स्थानकांवर ईःस्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. 

या हरित उपक्रमांतर्गत 25 मेट्रो स्थानके आणि 6 मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविलं जाणार आहे. त्यामुळे, मुंबई हे सार्वजनिक परिवहन सेवेशी ईव्ही बॅटरी पायाभूत सुविधा जोडणारं भारतातलं अग्रगण्य शहर ठरणार आहे. 

मेट्रो आणि मोनोच्या निवडक स्थानकांच्या बाहेर होंडाने त्यांची ई – स्वॅप सिस्टीम बसविण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रणालीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे वापरकर्ते त्यांच्या चार्ज संपलेल्या होंडा मोबाइल पॉवर पॅक ई: बॅटरीऐवजी दुसरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी केवळ दोन मिनिटांत घेऊ शकतात.

कुठे असणार ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स :

1) मेट्रो 7 मार्गिका (लाल मार्गिका) :

गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान

2) मेट्रो 2ए मार्गिका ( पिवळी मार्गिका) :

दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड पश्चिम, लोअर मालाड, बांगूर नगर, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम

3) मोनोरेल स्थानके :

संत गाडगे महाराज चौक, मिंट कॉलनी, नायगाव, वडाळा, फर्टिलायझर टाऊनशिप, चेंबूर

या सर्व ठिकाणी इन्स्टॉलेशन करताना सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणासंदर्भातील निकषांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून दररोज ईव्ही वापरणाऱ्यांसाठी, विशेषतः डिलिव्हरी एजंट्स आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी सोपा ॲक्सेस आणि वापरसुलभतेची खात्री करण्यात येणार आहे.

उत्पन्न

ई:स्वॅप उपक्रम हा पर्यावरणदृष्ट्या शाश्वत आहेच, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. यामुळे एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे 30 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. परिणामी, एकीकडे आत्मनिर्भरता वाढेल आणि दुसऱ्या बाजूला हरित वाहतुकीला चालना मिळेल.

होंडा ई – स्वॅप काय आहे?

होंडाचा ई – स्वॅप हा इलेक्ट्रिक टू – व्हीलर आणि तीन चाकी वाहनांसाठी नेक्स्ट जनरेशन बॅटरी स्वॅपिंग प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या चार्ज संपलेल्या बॅटरीच्या जागी होंडाची पूर्ण चार्ज केलेली मोबाइल पॉवर पॅक बॅटरी बसवता या ठिकाणावरुन घेता येईल. 

चार्जिंगसाठी लागणारा वेळ, रेंजविषयी असलेली चिंता या महत्त्वाच्या समस्या या सिस्टीमुळे सोडविल्या जातात. त्यामुळे मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या शहरात डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्ती, दैनंदिन प्रवासी आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी ईव्ही स्विकारणं जास्त व्यावहारिक होईल.

पर्यावरणस्नेही निर्णय

एमएमएमओसीएलच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत उचलण्यात आलेले हे एक मोठे पाऊल आहे. या अंतर्गत पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजना आणि स्मार्ट लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्याच्या धोरणामध्ये भर घातली आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष, डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमएमओसीएलच्या 29 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आलं. त्यानुसार, पहिले ई:स्वॅप केंद्र दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर कार्यान्वित झाल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि एमएमएमओसीएलचे अध्यक्ष, डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

ईव्ही धोरणांतर्गत अनेक खासगी कंपन्या मेट्रो 2 ए आणि 7 या मार्गांशी संलग्न असलेल्या भागांत अशा प्रकारची बॅटरी स्वॅपिंग केंद्रे उभारून या पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी www.mmmocl.co.in  या वेबसाइटला भेट देऊन माहिती घेता येईल..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

MMRDA and L&T Dispute : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाणे ते घोडबंदर रस्ते कामासंबंधीची निविदा प्रक्रिया रद्द करत असल्याचा निर्णय मुंबई
Maharashtra Rain : कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार सोमवार दिनांक 26 मे सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई भागात 135 मिमी पाऊस पडल्याची नोंद
Dr. Jayant Narlikar : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज पुणे इथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 87

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ