बोका शौल – अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेला तांदूळ, जो न शिजवता खाल्ला जातो!

Boka Saul Rice : आज आपण अश्या एका तांदळा बद्दल जाणून घेणार आहोत. जो न शिजवता खाता येतो आणि तितकाच तो चविष्ट लागतो. त्याचबरोबर  या भातामधून प्रोटीनही जास्त मिळत. आता प्रोटीन म्हटलं की आपल्याला डाळी, कडधान्य, अंडी आणि चिकन आठवतं. पण या भातामध्ये अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन मिळतात. या भाताची लागवड करून शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकतात. या तांदळाचे नाव 'बोका शौल’ (Boka Saul Rice) आहे. आसाममध्ये या भाताचे पिक सर्वाधिक घेतलं जाते.
[gspeech type=button]

आज आपण अश्या एका तांदळा बद्दल जाणून घेणार आहोत. जो न शिजवता खाता येतो आणि तितकाच तो चविष्ट लागतो. त्याचबरोबर  या भातामधून प्रोटीनही जास्त मिळत. आता प्रोटीन म्हटलं की आपल्याला डाळी, कडधान्य, अंडी आणि चिकन आठवतं. पण या भातामध्ये अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन मिळतात. या भाताची लागवड करून शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकतात. या तांदळाचे नाव ‘बोका शौल’ (Boka Saul Rice) आहे. आसाममध्ये या भाताचे पिक सर्वाधिक घेतलं जाते.

आसामी भाषेत ‘बोका’ म्हणजे चिखलासारखा मऊ, तर ‘शौल’ म्हणजे तांदूळ. काही ठिकाणी या तांदळाला  ‘कोमल शौल’ असंही म्हणतात. चला, तर मग जाणून घेऊ या भाताविषयी…

बोका शौल तांदूळ कसा खायचा?

बोका शौल भात खाणं खूप सोपं आहे. हा भात न शिजवता खाल्ला जातो. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. हे तांदूळ 30 मिनिटे कोमट किंवा थंड पाण्यात भिजवून ठेवायचे, थोड्याच वेळात तुमचा भात तयार. गॅस किंवा चुलीवर शिजवायची गरज नाही. हा भात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ, दूध किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तुम्ही हा तांदूळ  शिजवून देखील खाऊ शकता, पण या भाताची खरी चव भिजवल्यानंतरच येते. 

बोका शौलमध्ये कोणते पोषक घटक आहेत?

आरोग्यासाठी फक्त प्रोटीनच नाही, तर बोका शौल भातात भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत. प्रोटीन , फायबर , मँगनीज, लोह, सेलेनियम, नियासिन, फोलेट आणि तांबे यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वं या मध्ये आहेत. असं म्हणतात की, हा तांदूळ आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्यासही मदत करतो. त्यामुळे उन्हाळ्यात तर तो खूपच उपयुक्त ठरतो. आसाममधील गर्भवती महिलांना हा तांदूळ आवर्जून खायला देतातच.

हे ही वाचा : साखरेऐवजी गूळ का खावा?  

GI टॅग मिळालेला ‘खास’ तांदूळ

बोका शौल तांदळातील या खास वैशिष्ट्यांमुळे या तांदळाला 2018 मध्ये GI टॅग (Geographical Indication Tag) मिळाला आहे.बोका शौलचा भाताचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि त्याचा संबंध थेट आसामशी जोडलेला आहे. याचमुळे भारत सरकारने त्याला GI टॅग दिला. याशिवाय, हा तांदूळ भारतातील फोर्टिफाइड खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

बोका शौल तांदूळ कसा पिकवला जातो

बोका शौल तांदूळ आसाम बरोबरच आता पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही  पिकवला जातो. हा तांदूळ खायला जेवढा सोपा आहे, तेवढाच तो पिकवायला कठीण आहे. अर्धा एकर शेतातून फक्त पाच पोती तांदळाचं उत्पन्न मिळतं. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत, बोका शौल 145 दिवसांत पिकून काढणीला येतो.

बोका शौल तयार करण्याची पारंपरिक पद्धत

प्रत्येक तांदळात दोन प्रकारचे स्टार्च असतात एक म्हणजे अमायलोस (Amylose) आणि दुसरा अमायलोपेक्टिन (Amylopectin). अमायलोसमुळे तांदळाला कडकपणा येतो. आणि अमायलोपेक्टिनमुळे तांदळाला चिकटपणा येतो.

बोका शौल हा ‘ग्लुटिनस राईस’ (Glutinous Rice) प्रकारात मोडतो. याचा अर्थ या तांदळात अमायलोसचं प्रमाण खूप कमी आणि अमायलोपेक्टिनचं प्रमाण खूप जास्त  असतं. म्हणूनच हा तांदूळ इतका मऊ आणि चिकट असतो की त्याला शिजवण्याची गरजच पडत नाही.

बोका शौलची कापणी झाल्यावर तो  मातीची भांडी किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये साठवला जातो. मग तांदळाचा भुसा काढला जातो आणि तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी, लोखंडी मोठ्या कढईत आगीवर तासभर तरी हा तांदूळ उकळला जातो. नंतर त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकून, तांदूळ 6 ते 8 दिवस उन्हात वाळवला जातो.

तांदळाची गुणवत्ता चांगली राहावी म्हणून, ही सगळी प्रक्रिया जास्तीत जास्त 24 तासांच्या आत पूर्ण करावी लागते. यापेक्षा जास्त वेळ लागल्यास तांदूळ खराब होऊ शकतो. उन्हात वाळवलेला तांदूळ नंतर सावलीत ठेवला जातो, जेणेकरून तांदळातील ओलाव्याचे प्रमाण सारखे होईल.

या खास प्रक्रियेमुळेच बोका शौल तांदळाचे दाणे पिवळसर रंगाचे होतात आणि त्याला 3 ते 5 महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतं. यामुळे त्यातलं अमायलोसचं प्रमाण आणखी कमी होऊन 8-12% पर्यंत येतं. आणि म्हणून हा भात अजूनच मऊ होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ