मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत पैशाचा व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी?

Finance : जर तुम्हाला माहीत असेल समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे परत देणार नसेल, त्याला पैसे मागण्याची सवय आहे, किंवा त्याला खरंतर पैशाची गरज चुकीच्या गोष्टीसाठी असेल तर स्पष्टपणे पैसे द्यायला नकार द्या. यामुळे तुमची मैत्री किंवा नात्यात दुरावा येईल पण शेवटी तुमचं पैशाचं नुकसान टळेल आणि चुकीच्या गोष्टीसाठी पैसे न दिल्याचं समाधानही मिळेल.  
[gspeech type=button]

महिनाअखेर किंवा एखाद्यावेळी अचानक काही मोठा खर्च आला की, आपण आपल्या कुटुंबियांकडून किंवा मित्रपरिवाराकडून पैशांची मदत मागतो. पुढचा पगार आला की, लगेच पैसे परत देतो असं आश्वासन आपण देत असतो. कधी आपण मदत मागतो तर कधी आपल्याकडून ही मदत घेतली जाते. कमी रक्कम असेल आणि मागणारा व्यक्ती नियमित पैसे परत करत असेल, मदतीची अत्यावश्यकता असेल तर त्यानुसार प्रत्येकजण निर्णय घेत असतो. 

काही वेळेला काही जणांना दर महिन्याला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पैसे मागण्याची सवय लागते. हे पैसे परत दिले जरी जात असले तरी ही सवय चुकीची आहे. यातून आपण पैशाचं योग्यप्रकारे नियोजन करीत नाही, आपल्या कमाईपेक्षा खर्च अधिक करतो हे यातून स्पष्ट होतं. 

तर काही वेळेला खूप गरज आहे असं सांगून आपल्याकडून पैसे घेतले जातात ते परत दिलेच जात नाही. अशावेळी आपलं आर्थिक नुकसान होतं. शिवाय त्या व्यक्तिसोबत असलेलं मैत्री किंवा कौटुंबिक नात्यातही कटूता येते. यामुळे शेक्सपियर सांगतात तसं की, “मित्र परिवारात किंवा कुटुंबातील कोणत्या व्यक्तिकडून पैसे कधी उधारीवर घेऊ नका किंवा देऊही नका. कारण पैसे बुडवल्यावर तो व्यक्ती आणि नातंही आपण गमावतो.”

पण पैसे दिले नाहीत तर अशावेळीही आपल्या या नात्यात कटूता येऊ शकते. त्यामुळे पैसे द्यायचे की नाही किंवा  जर आपण पैसे उधारीवर देत असू वा घेत असू तर काय खबरदारी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेऊयात. 

नाही म्हणण्यास शिका 

अनेकदा आपल्याला माहीत असतं की समोरच्या व्यक्तीला दर महिन्याला पैसे मागण्याची  वाईट सवय लागलेली आहे. पण आपल्याला नाही म्हणता येत नाही म्हणून आपण हे पैसे देत असतो. ‘फक्त 500 रुपयेच पाहिजेत, 1000 चं पाहिजेत. जाऊ देत, देऊया,’ असं म्हणत आपण पैसे देत जातो. पण हेच 500-1000 रुपये मोजले तर वर्षाअखेर मोठी रक्कम होते. हे पैसे परत मिळाले नाहीत तर तितकं नुकसान तुम्हाला सहन करावं लागतं. त्यामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात. तुम्हाला कठोर राहून ‘नाही’ म्हणता आलं नाही, याची ही शिक्षा असते याची जाणीव खूप उशिराने होते. त्यामुळे जर तुम्हाला माहीत असेल समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे परत देणार नसेल, त्याला पैसे मागण्याची सवय आहे, किंवा त्याला खरंतर पैशाची गरज चुकीच्या गोष्टीसाठी असेल तर स्पष्टपणे पैसे द्यायला नकार द्या. यामुळे तुमची मैत्री किंवा नात्यात दुरावा येईल पण शेवटी तुमचं पैशाचं नुकसान टळेल आणि चुकीच्या गोष्टीसाठी पैसे न दिल्याचं समाधानही मिळेल.  

हा नकार देताना तुम्ही नम्रपणे नाही म्हणू शकता. जसं की, “सॉरी मी आपल्याला मैत्रीमध्ये पैशाचे व्यवहार करु इच्छित नाही, पैसे उधारीवर देण्याइतपत माझ्याकडे पैसे नाही आहेत” अशा पद्धतीने नकार देऊ शकता. नकार देताना समोरच्या व्यक्तिला तुमचे खर्च किती आहेत, खात्यात किती आहेत, त्याची तुम्हाला कशी गरज आहे अशा सगळ्या गोष्टी सांगण्याची खरचं काही गरज नसते. तसं करुही नये. कारण तुम्ही जितकी कारणं देत जाल तितकी समोरची व्यक्ती तुम्हाला पैसे देण्यासाठी विनंती करत राहू शकते. 

हे ही वाचा : आयटीआर भरायचा आहे.. पण फॉर्म 16 घेतला का?

योग्य कारणांसाठी जरुर आर्थिक मदत करा

कधीही कुणाला पैसे उधार देताना भावनिक होऊन निर्णय न घेता व्यावहारिकपणाने निर्णय घ्यावा. मित्रांची वा कौटुंबिक सदस्याची दया येते म्हणून पैसे देत असाल तर ते पैसे परत मिळतील अशी निदान अपेक्षा तरी ठेवू नका. मग तुम्ही त्या व्यक्तिला आर्थिक मदत करत आहात असं समजा. 

जर समोरचा व्यक्ती बेजबाबदार असेल, पैशांचा योग्य वापर न करता उधळपट्टी करत असेल, पैसे परत करेल याची शाश्वती नसेल तर अशा व्यक्तिंना पैसे न दिलेले उत्तम. 

जेव्हा कधी पण तुमच्याकडून कोणी काही काळासाठी पैसे उधारीवर मागत असतील तर ते कशासाठी हवे आहेत हे जरुर विचारा. कारण माहीत झाल्यावर पैसे द्यायचे की नाही याचा तुम्हाला निर्णय घेता येईल. समोरची व्यक्तीची आर्थिक पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असेल तर खरंच त्या व्यक्तीला पैशांची गरज आहे की नाही याची खातरजमा करुन मग तुम्हाला पैसे देण्याविषयी निर्णय घेता येईल. 

पूर्ण रक्कम उधार देऊ नका

काही वेळेला आपल्याकडून पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तिला वैद्यकीय गरजेसाठी किंवा अन्य कोणत्या गरजेसाठी अत्यावश्यकता असते. अचानक नोकरी सुटलेली असू शकते, एखाद्या महिन्यात अनपेक्षित खर्च आला असेल तर मदतीची गरज लागू शकते. अशावेळी त्या व्यक्तिला किती पैसे हवे आहेत? जर जास्त पैसे हवे असतील आणि लगेच पुढच्या महिन्यात हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत, किंवा त्या व्यक्तिला इच्छा असूनही इतके पैसे परत देणं शक्य होणार नसेल तर तुम्हाला खरंच तितके पैसे उधारीवर देणं शक्य आहे का याची तपासणी करावी. कारण पैशाचं सोंग आणता येत नाही. पुढच्या महिन्यात तुम्हाला चणचण भासली तर? किंवा समोरच्या व्यक्तिची परिस्थिती अतिशय हलाखीची असेल, ती व्यक्ति हे पैसे तुम्हाला परत करुच शकत नसेल तर तितकं नुकसान सहन करण्याची तुमची ऐपत आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घेणं गरजेचं आहे. 

दिलेले पैसे परत मागण्यासाठी लाज बाळगू नका

हा सगळा विषय चर्चा करण्याचं कारण आहे ते दिलेले पैसे बुडण्याचं. आपण अनेकदा सढळ मनाने कोणाला पैशाची गरज असेल, आपल्याकडे पुरेसे असतील तर त्यांना देत असतो. मात्र, समोरचा व्यक्ती पैसे देण्यासाठी कधी टाळाटाळ करतो किंवा त्याच्याजवळ पुरेसे पैसे असल्यावरही आपले पैसे खूप उशीरा देत असतो. यामुळे आपली चिडचिड होते, आपले पैसे बुडाल्याची भावना निर्माण होते. बरं, त्या व्यक्तिकडे पैसे परत मागण्याची आपल्याला लाज वाटते म्हणून ती व्यक्ति स्वत:हून पैसे देऊपर्यंत वाट पाहत बसतो. त्यामुळे तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मागण्यासाठी कधीच लाज बाळगू नका. ते तुमच्या मेहनतीचे पैसे होते याची जाणीव ठेवा. जरी ती रक्कम छोटी असेल तरीही ते परत मागणं उत्तम असतं. 

हे ही वाचा : तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत आहात मग ‘या’ टिप्स तुमच्यासाठी

दिलेल्या पैशाच्या हिशोबाबद्दल नोंदी ठेवा 

काही वेळा आपण मदत म्हणून मोठ्या रकमा देऊ करतो. मात्र हे पैसे परत कधी देणार, किती पैसे कशा स्वरुपात, चेक की रोख रक्कम दिली आहे याची कुठेच नोंद करत नाही. यामुळे आपण पैसे दिल्याचं समोरचा व्यक्ति नाकारु शकत नाही. तसेच कधी परत करणार याची लिखीत नोंद असेल तर त्या आधारावर पैसे परत मागणं सोईचं जातं. हा शेवटी पैशाचा व्यवहार असतो. त्यामुळे त्यामध्ये व्यावहारिक राहत हिशोब ठेवणं आवश्यक आहे. यासाठी कोणता स्टँम्प पेपर असला पाहिजे असं नाही. तर जर तुम्ही मोठी रक्कम देत असाल तर दोन्ही बाजुंनी दोन साक्षिदारांसमोर एका साध्या पेपरवर पैसे देत असल्याची तारीख, दिवस, कारण, पैसे कधी परत करणार त्याची माहिती, घेणारा आणि देणाऱ्याचं नावं आणि स्वाक्षरी इतकी माहिती दिलेली असावी. 

कुटुंबाला माहिती देणे

एखाद्या मित्राला वा नातेवाईकाला आर्थिक मदत करणं हे तुमच्या जोडीदाराला, पालकांना कदाचित आवडत नसेल. याला अनेक कारणं असू शकतात. तरिही जर का तुम्ही कोणाला पैशांची मदत करु इच्छित असाल तर ती गोष्टी कुटुंबियांपासून लपवून ठेवू नका. त्यांना तुम्ही का मदत करत आहात हे विश्वासात घेऊन पटवून द्या. जेणेकरुन जर तुमचं नुकसान झालं वा पैसे परत मागण्यावरुन काही अनुचित घडलं तर तुमचं कुटुंब तुमच्या मदतीसाठी तुमच्या बाजुने उभं असेल. त्यामुळे पैसे देत असल्याच्या वा घेत असल्याच्या नोंदी कुटुंबियांना सांगणं आणि त्यांना अशा व्यवहारांची माहिती देणं गरजेचं आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक
Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ
नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं की, “एअरलाईनच्या सर्व फ्लाईट कर्मचाऱ्यांमध्ये आजारपणाच्या वैद्यकीय रजेचं प्रमाण वाढलं आहे.” अहमदाबाद

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ