GSB Ganpati 2024 : मुंबईतील GSB सेवा मंडळाने गणपती महोत्सवासाठी उतरवला 400 कोटी रूपयाचा विमा

जीएसबी मंडळाचा बाप्पा
मुंबईतल्या सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी 400 कोटी रूपयाचा विमा उतरवला आहे. बाप्पांच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने आणि आभूषणांचा वापर केला जातो. अशावेळी कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये व अनुचित प्रकार टाळण्यासाठी या मंडळाकडून दरवर्षी विमा उतरवला जातो.
[gspeech type=button]

 

जीएसबी सेवा मंडळाचा बाप्पा

 

मुंबईतल्या सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी 400 कोटी रूपयाचा विमा उतरवला आहे. बाप्पांच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने आणि आभूषणांचा वापर केला जातो. अशावेळी कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये व अनुचित प्रकार टाळण्यासाठी या मंडळाकडून दरवर्षी विमा उतरवला जातो.

जीएसबी मंडळाचं यंदा 70 वर्ष

यावर्षी जीएसबी गणेशोत्सव मंडळ 70 वं वर्ष साजरं करत आहे. गौड सारस्वत ब्राह्मण असं या मंडळाचं नाव आहे. या मंडळाची स्थापना 1951 साली विजयादशमीच्या पवित्र दिवशी करण्यात आली. मुंबईच्या किंग्ज सर्कल परिसरात असलेलं हे मंडळ सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणून ओळखलं जातं.

 

जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने विमा रक्कमेत केली वाढ

यावर्षी जी.एस.बी. गणेशोत्सवासाठी 400 कोटी 58 लाखांचा विमा काढला आहे. या मंडळाकडे 66 किलोपेक्षा जास्त सोनं आणि 325 किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने आहेत, ज्यांनी दरवर्षी बाप्पांची मूर्ती सजवली जाते. तसचं सजावटीसाठी इतर मौल्यवान वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे या मंडळाकडून दरवर्षी विमा उतरवला जातो. 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे 316 कोटी आणि 340 कोटींचा विमा काढलेला, अशी माहिती GSB गणपती सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी दिली.

जीएसबी मंडळाचे गणपती बाप्पा

यंदाच्या जीएसबी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य

जीएसबी गणेश मंडळाची मूर्ती ही दाक्षिणात्य शैलीतली मूर्ती असते. विशेष म्हणजे शाडू मातीपासून बनवली जाणाऱ्या या मुर्तीची रचना ही बदलली जात नाही. शाडू मातीसोबतच मूर्ती घडवण्यासाठी गवताचाही वापर केला जातो. मात्र, त्यानंतर बाप्पांना संपूर्ण सोन्याच्या दागिन्याने सजवलं जातं. महत्त्वाचं म्हणजे सर्वात श्रीमंत मंडळ असूनही या मंडळाकडून पाच दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला जातो. तसंच गणेशोत्सवा दरम्यान या मंडळात 24 तास पूजा, अन्नदान आणि सेवा सुरू असते. तसेच पाच दिवसांच्या या महोत्सवात दररोज पूजांचं आयोजन करण्यात येतं. दिवसाला अंदाजे 20,000 लोक आणि एकूण 100,000 लोक अन्नदानात सहभागी होतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Pandharpur Wari 2025 : आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान देणार
Telangana chemical company blast : सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी तेलंगणा इथल्या एका रासायनिक कारखान्यात अणुभट्टीचा (रिएक्टर) स्फोट झाला.
1st July : जुलै महिन्याच्या आजच्या या पहिल्या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टींमध्ये बदल घडणार आहेत. आर्थिक,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ