घरातला प्लास्टिक कचरा कमी करून पर्यावरणाचे रक्षण कसे कराल? चला समजून घेऊया

Plastic waste : स्नॅकचे रॅपर, खाण्याच्या वस्तूंची पॅकेट्स, लहान मुलांची तुटलेली खेळणी , कचऱ्याचे भरलेले डबे बघून आपल्यालाच त्याचा ताण येतो. पण हा कचरा कमी करणं अजिबात कठीण नाही. यासाठी तुम्ही डिस्पोजेबल वस्तूंच्या ऐवजी पुन्हा वापरात येणाऱ्या वस्तूंचा उपयोग करू शकता. 
[gspeech type=button]

पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर अलीकडे खूप भर दिला जात आहे. यासाठी जगजागृती मोहिमांशिवाय प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरू शकणाऱ्या वस्तूंची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तरीही, काही वेळेला आपल्याही नकळत घरात प्लास्टिक कचरा निर्माण होतोच. आपण अनेकदा बाहेरून पाणी बॉटल विकत घेतो आणि ती बाटली फेकून न देता घरी तशीच ठेवतो. या अशा छोट्या मोठ्या वस्तूंमुळेच घरामध्ये वापरात नसलेल्या वस्तूंचा कचरा वाढत जातो.

स्नॅकचे रॅपर, खाण्याच्या वस्तूंची पॅकेट्स, लहान मुलांची तुटलेली खेळणी , कचऱ्याचे भरलेले डबे बघून आपल्यालाच त्याचा ताण येतो. पण हा कचरा कमी करणं अजिबात कठीण नाही. यासाठी तुम्ही डिस्पोजेबल वस्तूंच्या ऐवजी पुन्हा वापरात येणाऱ्या वस्तूंचा उपयोग करू शकता.

थोडं स्मार्ट शॉपिंग केलं आणि आपल्या घरातल्या इतर व्यक्तींना, लहान मुलांना चांगल्या सवयी लावल्या तर, घरातला कचरा तर कमी होईलच त्याचबरोबर पर्यावरणालाही याचा फायदा होईल. आज आपण यासाठीच असे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत, जे तुम्ही सहज करू शकता.

1.रियूजेबल वस्तूंचा वापर करा

आपल्या घरातला रोजचा कचरा वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे ‘एकदा वापरून फेकून द्यायच्या’ वस्तू. यात प्लास्टिकच्या प्लेट्स, ग्लास , कागदी नॅपकिन आणि बेबी वाईप्स सारख्या अनेक गोष्टी येतात. पण हा कचरा तुम्ही कमी करू शकता.

कागदी नॅपकिन वापरण्याऐवजी तुम्ही जुन्या कपड्यांचे तुकडे कापून ते वापरू शकतो. हे तुकडे वापरून झाल्यावर धुवून पुन्हा वापरता येतात. प्लास्टिकच्या क्लिंग फिल्मऐवजी सिलिकॉन झाकणं वापरता येतात. यामुळे वस्तू चांगल्या राहतात आणि कचराही होत नाही.

तुमच्या मुलांना तुम्ही स्वतःचा नॅपकिन किंवा पाण्याची बाटली वापरायला शिकवा. यामुळे त्यांनाही कचरा कमी करण्याची सवय लागेल. शिवाय, वापरलेले कपडे किंवा नॅपकिन धुतल्यावर वाळत घालण्यासाठी किंवा घडी घालण्यासाठी त्यांची मदत घ्या. घरातला कचरा तर कमी होईलच, पण मुलांनाही जबाबदारीची जाणीव होईल.

2. स्मार्ट खरेदी करा

कचरा कमी करण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे विचारपूर्वक खरेदी करणं. कारण जास्त कचरा हा पॅकेजिंगमधून येतो. या वस्तू अशा प्लास्टिकपासून बनवता की ज्या पुन्हा वापरता येत नाहीत.अशावेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास कचरा नक्कीच कमी होऊ शकतो.

पास्ता, ओट्स, शेंगदाणे, तांदूळ यासारख्या सुक्या वस्तू तुमच्या स्वतःच्या कंटेनर्समध्ये भरा. प्लास्टिकच्या पिशवीतील दुधाऐवजी काचेच्या बाटलीत मिळणारं दूध घ्या. या बाटल्या पुन्हा वापरल्या जातात आणि पर्यावरणाला मदत होते.

जर तुम्ही रिफिल दुकानात गेलात तर मुलांना वस्तूंचे वजन करायला सांगा. घरी आणल्यावर वेगवेगळ्या जारला नावाचे लेबल लावायलाही त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. यामुळे त्यांनाही चांगल्या सवयी लागतील.

3.पॅकेजिंग नसलेल्या वस्तू निवडा

बरेचदा आपण पाहतो की, बाजारात केळीसारखी नैसर्गिक फळं आणि भाज्यासुद्धा प्लास्टिकमध्ये पॅक केलेली असतात. यामुळे पुन्हा प्लॅस्टिकचा कचरा वाढतो. हा कचरा टाळण्यासाठी, तुम्ही पॅकेजिंग नसलेल्या वस्तू निवडू शकता.

खरेदी करताना पॅक केलेली फळं आणि भाज्या घेण्याऐवजी, सुट्टी फळं आणि भाज्या निवडा. यामुळे प्लास्टिकचा वापर टाळता येईल. स्थानिक बाजारात खरेदी केल्यास अशा वस्तू सहसा पॅकेजिंगशिवाय मिळतात. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही मदत होईल.

खरेदीला जाताना घरातूनच कापडी पिशव्या घेऊन जा. यामुळे प्रत्येक वेळी दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्या घ्याव्या लागणार नाहीत.

हेही वाचा :दूधाच्या पिशव्या पॅकेजिंगला पर्याय मिळेल का?

4.कंपोस्टिंग सुरू करा

घरातल्या कचऱ्यामध्ये खाद्यपदार्थ तयार करताना जास्त कचरा निर्माण होतो. पण हा कचरा फेकून देण्याऐवजी आपण त्याचा उपयोग कंपोस्ट खत बनवण्यासाठी करू शकतो. कंपोस्टिंग म्हणजे ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याची प्रक्रिया. यामुळे कचरा कमी होतोच, पण झाडांसाठी उत्तम पोषक मातीही तयार होते.

फळं आणि भाज्यांची साले, उरलेले अन्न, अंड्यांची टरफलं, कॉफी पावडर आणि बागेतील पालापाचोळा कंपोस्ट करण्यासाठी चांगला असतो. यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात एक लहान कंपोस्ट डबा ठेवू शकता.

यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांची मदत घेऊ शकता. त्यांना जेवणानंतर उरलेलं अन्न किंवा भाज्यांची साले गोळा करायला सांगा आणि कंपोस्टच्या डब्यात टाकायला सांगा. यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल आणि निसर्गातील चक्राबद्दलही शिकायला मिळेल.

5. क्रिएटिव्ह कुकिंगने अन्न कचरा कमी करा

अन्न वाया घालवणं म्हणजे पैसे, वेळ आणि मेहनत वाया घालवणं. पण थोडं लक्ष दिलं तर आपण अन्न कचरा खूप कमी करू शकतो. आठवड्याभरात काय काय बनवायचं आहे, याचा आधीच विचार करा. यामुळे गरजेपेक्षा जास्त खरेदी होणार नाही आणि पदार्थ खराब होऊन फेकून द्यावे लागणार नाही. घरात उरलेल्या भाज्यांपासून तुम्ही सूप बनवा किंवा जास्त पिकलेल्या केळ्यांपासून मफिन्स बनवू शकता.

आठवड्यातून एकदा मुलांना डिनर तयार करायला सांगा. ते जे काही बनवतील त्याला ते स्वतः नाव देतील. तसंच हे जेवण बनवण्यास त्यांनी मेहनत केली असल्याने त्यांना अन्न वाया घालवू नये याचं महत्त्वं ही कळेल.

6. सेकंड-हँड वस्तू आणि खेळणी 

कपडे आणि खेळणी ही घरात लवकर जमा होणाऱ्या वस्तूंपैकी एक आहेत. पण नवीन वस्तू विकत घेऊन जुन्या फेकून देण्याऐवजी काही सोपे उपाय वापरून आपण कचरा कमी करू शकतो.

जुने कपडे आणि खेळणी गरजू मुलांना किंवा संस्थांना दान करा. यामुळे तुमच्या वस्तूंचा चांगला उपयोग होईल.

काही खेळणी काही काळ पॅक करून ठेवा आणि नंतर मुलांना ती पुन्हा द्या. यामुळे मुलांना नवीन खेळणी मिळाल्याचा आनंदही मिळेल.

मुलांना त्यांच्या जुन्या वस्तू दान करण्याची जबाबदारी द्या. त्यांना त्यांच्या वस्तू इतरांनादेणे आवडेल आणि इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ