रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्पेशल वेबसाईट्स

Potholes in roads : सशक्त भारत घडविण्यासाठी देशात रोज हजारो स्टार्टअप उदयाला येतात. यापैकीच एक स्टार्टअप आहे तो म्हणजे खड्ड्याची समस्या सोडविणारा इंडिया पोटहोल्स स्टार्टअप.  इंडिया पोटहोल्स ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या भागातील खड्डेमय रस्त्याची तक्रार संपूर्ण तपशीलासह करु शकता.
[gspeech type=button]

‘रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते’ या मार्मिक ओळीवर सुरूवातीला हसायला यायचं. या अशा वाक्यांनी राजकारण्यांना अनेक वर्षे प्रश्न विचारले पण ते बोथडचं राहिले. रस्त्यावरील खड्डांमुळे होणारे अपघाताची संख्या लक्षात घेऊन अनेक आंदोलनं, खड्ड्यात झाडं लावणं, खड्ड्यासोबत सेल्फी घेणं अशा सगळ्या ट्रेंडी मोहिमाही झाल्या पण प्रश्न काही सुटत नाही हे सत्य आहे. या अशा खड्ड्यांविषयी रस्त्यावर येऊन चौकात ओरड केली जाते पण रीतसर तक्रार नोंदवण्यासाठी पुरेसे पर्याय नव्हते. 

पण आता यालाही आपल्याला पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे तो म्हणजे इंडिया पोटहोल्स डॉट कॉम (IndiaPotholes.Com) या वेबसाईटने. नागरिकांनी केवळ  या खराब रस्त्याविषयी बडबड न करता प्रत्यक्षात तक्रार करुन समस्याचं निराकरण व्हावं यासाठी ही विशेष वेबसाईट आहे. जाणून घेऊयात या वेबसाईटची प्रक्रिया कशी आहे. 

खड्ड्याची समस्या सोडविणारा स्टार्टअप

सशक्त भारत घडविण्यासाठी देशात रोज हजारो स्टार्टअप उदयाला येतात. यापैकीच एक स्टार्टअप आहे तो म्हणजे खड्ड्याची समस्या सोडविणारा इंडिया पोटहोल्स स्टार्टअप. 

इंडिया पोटहोल्स ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या भागातील खड्डेमय रस्त्याची तक्रार संपूर्ण तपशीलासह करु शकता. या वेबसाईटचं वैशिष्ट्य असं आहे की, यावर तक्रार नोंदवताना त्या भागातील राजकीय प्रतिनिधी जसं की, महानगरपालिका हद्दीतील रस्ता असेल तर तिथला नगरसेवक, आमदार, खासदार यांची नावं या तक्रारीमध्ये नमूद केली जातात. यासह रस्त्याचं कंत्राट ज्या इंजिनियर आणि कंपनीकडे होतं त्यांचंही नावं तिथे दिलं जातं. त्यामुळे खराब, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तिंची नावं अशाप्रकारे जाहीर झाल्यावर लागलीच त्यावर कारवाई करुन तो रस्ता दुरूस्त केला जातो.  

फोटो, व्हिडीओ अपलोड करण्याची संधी

‘एक फोटो दहा ओळीपेक्षा जास्त बोलका असतो’ या वाक्यात तथ्य आहे. त्यामुळे तक्रार नोंदवताना केवल रस्ता कोणता आणि या अशा खराब रस्त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तिंच्या नावासह त्या रस्त्याचे प्रत्यक्ष फोटो, व्हिडीओ ही या वेबसाईटवर अपलोड करावे लागतात. त्यामुळे रस्ता किती प्रमाणात खराब आहे याची कल्पना येऊन त्यानुसार लवकरात लवकर कामाला सुरूवात केली जाते. तसेच अशाप्रकारे फोटो, व्हिडीओ शेअर केल्यामुळे तक्रार खोटी आहे, किंवा खड्डे छोटे आहेत अशी टोलवाटोलवीची उत्तरं दिली जात नाहीत. 

ही वेबसाईट कशी वापरायची?

तुम्हालाही तुमच्या भागातील खड्डे असलेल्या रस्त्याची तक्रार नोंदवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा https://www.indianpotholes.com/ या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटच्या पहिल्याच पेजवर थेट तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही किचकट प्रक्रियेला वा नावनोंदणी वगैरेसारखी प्रक्रिया न करता थेट तुमची तक्रार फोटो, त्या भागाचं जीपीएस लोकेशन आणि संपूर्ण तपशिलासह नोंदवता येते. 

खड्डेमय रस्त्यांपासून बचावासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत

रस्त्यावरील खड्ड्यातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी सरकारतर्फेही तक्रार नोंदवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. केंद्र सरकारकडून ‘सीपीग्राम्स’ आणि ‘मेरी सडक ॲप’ या दोन प्लॅटफॉर्म्सवरही आपल्याला तक्रार नोंदवता येते. याशिवाय नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया यावरही सिटीझन फीडबॅक पेजवर जाऊन खराब रस्त्याची तक्रार नोंदवता येते. 

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेअंतर्गत देशभरात ग्रामीण भागामध्ये रस्ते बांधणी केली आहे. हे रस्ते जर खराब झाले तर या वाहतूक विभागाकडूनच निर्मिती केलेल्या ‘मेरी सडक ॲप’ यावर तक्रार नोंदवता येते. 

याशिवाय पोटहोलराजा या आणखीन एका खासगी संस्थेच्या वेबसाईटवरुनही खराब, खड्डे पडलेल्या रस्त्यांची तक्रार नोंदवता येते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ