Leather | शहाळ्याच्या पाण्यापासून चामडे!

Leather from coconut Water : नारळ पाण्यापासून चामडं तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालंय. कल्पवृक्षाच्या आधुनिक वापराचं दारंही खुलं झालंय. हे चामडं तयार करण्याची प्रक्रिया ऑरगॅनिक असल्यानं  पूर्णपणंं इकोफ्रेण्डली आहे. नारळ प्रक्रिया उद्योगांमधून निघणाऱ्या टाकाऊ गोष्टींवर वाढणाऱ्या सेल्युलोझ जीवाणूपासून हे चामडं कमावण्यात येतं.
[gspeech type=button]

निसर्गाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण मराठीत आहे. शहाळं प्यायल्यावर मस्त तरतरी येते ना.. तर याच नारळपाण्यापासून चक्क चामडं तयार करून त्याच्या बॅग्स आणि पर्सेस केरळमध्ये बनतात.. नारळपाण्यापासून चामडं! जरा चमत्कारिक वाटतंय ना..  

नारळा पासून चामडं कसं तयार करतात?

नारळाला कल्पवृक्ष म्हणतात हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. साहजिकच आहे, नारळाच्या खोबरं, नारळ पाणी, करवंटी, झावळ्या, खोडं सर्वच भागांचा विविध गोष्टींकरता वापर होतो. नारळाच्या या पारंपरीक वापराचा फायदा आपण सर्वच घेतो. आता यात नारळपाण्यापासून चामडं तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालंय.  कल्पवृक्षाच्या आधुनिक वापराचं दारंही खुलं झालंय. हे चामडं तयार करण्याची प्रक्रिया ऑरगॅनिक असल्यानं  पूर्णपणंं इकोफ्रेण्डली आहे. नारळ प्रक्रिया उद्योगांमधून निघणाऱ्या टाकाऊ गोष्टींवर वाढणाऱ्या सेल्युलोझ जीवाणूपासून हे चामडं कमावण्यात येतं.

चामडं तयार करण्याची प्रक्रिया

स्थानिक नारळ बागायतदार आणि प्रोसेसिंग युनिटमधून वाया जाणार नारळपाणी गोळा करण्यात येतं. एखाद्या लहान प्रोसेसिंग युनिटमधून दिवसाला 4 हजार लीटर नारळपाणी जमा होतं.  यावर 25 किलो सेल्युलोझची निर्मिती होते.

या सेल्युलोझच्या शीट तयार करतात. ही साधारण हँडमेड पेपर निर्मितीसारखीच प्रक्रीया आहे. जाळी असणाऱ्या लाकडी फ्रेमवर सेल्युलोझला पसरवून त्यातलं पाणी काढलं जातं. मग ह्या शीटला वाळत घालतात. यामध्ये आपल्याला हव्या त्या जाडीची शीट तयार करता येते. ह्या शीटपासून लहान पर्स ते मोठ्या हँडबॅगपर्यंतच्या वस्तू बनवतात.

शहाळ्याच्या चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू

या वस्तुंची काळजी कशी घ्यायची?

ह्या वस्तूंचा मेंटेनन्सही खूप सोपा आहे. बी वॅक्स किंवा नारळतेलाचा पातळ थर लावला की झालं. कोणत्याही हवामानात या वस्तू टिकतात. समजा कधी या वस्तूंवर काही सांडलच तर ओल्या कापडानं पुसून साफही करता येतं. आणि मग सुकल्यावर परत बी वॅक्स किंवा खोबरेल तेल लावलं की झालं. नारळपाण्याच्या चामड्याच्या वस्तू साधारण 4-5 वर्ष टिकतात. आणि बाकी वस्तू आपल्या हाताळणाऱ्यावर आहे. 

नारळाच्या पाण्यापासून चामडं बनवायची सुरूवात कधीपासून झाली?

नारळपाण्यापासून चामडं बनवण्याच्या या प्रयोगाला 2017 मध्ये यश आलं.  केरळमधील प्रोडक्ट डिझायनर सुस्मिथ आणि स्लोव्हाकियामधील मटेरियल रिसर्चर आणि डिझायनर झुझाना यांनी हा प्रयोग यशस्वी केला.  तीन वर्षांच्या परिश्रमांनंतर नारळपाण्यावर वाढणाऱ्या सेल्युलोझला वेगळं करता आलं. मग त्यापासून चामडं तयार करता आल्यावर, या चामड्याच्या वस्तूंचा  ‘मलई’  नावाचा ब्राण्ड त्यांनी मार्केटमध्ये आणला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Kartavya Bhavan : दिल्लीमध्ये फिरताना ‘कर्तव्य पथ’ पाहण्याचा अनुभव खूपच खास असतो. आणि आता याच कर्तव्य पथावर एक नवीन, सुंदर
UPI Rises to Top : भारताची डिजिटल क्रांती संपुर्ण जगाला थक्क करत आहे. भारताची स्वदेशी पेमेंट सिस्टीम युपीआय (UPI -
India's Wealth : जागतिक इक्विटी रिसर्च अँड ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये असलेली असमानता ही समोर आली आहे. भारतातील

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ