कल्याणमधील अष्टविनायक

कल्याणातील गांधी चौकातील प्रसिद्ध सुभेदार वाड्याचे जवळ गणपती मंदिरात शूर्पकर्णाची पश्चिमाभिमुख मोहक नेत्राची मूर्ती विराजमान आहे. अक्षत गणपतीची मूर्ती हि काळ्या पाषाणातील असून डाव्या बाजूला गणपतीची छोटी मूर्ती आहे.

श्री सिद्धिविनायकाचे हे मंदिर भगवा (काळा) तलाव येथे रामेश्वर मंदिरा शेजारी आहे. या मंदिरात पूर्वी पासूनच माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.

संत राममारुती समाधी मंदिराच्या शेजारी असलेला हा गणपती एक जागृत देवस्थान मानले जाते. दोन फुटी दगडाची मूर्ती बनवून तिच्या कपाळावर ही मुळची स्वयंभू मूर्ती प्रतिष्टीत करण्यात आली. त्यामुळे सिद्धिविनायकाची ही मूर्ती आगळीवेगळी आहे.

पारनाक्यावरील श्री राम मंदिराच्या समोर हा गणपती गोखले वाड्यात आहे. पट्टेकर महाराजांनी या मूर्तीचे दर्शन घेतले होते. दुर्वांचे हार जुड्या वाहून आणि नारळाचे तोरण बांधून नवस फेडनार्यांची येथे वर्दळ असते.

पारनाका येथे पेशवेकालीन श्री राममंदिराच्या बाजूला दगड विटांनी बांधलेला पोखरण तलाव आहे. या पोखरणीत सापडलेल्या गणेश मूर्तीची सुरुवातीस श्री राम मंदिराच्या भिंतीतील कोनाड्यात स्थापना केली. नंतर सन १९८२ पासून मूर्ती चौथऱ्यावर बसविली आणि सुशोभीकरण केले.

दत्त आळीतील कोनकर वाड्यातील हा गणपती पेशवेकालीन आहे. नवीन इमारत बांधतांना तेथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना त्यावेळी वर्षानुवर्षे तयार झालेले मूर्तीवरील शेंदुरांचे कवच अखंड गळून पडले व मूळ मूर्तीचे खूप वर्षांनी दर्शन झाले.

दत्त आळी श्री दत्त मंदिराच्या मागे पूर्वीच्या किरकिरे वाड्यात हा गणपती आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आवर्तन करून ब्राम्हणाला भोजन व दक्षिणा देण्याचा उपक्रम १९५७ पासून तेथे सुरु आहे.

पारनाक्यावर पिंपळाच्या पारावर असलेल्या ह्या गणपतीचा इतिहास तसा जुना आहे. परंतु त्यातील मूर्ती अलीकडची म्हणजे २००३ सालची आहे. आधीची मूर्ती झिजल्याने त्या मूर्तीचे विसर्जन करून तशीच नवी मूर्ती याठिकाणी बसविण्यात आली.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ