‘आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजना’ आता 70 वर्षांवरील नागरिकांसाठीही

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या नागरिकांनाही आता आयुष्मान भारत (ayushman bharat) स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 11 सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळं देशातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना आणि 4.5 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
[gspeech type=button]

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या नागरिकांनाही आता आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 11 सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळं देशातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना आणि 4.5 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.

कोण आहेत पात्र?

सरकारने या योजनेच्या पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ग्रामीण भागात राहणारे नागरिक, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, अपंग व्यक्ती, असंघटित क्षेत्रातील कामगार, आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर या योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.

कोणाला मिळणार नाही लाभ?

संघटित क्षेत्रात काम करणारे लोक, कायमस्वरूपी घर आणि वाहन असलेले नागरिक, EPF धारक, ESIC सदस्य, सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणारे नागरिक यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कॅशलेस उपचार सुविधा

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देशभरातील अधिकृत रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा दिली जाणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि दाखल झाल्यानंतर 15 दिवसापर्यंतचा उपचार खर्च यामध्ये समाविष्ट असणार आहे.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

“प्रत्येक भारतीयाला सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 70 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेची व्याप्ती वाढवली आहे,” असे मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर निर्णय

याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 5 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जलविद्युत प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय साहाय्य योजना, PM-eBus सेवा, पीएम ग्राम सडक योजना, नाविन्यपूर्ण वाहन प्रोत्साहन योजना आणि ‘मिशन मौसम’ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ