‘अनैतिक’ गर्भपातावरील प्रतिबंधांवरून कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल

गर्भपाताच्या ( Abortion ) अधिकारांच्या संरक्षणासाठी आवाज उठवत कमला हॅरिस ( Kamala Harris )यांनी ट्रम्पच्या गर्भपात धोरणांना 'अनैतिक' ठरवले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गर्भपातावर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर त्यांनी तीव्र टीका केली आहे.
[gspeech type=button]

Kamala Harris : कमला हॅरिस यांनी 20 सप्टेंबर रोजी अटलांटा, जॉर्जियामध्ये (Georgia) झालेल्या एका रॅलीत डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी गर्भपातावर (Abortion) लादलेले कठोर कायदे अनैतिक असल्याचे सांगत, हॅरिस यांनी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर हल्ला चढवला. महिलांचे आरोग्य धोक्यात असल्याचंही त्या म्हणाल्या.

हॅरिस यांनी त्यांच्या भाषणात गर्भपातावरील रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांवर रोष व्यक्त करताना, “महिलांच्या आणि मुलांच्या आरोग्यासाठी आवाज उठवणारे हे नेते आज कुठे होते जेव्हा त्यांची खरी गरज होती?” असा सवाल केला. विशेषतः जॉर्जियासारख्या राज्यांमध्ये, जिथे गर्भधारणेच्या सहाव्या आठवड्यानंतर गर्भपात जवळपास अशक्य झाला आहे, त्यावर हॅरिस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गर्भपाताच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आवाज उठवत हॅरिस यांनी ट्रम्पच्या गर्भपात धोरणांना ‘अनैतिक’ ठरवले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गर्भपातावर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर त्यांनी तीव्र टीका केली आहे.

ट्रम्पच्या गर्भपात प्रतिबंधांविषयी
2022 मध्ये गर्भपात अधिकारांवर निर्बंध आणणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा ट्रम्प अभिमान व्यक्त करतात आणि या निर्णयानंतर, अमेरिकेतील 20 राज्यांनी गर्भपातावर पूर्ण किंवा अंशतः बंदी घातली आहे. जॉर्जियाने या बाबतीत अत्यंत कठोर कायदे केले. इथे गर्भधारणेच्या सहाव्या आठवड्यानंतर गर्भपात निषिद्ध आहे.

‘अनैतिक’ गर्भपात प्रतिबंध
हॅरिस यांनी जॉर्जियाच्या अंबर निकोल थुरमनच्या मृत्यूचे उदाहरण दिले. अंबरला गर्भपाताच्या औषधांच्या जटिलतेमुळे आपला जीव गमावला लागला. आता हे प्रकरण हॅरिस यांच्या प्रचारातील एक महत्त्वाचा मुद्दा बनले आहे.

वॉस्कॉन्सिनमध्ये तणावपूर्ण स्पर्धा
वॉस्कॉन्सिन राज्यात हॅरिस आणि ट्रम्प यांच्यातील निवडणूक जवळजवळ बरोबरीत असल्याचे आताच्या सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे. 2016 आणि 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये राज्यात अगदी कमी मतांच्या फरकाने निकाल लागले होते. AARP, Marist आणि Quinnipiac युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणांनुसार, हॅरिस यांनी फक्त एका गुणाने ट्रम्पला मागे टाकले आहे.

2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॅरिस यांनी गर्भपाताच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून महिलांच्या मतांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ