हाऊसफुल्ल नवरा माझा नवसाचा – 2

मराठी प्रेक्षकांना भूरळ घातलेला नवरा माझा नवसाचा - 2 सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. मुंबईसह सर्व शहरांमध्ये या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल झालेत.

पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाच्या पहिल्या दिवशी 1.85 कोटी रूपयाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 2.4 कोटी तर तिसऱ्या दिवशी 3.5 अशी एकुण आत्तापर्यंत 7.75 कोटीची कमाई केलीये.

‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा या सिनेमाला मोठा फायदा झाला. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. 20 सप्टेंबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन असल्याने सर्वच चित्रपटगृहांमध्ये 99 रूपयांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी खूपच गर्दी झाली होती.

‘नवरा माझा नवसाचा’ या विनोदी चित्रपटाने 19 वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टी धुमाकूळ घातली होती. त्यामुळे या सिक्वेलकडूनही प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्या अपेक्षा पूर्ण करण्यात चांगलं यश आलं आहे.

सचिन पिळगावंकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांना एकत्र मौज करताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

सुपारी फुटली, दाम डम डम डम डमरू वाजे आणि भारूड या गितांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

'डम डम डम डम डमरू वाजे' या गाण्यातील सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांची कन्या श्रिया पिळगावंकरची विशेष उपस्थिती उल्लेखनीय आहे.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ