पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेक एक्सपर्टशी बैठक

Source : PM Modi X account
PM Modi in America : आयटी क्षेत्रातील एआय (AI), क्वाटंम कम्पुटिंग, सेमीकंडक्टर आणि बायोटेक्नॉलॉजी या नवीन सेक्टरमधल्या भारतातल्या संधी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील टॉप आयटी तज्ज्ञांशी चर्चा केली.
[gspeech type=button]

पंतप्रधान नरेंद्र यांची रविवारी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सीईओ यांच्यासोबत बैठक पार पडली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला अग्रमी स्थान मिळावं तसंच जागतिक पातळीवर भारतातल्या संधी या विषयावर सर्व तज्ज्ञांशी आणि विविध सुप्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओशी सखोल चर्चा केली.

या बैठकीत अॅडोबचे संस्थापक अध्यक्ष आणि सीईओ शंतनू नारायण, गूगलचे सीईओ सुंदर पिच्चई, आयबीएमचे सीओई अरविंद क्रिष्णा, एएमडी नौबार आफेयानच्या संस्थापक सीईओ लिसा सू उपस्थित होते.

आयटी क्षेत्रातील एआय, क्वाटंम कम्पुटिंग, सेमीकंडक्टर आणि बायोटेक्नॉलॉजी या नवीन सेक्टरमध्ये भारतात काय संधी आहेत किंवा त्या कशाप्रकारे निर्माण करू शकतो अशा सगळ्या महत्वपूर्ण विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील टॉप आयटी तज्ज्ञांशी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी क्वाड समीटमध्ये सहभाग घेतला. या समीटमध्ये अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बेनीज, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा सहभागी झाले होते.

रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी अनेक विषयांवर चर्चा केली. भारत – अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पनांची परिसंस्था (innovation ecosystem) तयार व्हावी यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये ‘इनोवेशन हँडशेक’ नावाने द्विपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार या कराराचा पाठपुरावा घेण्यात आला.

त्यानंतर न्यूयॉर्कस्थित मॅच्यूसे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये पंतप्रधानांनी आयटी सेक्टरमधल्या तज्ज्ञांशी राऊंडटेबल चर्चा केली.

या बैठकीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचं योगदान, नवीन कल्पना, आयटी उद्योगासाठी संधी व पुढील दहा वर्षासाठीचं नियोजन अशा सगळ्या बाबींवर चर्चा केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ