अब्रुनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत दोषी; माझगाव कोर्टाने सुनावली 15 दिवसाची कैद आणि 25 हजार रूपयाचा दंड

Source : OneIndia
 Sanjay Raut defamation case: शिवसेनेचे (उबाठा) नेते खा. संजय राऊत हे डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टाने 15 दिवसाची कैद आणि 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
[gspeech type=button]

डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेनेचे (उबाठा) नेते खा. संजय राऊत हे दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. महानगर दंडाधिकारी माझगाव (Metropolitan Magistrate Mazgaon) कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टाने 15 दिवसाची कैद आणि 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेना (उबाठा) चे नेते खा. संजय राऊत यांनी एप्रिल 2022 मध्ये शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर परिसरामध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता खारफुटी जंगलाची कत्तल केली. सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठान एनजीओच्या माध्यमातून या जागेत अनधिकृत सार्वजनिक शौचालय बांधलं आहे. राऊत यांनी या बांधकामात आणि देखभालीशी संबंधित व्यवहारात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या दाम्पत्यांवर केला होता. 16 एप्रिल 2024 रोजी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या सगळ्या आरोपांचा उल्लेख केला होता.
डॉ मेधा सोमय्या या पेशाने प्राध्यापक आणि समाजसेविका आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ बदनामी करण्यासाठी केलेल्या या आरोपांविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेत संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. संजय राऊत यांच्यावर दोषी असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया
या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी कोर्टाच्या निकालाचा आदर करतो. पण ज्या देशामध्ये पंतप्रधान हे गणेशोत्सवासाठी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांची पूजा करून मोदक खातात त्या देशात मी न्यायाची अपेक्षा तरी कशी करू?” अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ