पुण्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन बुद्रक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
[gspeech type=button]

पुण्यातील बावधन बुद्रक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलट गिरीष कुमार पिल्लई आणि परमजीत सिंग व इंजिनीयर प्रीतमचंद भारद्वाज यांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर दिल्लीतल्या एका विमान कंपनीच्या मालकीचं असल्याचं आता समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्लीतल्या एका विमान कंपनीच्या या हेलिकॉप्टरने सकाळी 7.30 च्या सुमारास पुण्यातल्या बावधान बुद्रुक परिसरातल्या ऑक्सफर्ड काऊंटी या रिसोर्टच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलेलं. त्यानंतर थोड्याच वेळात ऑक्सफर्ट काऊंटी रिसॉर्ट ते एचईएमआरएल या नावाच्या संस्थेच्या दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरला आग लागल्यामुळे त्यात प्रवास करणारे दोन पायलट आणि इंजिनियर तिघांचाही मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळतात हिंजवडी पोलिसांच्या पथकासह, अग्निशमक दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल होत बचाव कार्याला सुरुवात केली. दरम्यान दाट धुक्यामुळे अपघात घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, दिनांक 24 ऑगस्ट रोजीही पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना घडली होती. या घटनेत मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ