महाराष्ट्रातील नवरात्र उत्सव

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. देवीआईची मनोभावे पूजा,आरती केली जाते.

घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापन केला जातो. एका परडीमध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवतात. या घटात आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ, देवीचे टाक ठेवतात. घटाच्यावर रोज एक झेंडूच्या फुलांची माळ बांधतात.

अष्टमी किंवा नवमीला देवीसमोर होम करतात. काही घरात पंचमी किंवा षष्ठीला फुलोरा असतो. यामध्ये देवीच्यावर कडकण्या बांधतात.

नवरात्रीच्या निमित्ताने मुलींकरता भोंडल्याचे आयोजन करतात. यावेळी एका पाटावर हत्तीचे चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्याच्या भवती फेर धरला जातो आणि भोंडल्याची गाणी म्हणतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीआईच्या मंदिरात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. महिला देवीची खणा नारळाने ओटी भरतात. तर काही भक्त घरोघरी जाऊन जोगवा मागतात.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ