भारतीय वंशाच्या पाम कौर, HSBC च्या 160 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला CFO

Pam Kaur : भारतीय वंशाच्या पाम कौर यांची हॉंग कॉंग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) च्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
[gspeech type=button]

भारतीय वंशाच्या पाम कौर यांची हॉंग कॉंग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) च्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

पाम कौर यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून बी.कॉम आणि एमबीए केले. तसचं फायनान्शियल आणि अकाऊंटिगच्या अभ्यासावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली. त्यांचा वित्त क्षेत्रातील अनुभव प्रचंड आहे. पाम कौर या इंग्लंड आणि वेल्समध्ये चार्टर्ड अकाऊंट संस्थेच्या फेलो सदस्य आहेत. त्यांनी अन्सट अॅण्ड यंग येथून चार्टर्ड अकाऊंटची डिग्री मिळवली.

पाम कौर यांनी जागतिक वित्तीय संस्थांमध्ये अनेक वरिष्ठ पदे सांभाळली आहेत. त्यांनी डॉइश बँकेत ग्रुप ऑडिटच्या जागतिक प्रमुख म्हणून काम केलं आहे. तर, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड ग्रुप PLC मध्ये रिस्ट्रक्चरिंग आणि रिस्क विभागाच्या CFO आणि COO म्हणून काम केलंय. लॉयड्स टीएसबीमध्ये ग्रुप हेड ऑफ कंप्लायन्स आणि अँटी-मनी लॉंड्रिंग म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

2013 मध्ये पाम कौर HSBC मध्ये जॉइन झाल्या. त्यांना 11 वर्षांत तीनदा प्रमोशन मिळाले. बँकेतील अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यांच्या कामाची दखल घेऊन, एचएसबीसी बँकेने प्रथमच मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून एका महिलेची नियुक्ती करून आपला 160 वर्षांचा इतिहास बदलला आहे. पाम कौर या वयाच्या 60 व्या वर्षी बँकेतील वरिष्ठ पदाचा म्हणजेच, कंपनीच्या 13643 लाख कोटी रुपयांचा आर्थिक कार्यभार सांभाळणार आहेत.

पाम कौर यांच्या वार्षिक पगाराची रक्कम 21 कोटी रुपये आहे. HSBC च्या CFO म्हणून त्यांना 803,000 पाऊंड म्हणजेच सुमारे 8.12 कोटी रुपये मिळतील. याशिवाय 1,085,000 पाऊंड म्हणजेच सुमारे 10.97 कोटी रुपये वेतन भत्ता दिला जाईल. यासोबतच 80,300 पाऊंड म्हणजेच सुमारे 81 लाख रुपये पेन्शन भत्ताही मिळणार आहे. पगाराच्या पॅकेजशिवाय त्यांना बोनस 215 टक्क्यांपर्यंत ऍन्युअल इंसेटींव अवॉर्ड, लॉन्ग टर्म इनिशिएटीव अवॉर्ड देखील मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं
Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ