भारत 5G आणि GenAI चा वापर करण्यात जगात आघाडीवर

India’s 5G adoption : भारत 5G आणि GenAI तंत्रज्ञानाच्या वापरात जगात आघाडीवर असल्याचं एरिक्सनच्या नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. 2023 मध्ये 5G वापरकर्त्यांचा 48% दर वाढून 2024 मध्ये तो 57% झाला आहे.
[gspeech type=button]

भारत 5G आणि GenAI तंत्रज्ञानाच्या वापरात जगात आघाडीवर असल्याचं एरिक्सनच्या नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. 2023 मध्ये 5G वापरकर्त्यांचा 48% दर वाढून 2024 मध्ये तो 57% झाला आहे. या अभ्यासात भारतातील टियर-1 ते टियर-3 शहरांमधील 2,000 सक्रिय 5G वापरकर्त्यांचा समावेश करण्यात आलं आहे.

विशेषतः टियर-3 शहरांमध्ये 5G चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यामुळे कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातही उच्च-गुणवत्तेची इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ लागली आहे.

तसेच, भारतातील वापरकर्ते अमेरिकेच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात GenAI ॲपचा वापर करत आहेत. 21% भारतीय दररोज चार किंवा अधिक GenAI ॲप्स वापरतात. भारतीय स्मार्टफोन वापरकर्त्यांना AI-आधारित फीचर्स आवडत असल्याने, फोन खरेदी करताना कैमेरा गुणवत्तेपेक्षा AI क्षमतांना प्राधान्य दिलं जात आहे.

एरिक्सनच्या रिपोर्टनुसार, वेअरेबल्स, GenAI ॲप्स आणि 3D कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे मोबाईल ट्रॅफिकमध्ये मोठा बदल होईल. यासाठी, 5G नेटवर्कला अधिक मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. तसचं भारतीय ग्राहक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अधिक पैसे देण्यासही तयार आहेत.

एरिक्सनच्या अहवालात सिमेंटिक कॉम्प्रेशन टेक्नॉलॉजीकडे इंडस्ट्रीचा कल असल्याचे सांगितले आहे, विशेषत: एआर ग्लासेस आणि हायब्रीड कॉम्प्युटिंग उपकरणे लोकप्रिय होऊ लागली आहेत. त्याचप्रमाणे, ग्राहक आता उच्च कार्यक्षमतेच्या कनेक्टिव्हिटीसाठी अधिक पैसे देण्याची तयारी दर्शवत आहेत.

भारताच्या डिजिटल परिवर्तनामुळे देश आता कनेक्टिव्हिटी आणि नवीन टेक्नॉलॉजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि 5G व GenAI च्या स्वीकारामुळे भारताची जागतिक स्तरावर एक महत्त्वाची ओळख निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ