अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला! मुख्यमंत्र्यांकडे गृह तर शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि अजित पवाराकडे अर्थ खाते

Mahayuti Portfolio Announce : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीसरकारने मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि अजित पवारावर अर्थ खात्याची जबाबदारी.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीसरकारने मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर केला आहे. रविवार दिनांक 16 डिसेंबर रोजी नागपूर इथे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर महायुतीमध्ये खातेवाटपावरून विवाद सुरू असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या. अखेर या सर्व चर्चांवर पडदा पडला आहे. शनिवार दिनांक 21 डिसेंबरला अधिवेशन संपल्यानंतर सरकारकडून खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पाहुयात कोणत्या नेत्याकडे कोणतं खातं असणार –

देवेंद्र फडणवीस : गृह
एकनाथ शिंदे : नगरविकास
अजित पवार : अर्थखात
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील : उच्च तंत्र शिक्षण
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा
दादाजी भुसे : शालेय शिक्षण
गणेश नाईक : वन
संजय राठोड : माती व पाणी परीक्षण
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास
उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल : विपणन
पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण
अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास
अशोक उईके : आदिवासी विकास
शंभूराज देसाई : पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास
अदिती तटकरे : महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे : कृषी
नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन
जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज
संजय शिरसाट : सामाजिक न्याय
भरत गोगावले : रोजगार हमी व फलोत्पादन
नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे
प्रताप सरनाईक : वाहतूक
बाबासाहेब पाटील : सहकार
मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
प्रकाश आंबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण

राज्यमंत्रिपद पुढीलप्रमाणे असतील –

ॲड. आशिष जयस्वाल – वित्त आणि नियोजन, कृषी, आपत्ती निवारण आणि पुनर्वसन, कायदा सुव्यवस्था आणि कामगार मंत्रालय

माधुरी मिसाळ – शहर विकास, ट्रान्सपोर्ट, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास

डॉ. पंकज भोयर – ग्रामीण गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खाण

मेघना बोर्डिकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला व बाल कल्याण विकास आणि सार्वजनिक विकास

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

central government : केंद्रीय शिक्षण मंडळाने इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थांना नापास झाल्यावरही पुढील वर्गात ढकलण्याचं धोरण रद्द केलं आहे.
Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार
Mahaparinirvan Din : भारतरत्न, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी 6 डिसेंबरला लाखोच्या संख्येने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली