अमेरिका शटडाऊन – सरकारविरोधी एजन्सीमध्ये नोकरकपातीचा निर्णय

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. ही यादी तयार असून शनिवार किंवा रविवारी यासंबंधित निर्णय घोषित करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसमधील दोन अधिकाऱ्यांनी सीएनएनला दिली आहे.
अमेरिकेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; सरकारी सेवा ठप्प होतील का?

US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध क्षेत्रांसोबत दर आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला करार केला जातो. या करारानुसार प्रत्येक क्षेत्राला निधी पुरविला जातो. मात्र, अमेरिका सरकारकडून आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा करार पूर्ण झालेला नाही. निधीच्या तरतूदीवरून अद्याप सिनेटमध्ये एकमत झालेलं नाहीये. त्यामुळे सेवा पुरविणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
मायक्रोसॉफ्टने इस्रायली लष्कराचा एआय आणि क्लाउड तंत्रज्ञानावरील प्रवेश रोखला!

Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे. इस्त्रायल लष्कराकडून पॅलेस्टिनी लोकांवर, त्यांच्या हालचालीवर अतिप्रमाणात पाळत ठेवली जात असल्याचं उघडकीस आल्यावर मायक्रोसॉफ्टने हा निर्णय घेतला आहे.
एच 1बी व्हिसा संदर्भातल्या निर्णयाचा आयटी क्षेत्रावर कितपत परिणाम होणार?

H1B Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरचा रोष वाढतोच आहे. 50 टक्के टॅरिफनंतर आता ट्रम्प सरकारने एच 1 बी व्हिसासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांना 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय 88 लाख रुपये भरावे लागणार आहेत. अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून हा निर्णय घेत असल्याचं स्पष्टीकरण ट्रम्प सरकारने दिलं आहे, तरी यामागे वेगळंच काही गौडबंगाल आहे याचीही खात्री सर्व जगाला आहे. पाहुयात या निर्णयाचा आयटी क्षेत्रावर काही परिणाम होणार आहे का?
ट्रम्प यांचे एच-1बी धोरण अमेरिकन शिक्षणसंस्थांना मिळणारं परदेशी विद्यार्थ्यांचं अनुदान संपवू शकतं!

परदेशी विद्यार्थी गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेत उच्च पगाराची नोकरी आणि कदाचित ग्रीन कार्ड मिळण्याच्या आशेने जात आहेत. पण, प्रत्यक्षात परदेशी विद्यार्थी अमेरिकन विद्यार्थ्यांना अनुदान देतात! कारण आंतरराष्ट्रीय विद्यार्थी स्थानिक विद्यार्थ्यांच्या कैक पट जास्त फी भरतात. ट्रम्पच्या एच-1बी कारवाईमुळे अमेरिकन शिक्षण व्यवस्थेला कसे नुकसान होऊ शकते याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
सीरिया 58 वर्षांनंतर पुन्हा संयुक्त राष्ट्रांमध्ये: अल कायदाच्या एका माजी सैनिकाची कमाल

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा हे 58 वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रांना संबोधित करणारे देशाचे पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. अल-कायदाच्या एका माजी सैनिकाने आसाद कुटुंब जे करू शकले नाही ते करून दाखवलं आहे.
ट्रम्पच्या निर्बंधांनंतर अमेरिकेतच राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या मदतीला अमेरिकन सिनेटर्स!

अमेरिकेन सिनेटर्सच्या एका द्विपक्षीय गटाने अमेरिकेचा बाल कायदा पुन्हा सादर केला आहे. कायद्यानुसार वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमेरिकन नागरिकत्वाचा कायदेशीर दर्जा गमावण्याचा धोका असणाऱ्या अडिच लाखाहून अधिक मुलांना नागरिकत्वाचा मार्ग प्रदान करण्याच्या उद्देशाने एक विधेयक मांडण्यात आलं आहे.
इंटरनेटवरील तुमचा डेटा डिलिट करायचा आहे? मग या आहेत सोप्या टिप्स

Internet Security : कोणत्याही वेबसाईट किंवा ॲपवर प्रवेश करताना आपल्याला आपला मेल आयडी, नाव, लिंग, जन्मतारिख अशी माहिती द्यावी लागते. त्या वेबसाईट वा ॲपवरच काम संपल्यावर आपण ही थेट बाहेर पडतो किंवा ते ॲप अनइन्स्टॉल करतो. पण आपली माहिती ही त्याठिकाणी तशीच राहते. या माहितीचा मार्केटिंग किंवा अन्य गोष्टीसाठी दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे इंटरनेटवरचे आपले फूट प्रिंट डिलिट करणं गरजेचं असतं. हे फूट प्रिंट्स कसे डिलिट करायचे ते आपण जाणून घेऊयात.
भूतान : आशियातला सगळ्यात कमी सैन्यदल असलेला देश

Bhutan : आशियात एक असा देश आहे जिथे मिश्र राजेशाही सत्ता आहे. राजेशाहीसोबतच या देशाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या देशाकडे पुरेसं सैन्यदलचं नाही. देशाची सुरक्षा व्यवस्था आणि अन्य विविध अंगांनीही कमजोर असला तरिही शेजारील राष्ट्र चीनही या देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाही. या देशाचं नाव आहे भूतान. जाणून घेऊयात या देशांच्या काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी.
फोन दुरुस्तीला देण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की करा !

Mobile Phone Security : कधी अचानक आपला मोबाईल फोन खराब झाला तर तो दुरुस्तीला देणं म्हणजे एक प्रकारची रिस्कच असते. कारण अशावेळी तुमच्या फोनमधील खासगी डेटा,फोटो, मेसेजेस आणि इतर माहितीची चोरी होऊ शकते आणि त्याचा गैरवापर केला जातो. पण जर तुम्ही काही सोप्या गोष्टी केल्या तर, तुम्ही तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित ठेवू शकता.
अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारत ठामपणे उभा राहिला; पुतीन यांनी केलं भारताचं कौतुक

Russia And India : भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परिणामी अमेरिकेने भारतावर थेट 50 टक्के टेरिफ लादले. तरिही, भारताने या दबावाला न जुमानता रशियासोबत आपले व्यापारी संबंध कायम ठेवले आणि वारंवार त्याचे समर्थनही केलं. भारताच्या या भूमिकेचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पूतीन यांनी रशिया टुडे या माध्यमाशी बोलताना कौतुक केलं आहे.
नेपाळमध्ये स्थिरता येईल का? माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी स्विकारला अंतरिम पंतप्रधान पदाचा पदभार

Nepal government : शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशीरा सुशीला कार्की यांनी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. त्या 73 वर्षाच्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सर न्यायाधीश आहेत.