मादोगावा झोकू: जपानी कंपन्यांमधील ‘निराश’ कर्मचारी

MADOGIWA ZOKU: ‘मादोगावा झोकू’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. ‘मादोगावा’ म्हणजे ‘खिडकीजवळ’ आणि ‘झोकू’ म्हणजे ‘जमात’ किंवा ‘लोक’. ही संज्ञा अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते ज्यांना कंपनीत कामावरून काढलं जात नाही, पण त्यांच्याकडून कामही करून घेतलं जात नाही. त्यांना एकप्रकारे बाजूला केलं जातं.
जपानमध्ये केवळ 15 हजार रुपयांमध्ये भारतीयांना मिळणार पीआर !

Japan PR : जपानमध्ये केवळ 15 हजार रुपयांमध्ये भारतीय नागरिकांना पीआर दिला जात आहे. पण पैसे जरी कमी असले तरी हा पीआर मिळवण्यासाठी तुम्हाला कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे. जाणून घेऊयात पीआरची प्रक्रिया कशी आहे?
माणसाच्या शरीरातील नवीन अवयवचा शोध !

Tubarial salivary glands : नेदरलँडमधील शास्त्रज्ञांना माणसाच्या गळ्यामध्ये एक नवीन अवयव आढळलेला आहे. या अवयवाच्या मदतीने डोक्याच्या आणि गळ्याच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी मदत होईल असं आता शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
रशियातील कर्करोगवरील लस कधीपासून वापरता येईल?

Russia Cancer Vaccine : रशियामध्ये कर्करोगवरील उपचारासाठी लस विकसीत केली आहे. या लसीमध्ये कर्करोगाशी लढण्याची पूर्ण क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. एन्टरोमिक्स नावाच्या या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 100 टक्के कार्यक्षमता असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्था ‘तास’ यांनी दिली आहे.
मोबाईलचं व्यसन : नकळत जडणारं व्यसन

mobile phones addiction : मोबाईलचे व्यसन म्हणजे फक्त सोशल मीडियावर वेळ घालवणे नाही. तर ती अशी स्थिती आहे, जिथे तुम्हाला मोबाइलची इतकी सक्तीने गरज वाटते की तुम्ही तुमच्या इतर कामांकडे दुर्लक्ष करता.
अखेर नेपाळमध्ये सोशल मीडियावरील निर्बंध हटवले ! जेन झी पिढीच्या आंदोलनाला यश

Nepal Social Media Restriction Issues : जेन झी पिढीने काठमांडू या राजधानी शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिकजण जखमी झाले. या घटनेनंतर तिथल्या संचार मंत्री पृथ्वी सुब्बा गुरूंग यांनी सोशल मीडियावरील निर्बंध लादल्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. या सगळ्या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारत गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण नेपाळ सरकारने सोशल मीडियावर नेमके निर्बंध का घातले हे जाणून घेऊयात.
चॅटजीपीटीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ! एआयने लागलीच उचलली प्रतिबंधात्मक पाऊले

Open AI : अमेरिकेमध्ये 2024 सालापासून एआयचा अतिवापर करणाऱ्या किशोरवयीन आणि तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे पालकांनी संबंधित एआय ॲपवर आणि त्या – त्या कंपनीच्या मालकांवर आरोप दाखल केले आहे. एआयचा चॅटबोटच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आत्महत्यासारख्या गोष्टीला प्रोत्साहन वा मदत केली जाऊ नये, यासाठी कंपन्यांनीसुद्धा वेळीच पाऊले उचलली आहेत.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा राजीनामा; कोण आहेत शिगेरू इशिबा?

Japan Politics : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी त्यांच्या पदाचा आणि पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. केवळ काही महिन्यांपूर्वीच त्यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली होती. पण, त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या जपानमध्ये यामुळे राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशोदेशीचे पितृपक्ष

दोन नोव्हेंबरला पेरूमध्ये ‘दिया दे लाॅस म्युएर्तोज ‘ (Día de los Muertos ) (Day of the Dead) असतो. ब्राझीलमध्ये याला, ‘दिया दो फिनादोस ‘म्हणतात. पुर्वजांच्या आठवणीत या दिवशी काही धार्मिक विधी केले जातात.
डेड इंटरनेट म्हणजे काय? ओपनएआयचे सॅम ऑल्टमन यांची थिअरी खरी आहे का?

Open AI: आजच्या ऑनलाइन कंटेंट आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीचा बराचसा भाग हा मनुष्य नाही तर बॉट्स आणि एआय द्वारे तयार केला जातो. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या पोस्टमुळे सिंथेटिक कंटेंट आणि ऑनलाइन आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला आहे.
युरोपियन युनियनने जेल नेल पॉलिशमध्ये आढळणाऱ्या ‘विषारी’ घटकावर घातली बंदी

Gel Nail paint : युरोपियन देशांनी जेल नेल पॉलिशच्या अनेक ब्रँडमध्ये आढळणाऱ्या एका प्रमुख विषारी घटकावर बंदी घातली आहे. ट्रायमिथाइलबेंझोयल डायफेनिलफॉस्फिन ऑक्साइड, याला सामान्यतः टीपीओ म्हणतात. हा एक विषारी घटक मानला जातो. यामुळे प्रजनन समस्या निर्माण होऊन पुनरुत्पादक आरोग्य समस्या निर्माण होतात. ही बंदी 1 सप्टेंबर 2025 पासून लागू झाली आहे.
‘ब्लड मून’ भारतातूनही दिसणार! चंद्रग्रहणातील ‘ब्लड मून’ म्हणजे काय?

Blood Moon : जेव्हा पृथ्वी सुर्याच्या आणि चंद्राच्या मधून जात असते तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते त्याला चंद्रग्रहण म्हटलं जातं. यावर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण हे 7 – 8 सप्टेंबरला आहे. हे चंद्रग्रहण जगातल्या आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधून पाहता येणार आहे. तर उत्तर अमेरिकेत 2-3 मार्च 2026 रोजी ‘ब्लड मून’ दिसणार आहे.