माणसांच्या आंघोळीसाठीही आलं धुलाई यंत्र!

Human Washing Machine : जसं कपडे धुण्याचं हे मशीन आहे, तसं माणसाला धुण्यासाठीही जपानने मशीन तयार केली आहे. या मशीनचं जपानी भाषेतलं नाव ‘मिराई निंगेन सेंताकुकी’ असं आहे. याचा अर्थ मानवी वॉशिंग मशीन. ओसाका सायन्स कंपनीने ही मशीन तयार केली आहे.
पुतिन यांनी अलास्का शिखर परिषदेत ट्रम्प आणि जगाला सांगितल्या या पाच गोष्टी!

अमेरिका-रशिया चर्चा अनिर्णीत संपली असताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पत्रकारांना संबोधित करताना जगाला अनेक संदेश दिले. रशियन नेत्याला हवा असणारा अमेरिकन मंच मिळाल्याने, शुक्रवारी अलास्कामध्ये झालेल्या या चर्चेला आधीपासूनच पुतिन यांच्यासाठी ‘विजय’ म्हणून पाहिले जात होते.
अमेरिकेने भारतातील ‘गवार’ भाजीला टॅरिफमधून का दिली सूट?

tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अनेक वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी ते वाढवून 50 टक्के केलं. पण यामधून ‘गवार गम’ला मात्र सूट मिळाली आहे.
बायोफ्युएल: शेतकऱ्यांसाठी ‘कचरा’ आता उत्पन्नाचा नवा मार्ग !

world bio fuel day : बायोफ्युएल एक खास इंधन आहे. हे फक्त पेट्रोल आणि डिझेलला पर्याय नाही, तर व्यवसायाची मोठी संधी देखील आहे. आपल्या देशात सध्या बायोफ्युएलचं क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे. सरकारनेही याला प्रोत्साहन दिलं आहे.
जागतिक सिंह दिनाची सुरूवात कशी झाली?

World Lion Day : सिंहाची घटती संख्या पाहता त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसं की अधिवास संरक्षण, मानवी-सिंह संघर्ष कमी करणे, आणि अवैध शिकारीला आळा घालणे गरजेचं आहे.
आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचं घोषणापत्र आणि कायदे

World Indigenous Day : 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक पातळीवर आदिवासी बांधवांना सन्मानाचं, प्रतिष्ठेचं आणि स्वातंत्र्य जीवन जगता यावं यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने घोषणापत्र तयार केलं आहे. या घोषणापत्रात आदिवासी बांधवांचे हक्क-अधिकार अबाधित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण कायद्यांची निर्मिती केली आहे.
रशियाचे अध्यक्ष पूतीन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार – डोभाल यांनी दिली माहिती

India Russia Relation : अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टेरिफ लादल्यानंतर डोभाल यांचा हा रशिया दौरा महत्त्वपूर्ण होता. संरक्षण करार आणि औद्योगिक व्यापाराच्या दृष्टिने या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार होती. पूतीन आणि डोभाल भेट होईल की नाही हे निश्चित नव्हतं. मात्र, ही भेटही झाली. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.
अमेरिकेच्या ग्रीन कार्ड नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या काय आहे नवीन नियम

Green card marriage couples: अनेक लोक फक्त ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी खोटं लग्न करतात. यामुळे इमिग्रेशन प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास कमी होतं आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच USCIS ने हे नवीन नियम आणले आहेत.
भारत – रशिया दरम्यान संरक्षण आणि औद्योगिक करारांवर चर्चा !

India Russia Relations : एकीकडे भारत – रशिया व्यापारी संबंधात तेलखरेदी थांबवण्यासाठी अमेरिकेने 6 ऑगस्ट रोजी अतिरिक्त 25 टक्के टेरिफ लादला आहे. तर दुसरीकडे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल भारत रशिया दरम्यान संरक्षण आणि अन्य औद्योगिक कराराच्या चर्चेसाठी रशिया दौऱ्यावर गेले आहेत. जाणून घेऊयात या दौऱ्याचं नेमकं काय प्रयोजन आहे?
अमेरिकेचा भारतावर 25 टक्के अतिरिक्त (दंडात्मक) टेरिफ

US imposes additional tariff on India : भारत रशियाकडून तेल आयात करतो हे जर 50 टक्के टेरिफचं कारण असेल तर युरोप देखील रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो, त्यावर फक्त 15 टक्के आयातकर आहेत. खुद्द अमेरिका रशियाकडून खनिजे वगैरे आज देखील आयात करत आहे. त्यामुळे खरंच अमेरिकेचा रशिया – युक्रेन युद्धबंदी व्हावी हे शांतताप्रिय कारण आहे की, ब्रिक्स समुहाची गळचेपी करुन जगात मक्तेदारी करण्याचा छुपा अंजेडा आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
अणू ‘विध्वंसक’ नाही तर ‘विधायक’ कार्यासाठी !

Hiroshima Day : अणुशक्तीचं विध्वंसक रुप म्हणजे जपानमधली हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतरची परिस्थिती. जागतिक पातळीवर पुन्हा अशी भयावह स्थिती निर्माण होऊ नये, अणुशक्तीचा विघातक गोष्टीं ऐवजी विकासासाठी वापर व्हावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
उठावाच्या एक वर्षानंतरही बांग्लादेशात अस्थिरताच, नागरिकांसमोर रोज नवीन आव्हानं!

Bangladesh : एक वर्षानंतरही बांग्लादेशातील परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. आजही बांग्लादेशात राजकीय अस्थिरता, धार्मिक गटबाजी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न कायम आहेत.