तुर्की आणि अझरबैझानला पर्याय आहेत हे 9 सुंदर देश!

Tourist:तुर्की आणि अझरबैजानसारख्या देशांमध्ये जसं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सौंदर्य आहे, तसंच सौंदर्य आणि अनुभव इतर काही देशांमध्येही मिळू शकतो. तेही कमी खर्चात आणि शांत वातावरणात.
जेन झी पिढीला सिंगल राहणं का आवडतंय?

Gen z : जेन झी पिढीला हे समजलं आहे की, दुसऱ्याशी नातं जोडण्याआधी स्वतःला समजणं आणि स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःची ओळख आणि अस्तित्व दुसऱ्यासाठी पूर्णपणे सोडून न देणं हे देखील तितकंच महत्वाच आहे.
तुमचं काम तुम्हाला आनंद देतंय की ताण? ‘क्वाएट क्विटिंग’चा वाढता ट्रेंड का?

Quiet Quit : क्वाएट क्विटिंग म्हणजे नोकरी सोडणं नाही, पण हळूहळू काम कमी करणं.फक्त ठरवलेलं तेवढंच काम करणं आणि त्याहून जास्त जबाबदारी न घेणं. आपल्या हे ऐकायला जरी साधं वाटतं असलं तरी यामागे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत.
जेन झी पिढी ‘कंटाळ्या’चा सकारात्मक फायदा कसा घेऊ शकते?

Gen Z : जेन झी ( Gen Z) या पिढीतल्या तरुण वर्गाला कोणत्याही कामात थोडा तरी एकसूरीपणा आला किंवा थोडा वेळ जरी मोबाईल बाजूला ठेवला तरी पटकन कंटाळा येतो, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी ही या पिढीतल्या मुलांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत यावरुन पिढीनुसार घडत असलेल्या स्थित्यंतराविषयी माध्यमातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, फोनशिवाय किंवा काहिही न करता नुसतीच ही पिढी 5 मिनीटं सुद्धा स्थिर बसू शकत नाही हे धोकादायक आहे.
कार्डिनल रॉबर्ट प्रीवोस्ट यांची पोप पदी निवड! लिओ चौदावे या नावाने ओळखले जाणार नवीन पोप

New Pope Leo XIV : कार्डिनल रॉबर्ट प्रीवोस्ट यांची पोप पदासाठी लिओ चौदावे या नावाची निवड केली आहे. त्यामुळे त्यांना लिओ चौदावे (LEO XIV) या नावाने यापुढे ओळखलं जाणार आहे. ते ख्रिस्तसभेचे 267 वे पोप आहेत.
गुगल Gemini Advanced मोफत कोणासाठी?

Google Gemini Advanced : गुगलने आपल्या AI चॅटबॉट Gemini साठी ‘AI Premium Plan’ हे खास सब्सक्रिप्शन आणलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र ही ऑफर भारतीय विद्यार्थ्यांसाठी नाही आहे.
भारतातल्या ‘या’ राज्यातल्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश नाही!

Australian universities restrictions : ऑस्ट्रेलियामधील काही विद्यापीठांनी भारतातल्या काही राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जावर निर्बंध घातले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाचा यामध्ये समावेश आहे.
इंस्टाग्रामवर लहान मुलांसाठी नवा बदल; मेटाचे एआय तंत्रज्ञान ओळखणार वापरकर्त्याचे खरे वय

Meta’s AI technology : सोशल मीडियावरील लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेता मेटा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर आता लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित बनवले जाणार आहेत. त्यासाठी मेटा कंपनीने एआय तंत्रज्ञान अधिक प्रभावीपणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! 128 वर्षांनंतर क्रिकेट खेळ पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये परतणार

Cricket Olympic : 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 14 जुलै 2028 ते 30 जुलै 2028 या काळात होणार असून, त्यात पुरुष आणि महिला क्रिकेट संघही सहभागी होणार आहेत.
युनायटेड किंग्डम कोर्टाने ‘स्त्री’ आणि ‘ट्रान्स वूमन’ मधली व्याख्या केली स्पष्ट!

UK Supreme Court clears Womenhood – जगामध्ये एकीकडे LGBTQIA+ समुदायातील बांधवांना सन्मानाचे स्थान देण्यासाठी चळवळ सुरू आहे. तर दुसरीकडे ‘जन्मत: स्त्री म्हणून जन्माला आलेल्या महिलेला स्त्री मानावं की, ज्या ‘ट्रान्स वुमनकडे लिंग प्रमाणपत्र आहे तिला स्त्री मानावं’ हा प्रश्न उद्वभवला आहे. युनायटेड किंग्डममधल्या सर्वोच्च न्यायालयातल्या या खटल्यात अखेर ‘जन्मत: स्त्री म्हणून जन्माला आलेली महिला’ जिंकली आहे.
शास्त्रज्ञांना दिसला एक नवा ‘अदृश्य’ रंग – ‘ओलो’!

New olo colour : कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यजनक शोध लावला आहे. त्यांनी असा एक रंग पाहिला आहे जो आजवर कोणालाही दिसलेला नव्हता. आणि या नवीन रंगाला त्यांनी ‘ओलो’ (Olo) असे नाव दिलं आहे
भारतीय विद्यार्थीनीसह चार विद्यार्थ्यांनी ट्रम्प सरकारविरोधात दाखल केला खटला

ट्रम्प प्रशासनाने ‘स्टुडंट अँड एक्सचेंज विजिटर इन्फॉरमेशन सिस्टीम (SEVIS) मधून चार विद्यार्थ्यांचा कायदेशीर दर्जा संपल्याचं दाखवून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. SEVIS हा एक डेटाबेस आहे जिथे अमेरिकेतील गैर-स्थलांतरित विद्यार्थ्यांची माहिती संग्रहित केली जाते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे या चारही विद्यार्थ्यांचा अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर अधिकार न राहिल्यामुळे त्यांना स्वत:हून त्यांच्या मूळ देशात जावं लागणार आहे. जर हे चारही विद्यार्थी स्वत:हून बाहेर गेले नाहीत तर त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कायदेशीर कारवाई होऊ शकते.