इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा : लेणी (भाग 2)

Maharashtra’s culture caves : महाराष्ट्रातील लेणी म्हटल्यावर सगळ्यात आधी ‘अजिंठा-वेरुळ’ हे नाव आठवतं. पण ही लेणी काही शेजारी शेजारी नाहीत, प्रत्यक्षात अजिंठा आणि वेरुळ यांच्यात शंभर किलोमीटरचं अंतर आहे. औरंगबाद शहर हे या दोघांमधला दुवा म्हणता येईल. अजिंठा लेणी खोदण्यासाठी जो डोंगर-परिसर निवडला त्यावरुनच ह्या लेण्यांच्या निर्मात्याची सौंदर्यदृष्टी कळते. नैसर्गिक अर्धवर्तुळाकार आकाराचा डोंगर, त्यामधून वाहणारी वाघूर नदी आणि त्यामुळे निर्माण झालेली वनराजी.

भारतीय कृषी क्षेत्राचे सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध – भाग 1

काही पाश्चिमात्य तज्ञांनी अशी भयावह भविष्यवाणी केली होती की, लवकरच भारतात अन्नधान्याच्या कमतरतेमुळे कुपोषण, भूकबळी होतील, सर्वांगीण अराजक माजेल.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच 1947-48 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कुशल नियोजनातून साकारलेले ‘अधिक धान्य उगाओ’ (‘Grow More Food’) धोरण राबवलं.

धोरणगती व महाराष्ट्रातील महिलांची परिस्थिती – भाग 2

महिलांना अजूनही विधानसभा, लोकसभा-राज्यसभा किंवा न्यायाधीश म्हणून एक तृतीयांश संख्या गाठण्याएवढीही संधी निश्चित डेडलाईनसह  मिळालेली नाही. संविधानाने नागरिक म्हणून जात, वर्ग, लिंग हे  सर्व भेद नाकारुन महिलांना समान हक्क दिले आहेत. तरीही ही स्थिती अशी का आहे? निर्णय-प्रक्रियेतील महिलांची स्थिती इतकी का खालावलेली आहे?

महिला धोरणाचं सोज्वळ ऑडिट – भाग 1

महिला धोरणांमध्ये (Women’s Policy in Maharashtra) प्रामुख्याने स्त्रियांवरील अत्याचार, हिंसा, स्त्रीविषयक कायदे, त्यांच्या आर्थिक दर्जात सुधारणा, प्रसारमाध्यमांची भूमिका, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, स्त्रियांना केंद्रस्थानी मानून योजनांची निश्चिती व स्वयंसहाय्यता बचतगटांचा विकास, यांचा प्रामुख्याने विचार झाला.

मराठी सिनेमांची वाटचाल

व्यवसाय म्हणूनच नव्हे तर आशयातील वैविध्यामुळे मराठी चित्रपटांनी (Marathi Cinema) आपली वेगळी ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली आहे. चित्रपटाकडे मनोरंजनाच्या बरोबरीनेच एक कलामाध्यम म्हणून पाहणा-या अभ्यासू दिग्दर्शकांची एक फळी मराठी चित्रपटसृष्टीत समर्थपणे उभी राहिली आहे. या तरुण दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांना त्यांच्या पारंपारिक चाकोरीतून बाहेर काढले. या दिग्दर्शकांनी निवडलेल्या कथा मराठी माणसांच्या मराठी समाजाच्या जवळच्या आहेत.

महाराष्ट्रातील भौगोलिक नवल विशेष !

सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला अणि त्यातून बाहेर जो लाव्हा फेकला गेला. त्याचे थर साचून सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या. महाराष्ट्रात अनेक भौगोलिक चमत्कार निसर्गतः तयार झाले आहेत. ते बघताना निसर्गाच्या किमयेचं कौतुक वाटतं. माणसानं आपल्या कलाविष्काराची प्रेरणा अशा नैसर्गिक-भौगोलिक रचनांमधूनच घेतली असावी.

दापोडी बोटॅनिकल गार्डन – भाग 2

माल्कमनं मग त्यासाठी वाट न बघता स्वत:च बोटॅनिकल गार्डन (Botanical Garden) उभारायचं ठरवलं. तो बॉम्बे इलाख्याचा गव्हर्नर होता. काही ठरावीक रक्कम खर्च करण्याचे त्याला अधिकार होते. त्यानं ते वापरून दापोडीच्या गार्डनचं काम सुरू केलं. त्याला खर्च करता येणारी रक्कम गरजेपेक्षा खूप कमी असली, तरी त्याला आता कोर्टाच्या निर्णयासाठी थांबावं लागणार नव्हतं. या खर्चावर कोर्ट आक्षेप घेऊ शकत नव्हतं.

किनाऱ्यावरचे मोती  : सागरी किल्ले भाग 2

या जलदुर्गांमध्ये सागरी संग्रहालय, मराठ्यांच्या आरमाराचे संग्रहालय, कोकणच्या लोकजीवनाचे संग्रहालय, कोळी समाजाच्या संस्कृतीचे संग्रहालय असे कितीतरी उपक्रम करता येतील. ज्यामुळे या ठिकाणांचे पर्यटन मूल्य आणखी  वाढेल.

किनाऱ्यावरचे मोती : सागरी किल्ले भाग 1

महाराष्ट्राला निसर्गाने दिलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे ‘सागर किनारा’. या सागर किनाऱ्यांचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे इथले ‘जलदुर्ग’. सागरातून होऊ शकणाऱ्या आक्रमणाचा अंदाज घेऊनच इथल्या प्राचीन शासकांनी किनारपट्टीवर जणू जलदुर्गांची मालिकाच उभी केली.

‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ कशासाठी?

श्रेष्ठ शब्दाची तशी धास्ती असते. मराठी मनाला उगा श्रेष्ठींचं दडपण असतं. श्रेष्ठपणाची उंची गाठण्यापेक्षा श्रेष्ठांशी पंगा घ्यायची ऊर्मीच जास्त. मराठी मातीचा हा गुणधर्म असावा. म्हणूनच ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ या डिजिटल पोर्टलची उभारणी होताना श्रेष्ठत्वाची झूल महाराष्ट्रावर चढवावी तर का चढवावी, याचा हा खल. ‘Shreshth Maharashtra’ नॉलेज बेस्ड ‘नो नॉन्सेन्स’ पोर्टल असणार आहे. मराठी सभ्यतेचा जागर ही आमची टॅगलाइन आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ