मोटरस्पोर्ट्समध्ये इतिहास रचणारी ऐश्वर्या पिसे

Aishwarya Pissay Indian motorsports athlete : पोर्तुगालमध्ये नुकताच FIM वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातल्या ऐश्वर्या पिसे या तरुणीने तिच्या गटातून जिंकली आहे. संपूर्ण आशियातून ही सर्धा जिंकणारी ऐश्वर्या पिसे ही पहिली भारतीय महिला आहे.
भारतातला पहिल्या सर्व-महिला लष्करी अधिकाऱ्यांचा त्रि-सेवा नौकानयन प्रवास

Tri-service sailing voyage : भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करातील महिला अधिकारी एकत्रितरित्या पहिल्या जागतिक प्रदक्षिणेला सुरूवात केली आहे. ‘समुद्री प्रदक्षिणा’ नावाच्या पहिल्याच महिला क्रूमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील दहा महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राजा हरिश्चंद्र सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला व्हिडिओ एडिटर सरस्वती फाळके

Saraswatibai Phalke : ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सिनेसृष्टीला सुरूवात झाली. या सिनेमाची निर्मिती आणि निर्मितीकार दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेसृष्टीचं आदराचं स्थान आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार ही दिले जातात. पण इतक्या मोठ्या सिनेमाची निर्मिती त्यांना एकट्याने करणं शक्य होतं का? साहजिकच आहे याचं उत्तर नाही असंच आहे. तर भारतातल्या या पहिल्या सिनेमा निर्मितीमध्ये दादासाहेब फाळके यांना मोलाची मदत केली त्या होत्या त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके.
बंगालमध्ये दुर्गामातेच्या कुंकवाखाली कोळी का असतो?

Durga Puja : दुर्गामातेच्या कपाळावर असलेल्या कुंकुवाखाली कोळी रेखाटलेला असतो. बहुतांशी वेळा डाक किंवा डाकर साज पद्धतीने रेखाटलेल्या मूर्तीमध्ये देवतेच्या कपाळावर हा कोळी पाहायला मिळतो. याचा विशेष असा अर्थ आहे. कोळ्याने विणलेले जाळे हे ‘महामाया’चे प्रतीक आहे. ते कोळ्याने साकारलेल्या सर्वोच्च भ्रमाची किंवा दिव्य स्त्रीत्वाची संकल्पना दर्शवते.
भौतिकशास्त्र क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला टी.के.राधा

Breaking Barriers : स्वातंत्र्यपूर्व काळात विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात महिलांचं अस्तित्वच नसायचं. मुलीचं शालेय शिक्षण झाल्यावर लग्न करणं आणि घर सांभाळचं अशी परिस्थिती होती. मात्र, केरळमधल्या टी.के.राधा यांनी भौतिकशास्त्रातून उच्च शिक्षण पूर्ण करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला.. पाहुयात त्यांचा प्रवास.
नवरात्रीची भोंडला संस्कृती आणि भोंडल्याची लोकगीतं

Bhodla Navratri Tradition : नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात भोंडला किंवा हादग्याची विशेष अशी संस्कृती लाभली आहे. जाणून घेऊयात हा भोंडला काय असतो आणि ते कसा साजरा करतात.
ऊसाला गोडवा देणाऱ्या जानकी अम्मल

Breaking Barriers : ऊस हे नाव घेताच गोडवा देणारं पीक ही आर्थिक आणि चवीच्याही दृष्टीने हे एक समीकरण आपल्या डोक्यात येतं. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात पूर्वी पिकणारा ऊस हा चवीने जास्त गोड नव्हता. त्यामुळे बाहेरून ऊसाची आयात केली जायची. मग भारतात गोड ऊसाचं पीक कसं होऊ लागलं ? तर याचं श्रेय जातं जानकी अम्मल या महिला शास्त्रज्ञाला. जाणून घेऊयात कोण आहेत ऊसाला गोडवा देणाऱ्या जानकी अम्मल?
इनिया प्रगती: भारताची सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर!

Youngest Analogue Astronaut : ॲनालॉग अंतराळवीर म्हणजे असे लोक जे अंतराळात जाण्याआधी पृथ्वीवरच अशा ठिकाणी ट्रेनिंग घेतात जिथलं वातावरण आणि भूभाग अंतराळातील ग्रहांसारखं असतं. हे ट्रेनिंग खूप महत्त्वाचं असतं, कारण यातून अंतराळातील वातावरणात कसं जगायचं याचा अनुभव मिळतो.
समैरा हुल्लूर:देशातली सगळ्यात लहान व्यावसायिक पायलट

एकट्याने विमान चालवण्याची संधी ही खूप आनंददायक वाटत असली तरीही प्रत्यक्षात यामध्ये अनेक अडथळे होते. अनेक आव्हानांना तोंड देत ती हा सराव करत होती. प्रत्येकवेळेला विमान धावपट्टीवर उतरवताना तिला खूप अडचणी यायच्या.
भारतातल्या पहिल्या महिला फॉरेन्सिक शास्त्रज्ञ डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती

Breaking Barriers : व्यावसायिक जगतातील काही क्षेत्रांमध्ये आजही पुरूषांची मक्तेदारी आहे. अशा क्षेत्रात महिलांनी प्रवेश करणं, टीका – टिपण्णींचा सामना करत स्वत:ची जागा निर्माण करणं खूप आव्हानात्मक आहे. हे आव्हान पेलून अनेक महिलांनी आपलं नाव उंचावलं आहे. आणि स्त्रीशक्तीचा प्रत्यय जगाला आणून दिलेला आहे. अशाच अतिशय जटिल अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि त्या क्षेत्राला आकार देणाऱ्या डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
ज्येष्ठांना सायबर सुरक्षा पुरवणारी तेजस्वी मनोज

Tejaswi Manoj : सायबर क्राइम आजच्या युगातल्या गुन्हेगारीचं नवं स्वरुप आहे. या सायबर फ्रॉडमध्ये दिवसाला कोट्यवधी रुपयाचं नुकसान होतं. ज्येष्ठ मंडळींना या सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एका 16 वर्षाच्या मुलीनं ‘शिल्ड सीनियर्स’ नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला. ज्येष्ठ मंडळीना सायबर गुन्ह्याविषयी माहिती देणं, या गुन्ह्यांना कोणी बळी पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी, याविषयी जनजागृती ती करत असते. आपल्या वृद्ध आजीआजोबांची ती खऱ्या अर्थाने काळजी घेते. या तिच्या कर्तृत्वाबद्दल तिला टाइम्सने ‘किड ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
आंब्याच्या पानांच्या तोरणांची प्रथा केवळ धार्मिक नाही तर शास्त्रियही!

Mango Leaf Uses : घरात सण- उत्सव असो, पूजा असो की लग्नसमारंभ.. कोणताही सोहळा असो घराच्या उबंरठ्यावर आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावलंच जातं. पण तुम्हाला माहित आहे का, केवळ पद्धत म्हणून हे केलं जात नाही तर या आंब्यांच्या पानांपासून तयार केलेल्या तोरणाला शास्त्रिय कारण ही आहे. केवळ हिंदू समुदायच नाही तर महाराष्ट्रातील ख्रिस्ती समुदायही त्यांच्याकडील सोहळ्यात आंब्याच्या पानांचं तोरण वेशीवर व दारावर बांधतात.